घटना

१६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.
१६७१: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.
१८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
१९१९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
१९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.
१९३३: सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
१९४८: वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
१९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
१९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.
१९७४: अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद झाली.
१९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
१९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००४: संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

जन्म

१५९२: ५वा मुघल सम्राट शहाजहान यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)
१८५५: अमेरिकन संशोधक व उद्योजक किंग कँप जिलेट यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९३२)
१८६८: मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.
१८६९: कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.
१८९२: लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९६४ – मुंबई)
१९१३: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च २००७)
१९२२: आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म. (मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)
१९२५: मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.
१९२८: मराठी साहित्यिक विजय तेंडूलकर यांचा जन्म.
१९४१: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी  यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)
१९४८: भारतीय क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०१०)
१९४८: अभिनेत्री आणि गायिका फय्याज यांचा जन्म.
१९५५: पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.
१९८६: हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा जन्म.

मृत्यू

१८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.
१९३३: अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कूलिज यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८७२)
१९४३: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)
१९७१: भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.
१९८२: भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१८)
१९९०: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.
१९९२: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१४)
२००३: पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन.