१९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.
१९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.
१९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.
१९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
१९५३: कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले. फोर्ड आडनाव नसणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. मात्र जॉन केनेडी यांच्या मंत्रीमंडळात
स्थान मिळाल्यामुळे एक महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.
१९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.
१९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
१९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.
२०००: उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.
२०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.
पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.

२०१३: सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी.
२०१६: डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत ४५वे राष्ट्रपती म्हणून घोषीत करण्यात आले.