१५४३: नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.
१७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.
१८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.
१८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.
१९३९: मुंबईच्या सेंट्रल सिनेमामधे प्रभातचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला. फिल्म जर्नॅलिस्टस असोसिएशनने १९३९ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बहुमान त्याला दिला.
१९४५: दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.
१९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
१९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.
१९९१: ताजिकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९९७:सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे याला बुद्धिबळातील सर्वोच्‍च असा ग्रँडमास्टर किताब देण्याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाने केली.
२००१: व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर दिग्दर्शित मॉन्सून वेडींग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
२००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्‍घाटन झाले.
२०१२:भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.
२०१५: एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.
२०१६: उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.

१४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)
१९४२: स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)
१९६०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी. (जन्म: ६ एप्रिल १८९०)
१९७६: माओ त्से तुंग –आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (जन्म: २६ डिसेंबर १८९३)
१९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)
१९९४: लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर.
१९९७: युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट.
१९९९: नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर.
२००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या. (जन्म: २ सप्टेंबर १९५३)
२०१०: समाजवादी कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते. (जन्म: ९ मे १९२८)
२०१२: व्हर्गिस कुरियन –भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB)
संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (२६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)