भारतीय वायुसेना दिन
महत्त्वाच्या घटना
१९३२: इंडियन एअर फोर्स अॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.
१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.
१९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
१९६२: अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग
दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
१९७८: ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.
१९८२: पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची
(Department of Homeland Security) स्थापना केली.
२००५: काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी
झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.
२०१४: जॉन फिलिप यांनी तिस-यांदा न्यूज़ीलण्डच्या प्रधानमंत्री पदाची शपथ घतली.
२०१४: जर्मन भौतिक वैज्ञानीक स्टीफ़न हेल, अमेरिकी भौतिक वैज्ञानीक एरिक बेत्ज़िग आणि अमेरिकी भौतिक-रसायन वैज्ञानीक
विलियम एस्को मोइरनर यांना २०१४ चे रसायन शास्त्राचे नोबेल
जन्मदिवस / वाढदिवस
१८५०: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६)
१८८९: डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६६)
१८९१: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर –उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली.
त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. शंवाकिय हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा
नमुना आहे. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)
१९२२:गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन –संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist).
वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)
१९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन. (मृत्यू: ५ जुलै २००६)
१९२६: कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी–जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा
हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: ३ जुलै १९९६)
१९२८: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे .
१९३०: भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने. (मृत्यू: ८ जानेवारी २०१३)
९६०: नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स .
१९९७: अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न.
मृत्यू / पुण्यतिथी
१३१७: जपानचे सम्राट फुशिमी . (जन्म: १० मे १२६५)
१८८८: महादेव मोरेश्वर कुंटे –कवी व संस्कृतचे प्राध्यापक. राजा शिवाजी हे त्यांचे काव्य विशेष गाजले. (जन्म: १ ऑगस्ट १८३५ –माहुली, सांगली, महाराष्ट्र)
१९३६: धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद –हिन्दी साहित्यिक. १५ कादंबर्या व ३०० कथा लिहील्या.२४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. (जन्म: ३१ जुलै १८८०)
१९६७: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अॅटली. (जन्म: ३ जानेवारी १८८३)
१९७९:लोकनायक जयप्रकाश नारायण –स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (जन्म: ११ आक्टोबर १९०२)
१९९६:गोदावरी परुळेकर –मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी
सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे
कार्य केले. जेव्हा माणूस जागा होतो हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे. (जन्म: १४ ऑगस्ट १९०७)
१९९८: इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी –देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा
२०१२: केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा . (जन्म: ५ जुलै १९२५)
२०१२: पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले .या मराठी गायिका, पत्रकार होत्या. या मराठी पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या कन्या