घटना

१६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली.” जिवावरचे बोटावर निभावले “हा शब्दप्रयोग यातूनच रुढ झाला.

१६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.

१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.

२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.

२०००: जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.

जन्म/वाढदिवस

१८२७: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर(मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)

१८५६: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५)

१९०८: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम (मृत्यू: ६ जुलै १९८६)

१९०९: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली. (मृत्यू: २७ जून १९९६)

१९१६: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक. (मृत्यू: १२ जून २००३)

१९२०: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया. (मृत्यू: ९ जुलै २००५)

१९२०: इंग्लिश कादंबरीकार आर्थर हॅले. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४)

१९६६: भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी.

मृत्यू/पुण्यतिथी

१९१७: स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम

१९२२: आर्य महिला समाज च्या संस्थापिका पंडिता रमाबाई (जन्म: २३ एप्रिल १८५८)

१९४०: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)

१९९३: हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)

१९९६: बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन

१९९८: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे यांचे निधन.

२००२: दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया