घटना

१७७१: हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.

१७९८: फ्रांसच्या सैन्याने रोमचा पाडाव केला व रोमन प्रजासत्ताकची स्थापना झाली.

१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलला टेलिफोनच्या शोधासाठी पेटंट मिळाला.

१९८९: चीनने तिबेटची राजधानी ल्हासामध्ये लश्करी कायदा लागु केला.

२००५: स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने.

२००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.

२०१४: मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० हे बोईंग ७७७ प्रकारचे विमान कुआलालंपुरपासून बीजिंगला चाललेले असताना २३९ प्रवासी व कर्मचाऱ्यांसह नाहीसे झाले.

जन्म/वाढदिवस

१५०८: दुसरा मुघल सम्राट हुमायून

१७६५: फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८३३)

१७९२: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १८७१)

१८४९: महान वनस्पतीतज्ञ ल्यूथर बरबँक यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल १९२६)

१८५०: टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

१९११: ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली)

१९१८: मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.

१९३४: भारताचा यष्टिरक्षक नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म.

१९४२: भारतीय क्रिकेटपटू उमेश कुलकर्णी यांचा जन्म.

१९५२: वेस्ट इंडियन क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्डस यांचा जन्म.

१९५५: चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी

१६४९: दादोजी कोंडदेव.

१९५२: परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ

१९६१: भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री.

१९७४: माजी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी

१९९३: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९००)

२०००: कथालेखक प्रा. प्रभाकर तामणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)

२०१२: संगीतकार रवि शंकर शर्मा ऊर्फ रवि यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९२६)

२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी जी. कार्तिकेयन यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १९४९)