१८१७: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.
१८२४: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
१८४३:विष्णूदास भावे यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या
राजवाड्यातील दरबार हॉल मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस मराठी रंगभूमी दिनम्हणून साजरा करण्यात येतो.
विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते.अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या.
या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता.
१८७२: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.
१८९५: जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.
१९२९: जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.
१९४०: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.
१९४५: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९५१: बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे
यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.
२००६: इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
२००७: गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.
२०१३: भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.