- तिथी :
आषाढ शुध्द पौर्णिमा
- पार्श्वभूमी :
महर्षी व्यासांचा हा जन्म दिवस होय, इसवी सन पुर्व ३००० पूर्वी महर्षी व्यासांचा जन्म या दिवशी झाला. व्यास हे ऋषी पराशर व सत्यवती यांचे पुत्र, व्यासांचे मुळ नाव ‘ कृष्णद्वैपायन ‘ असे होते त्याचा जन्म यमुनेच्या दिव्प परदेशात झाला व त्यांचा वर्ण कृष्णवर्ण होता या वरून त्यांना हे नाव प्राप्त झाले. लहानपणीच त्यांनी तपचर्या करण्याची इच्छा प्रगट केली, पुढे हिमालयात बद्रीनाथ येथे त्यांनी वास्तव्य केले. प्राचीन वेदांचे संकलन करून त्यांनी त्याचे प्रमुख ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार विभागात रुपांतर केले. पुढे व्यासांनी १८ पुराणे व महाभारत सारख्या महाकाव्यांची निर्मिती केली. व आपल्या चार वेगवेगळ्या शिष्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद याचे ज्ञानदान केले. या परंपरेतून पुढे अनेक उपनिषेद याची निर्मिती झाली. अनेंक विद्या शाखांची निर्मिती झाली, यातून मोठ्या साहित्याची व ज्ञानार्जन करणारे आश्रमाची निर्मिती झाले. व या गुरुकुलातून गुरु शिष्य परंपरा जन्मास आली. व भारतीय शिक्षण परंपरेचा जन्म झाला. व्यासांनी वेदांच्या अभ्यास शाखांचे विस्ताराचे काम केले या मुळे त्यांना वेद व्यास हे नाम प्राप्त झाले. ज्या स्थानावरून ज्ञान विस्ताराचे व दानाचे कार्य केले जाते त्यास व्यासपीठ हे नाव मिळाले. ज्ञानदान करणारा ज्या अधिकार स्थानावरून हे कार्य करतो ते व्यासांचे पीठ मानले जाते. व ते कार्य करणारा व्यासांचा अंश मानला जातो, त्या मुळे महर्षी व्यासांचा हा जन्मदिन ज्ञानदान करणाऱ्या गुरु च्या पूजनाने गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आश्रमातील गुरुकुल पद्धतीत याच दिवशी नवीन विध्यार्थी दाखल होत व ज्ञानार्जन केलेले विध्यार्थी आश्रमातून बाहेर पडत. हा दिवस नवीन विध्यार्थीचा अनुग्रह घेण्याचा व जुन्यांचा आपल्या गुरुंना गुरु दक्षणा देण्याचा हा सोहळा गुरुपुजनाने साजरा होत असे. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे जनक मानले जाणाऱ्या व्यासांचा हा जन्म दिन गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
- साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :
महर्षी व्यासांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. या दिवशी महर्षी व्यासांची पूजा करतात व “ॐ नमोस्तुते व्यास विशाल बुध्दे फुल्लारविंदाय तपत्रनेत्रयेन व्रया भारत तैल पूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः॥” श्लोक म्हणून त्यांना वंदन करतात.
या दिवशी रुद्राभिषेक करून गुरूंना वस्त्र-दक्षिणा किंवा तत्सम काहीतरी देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. गायन-नृत्य किंवा चित्रकला वगैरे कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा दिवस आहे. गुरूंच्या आशिर्वादाने हे विद्यार्थी आपापली कला लोकांसमोर सादर करतात.