घटना

१६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.

१६७१: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.

१८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.

१९१९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.

१९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.

१९३३: सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.

१९४८: वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.

१९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.

१९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.

१९७४: अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद झाली.

१९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

१९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जन्म

१५९२: ५वा मुघल सम्राट शहाजहान यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)

१८५५: अमेरिकन संशोधक व उद्योजक किंग कँप जिलेट यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९३२)

१८६८: मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.

१८६९: कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.

१८८३: अरब कवी, तत्त्वज्ञानी आणि चित्रकार खलील जिब्रान यांचा जन्म.

१८९२: लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९६४ – मुंबई)

१९१३: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च २००७)

१९२२: आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म. (मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)

१९२५: मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.

१९२८: मराठी साहित्यिक विजय तेंडूलकर यांचा जन्म.

१९४१: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)

१९४८: भारतीय क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० आक्टोबर २०१०)

१९४८: अभिनेत्री आणि गायिका फय्याज यांचा जन्म.

१९५५: पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.

१९८६: हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा जन्म.

मृत्यू

१८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.

१९३३: अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कूलिज यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८७२)

१९४३: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)

१९७१: भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.

१९८२: भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१८)

१९९०: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.

१९९२: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१४)

२००३: पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन.

२०१४: उदय किरण (वय ३३ वर्ष) भारतीय फ़िल्म अभिनेता

२०१७: गंगमुमेई कामेई (वय ७७ वर्ष) भारतीय शिक्षक आणि राजनीतिज्ञ