ख्रिस्त पूर्व ३७६१: हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.
१९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.
१९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.
१९१९: महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.
१९१९: के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.
१९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.
१९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना.
१९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू होते.
२००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.
२००२: सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक.
२०१४: जपानी वैज्ञानिक इसामू अकासाकी, हिरोशी अमानो आणि अमरीकेचे शुजी नाकामुरा यांना निळ्या एलईडी प्रकाशाच्या शोधासाठी भौतिक शास्त्राचा नोबेल