१८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.
१८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्यातील गेंडा माळावर फाशी
१९००: अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
१९४४: दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.
१९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.
१९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.
१९६६: स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.
१९९१: मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.
२०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली.
२००१: लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.
२०१६: इसरोने स्वदेशात विकसित केलेले क्रायोजेनिक अपर स्टेज(सीयूएस)चा पहिल्यांदा प्रयोग केला. जीएसएलवी-एफ०५च्या यशस्वी उड्डाणाबरोबरच
इनसैट-३डीआरचे यशस्वी प्रक्षेपण.
७०१: पोप सर्गिअस (पहिला) . (जन्म: १५ डिसेंबर ६८७)
१९३३: इराकचा राजा फैसल (पहिला) .
१९६०: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी. (जन्म: १२ सप्टेंबर १९१२)
१९६५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर .
१९७०: मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर. (जन्म: १९ जुलै १८९४)
१९८०: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी .
१९८१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा.
१९८१: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज . (जन्म: १७ एप्रिल १८९७)
१९८२: जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते शेख अब्दुल्ला . (जन्म: ५ डिसेंबर १९०५)
१९९१: वामन रामराव तथा वा. रा. कांत – कवी. त्यांची सखी शेजारिणी तू हसत रहा, त्यातरुतळी विसरले गीत, बगळ्यांची माळ फुले अजुन अंबरात, राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे इ. भावगीते लोकप्रिय आहेत. १९५२ मध्ये झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच १९६२ मधे नांदेड येथे झालेल्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
त्यांचे वेलांटी, पहाटतारा, शततारका, रुद्रवीणा, दोनुली, मरणगंध इ. काव्यसंग्रह तसेच अनेक ललित, स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या मावळते शब्द या कवितेला कवी केशवसुत पारितोषिक मिळाले. (जन्म: ६ आक्टोबर १९१३)
१९९७ : कमला सोहोनी –पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ (जन्म: १८ जून १९११)
२०१०: कन्नड व तामिळ अभिनेता मुरली . (जन्म: १९ मे १९६४)