घटना

६१०: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.
१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
१९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.
१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
१९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
१९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.

जन्म

१८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १९७९)
१९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००८)
१९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २० जून २००८)
१९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.
१९४८: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.
१९६१: अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.
१९७९: हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.

मृत्यू

१९८९: दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १९०१)
२०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.