• अनंत काणेकर

    अनंत आत्माराम काणेकर

    अनंत आत्माराम काणेकर (जन्म : डिसेंबर २, इ.स. १९०५ – मृत्यू : जानेवारी २२, इ.स. १९८०) हे मराठी कवी, लेखक, पत्रकार होते.

    अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, औरंगाबाद, १९५७ | पद्मश्री पुरस्कार, १९६५

    प्रकाशित साहित्य

    काव्यसंग्रह : चांदरात, १९३३

    लघुनिबंध : उघड्या खिडक्या, १९४५; तुटलेले तारे; पिकली पाने, १९३४; शिंपले आणि मोती

    प्रवासवर्णन : धुक्यातून लाल ताऱ्याकडे (१९३७, युरोप व रशिया); आमची माती, आमचे आकाश (१९४९, उत्तर भारत); निळे डोंगर, तांबडी माती (१९५०, दक्षिण भारत); खडक कोरतात आकाश

    कथा संग्रह : अनंत काणेकर निवडक कथा (भाग १, ..) (पॉकेट बुक्स); जागत्या छाया; दिव्यावरती अंधार; मोरपिसे; रुपेरी वाळू (रूपककथा); विजेची वेल

    चित्रपट संवाद : माणूस, १९३९; आदमी, १९३९

    नाटक : निशिकांताची नवरी; पतंगाची दोरी

    गाजलेली ध्वनिमुद्रित गाणी : आता कशाला उद्याची बात (गायिका : शांता हुबळीकर); आला खुशीत्‌ समिंदर (गायिका : ज्योत्स्ना भोळे); एकलेपणाची आग लागली (गायिका : ज्योत्स्ना भोळे); तू माझी अन्‌ तुझा मीच (गायिका : ज्योत्स्ना भोळे); दर्यावर डोले माझं (गायिका : ज्योत्स्ना भोळे)

  • अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)

    आत्माराम रावजी देशपांडे (सप्टेंबर ११, १९०१ – मे ८, १९८२) हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी – १० चरणांची कविता – हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.

  • अरुण कोलटकर

    अरुण बालकृष्ण कोलटकर (नोव्हेंबर १, १९३२ – सप्टेंबर २५, २००४) हे मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते.

    प्रकाशित काव्यसंग्रह

    मराठी : अरुण कोलटकरच्या कविता (१९७७); चिरीमिरी (२००४); द्रोण (२००४); भिजकी वही (२००४); अरुण कोलट्करच्या चार कविता

    इंग्रजी : कलेक्टेड पोएम्स इ्न इंग्लिश; जेजुरी; काळा घोडा पोएम्स; द बोटराईड ॲन्ड अदर पोएम्स; सर्पसत्र

  • डॉ. अरुणा ढेरे

    डॉ. अरुणा ढेरे (१९५७) या मराठी भाषेतील लेखिका, कवयित्री आहेत. अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केले असले, तरी त्या मुळात कवयित्री आहेत.  सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणार्‍या डॉ. ढेरे या २१व्या शतकपूर्वीच्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील. या शिवाय स्फुट लेखसंग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला.

    वैचारिक पुस्तके : ’अंधारातील दिवे’, ’उंच वाढलेल्या गवताखाली’, ’उमदा लेखक, उमदा माणूस’, ’उर्वशी’, ‘कवितेच्या वाटेवर’, ‘काळोख आणि पाणी’, ’कवितेच्या वाटेवर’, ’जाणिवा जाग्या होताना’, ’जावे जन्माकडे ’, ’त्यांची झेप, त्यांचे अवकाश’, ’पावसानंतरचं ऊन’, ’प्रकाशाचे गाणे’, ’प्रतिष्ठेचा प्रश्न’, ’प्रेमातून प्रेमाकडे ’, ’महाद्वार’, ‘लोक आणि अभिजात’, ‘लोकसंस्कृतीची रंगरूपे’, ‘विवेक आणि विद्रोह’, ‘डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार’, ‘विस्मृतिचित्रे’, ’शाश्वताची शिदोरी’, ‘शोध मराठीपणाचा’ (सुभाष केळकर यांच्याबरोबर सहलेखन-मुख्य लेखक – दिनकर गांगल), ’स्त्री आणि संस्कृती’ इत्यादी

    कविता संग्रह : निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र इत्यादी

    कथासंग्रह : अज्ञात झर्‍यावर, काळोख आणि पाणी, कृष्णकिनारा, नागमंडल, प्रेमातून प्रेमाकडे, मन केले ग्वाही, मनातलं आभाळ, मैत्रेय, रूपोत्सव, लावण्ययात्रा, वेगळी माती, वेगळा वास इत्यादी

  • आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर)

    चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (मार्च ८, इ.स. १९३०- एप्रिल २६, इ.स. १९७६) हे एक मराठी कवी व लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री, खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्‍या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने ‘मौज’मधे छापण्यास पाठवून दिल्या.

    प्रकाशित साहित्य

    अजगर (कादंबरी, १९६५); अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४); अभोगी (नाटक); अवध्य (नाटक, १९७२); आपुले मरण

    एक लघुकांदबरी आणि काही कविता; एक शून्य बाजीराव (नाटक, १९६६); कालाय तस्मै नमः (नाटक, १९७२); कोंडुरा (कादंबरी, १९६६); गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०); चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५); जोगवा (काव्यसंग्रह, १९५९); त्रिशंकू (कादंबरी, १९६८); दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२); नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५); पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६); पिशाच्च ((कादंबरी, १९७०); रखेली (नाटक); राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१); रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२); श्रीमंत पतीची राणी (नाटक); सगेसोयरे (नाटक, १९६७); सनई (कथा संग्रह, १९६४); हयवदन (नाटक)

    अप्रकाशित नाटके : १. अंधा युग(अनुवाद) २. असाही एक अश्वत्थामा ३. आई ४.आषाढातला एक दिवस ५. इस्तू जागा ठेव ६. एकनाथ मुंगी ७. एका नाटकाचा अंत ८. एका भुताचे भागधेय ९. एका राघूची गोष्ट १०. गुरू महाराज गुरू ११. चव्हाटा १२. थंडीच्या एका रात्री १३. दायित्व (अनुवाद) १४. देवाची आई(केळीचे सुकले बाग) १५. देवाचे पाय १६. पुनश्च एक बॉबी १७. प्रतिमा १८. प्रेषित १९. भूत कोण माणूस कोण? २०.माकडाला चढली भांग २१. येईन एक दिवस २२. रात सवतीची २३. ललित नभी चार मेघ २४. विखाराणी २५. शाल्मली २६. श्रीरंग प्रेमरंग २७. होती एक शारदा.

    गाजलेली भावगीते

    कसे? कसे हासायाचे; गेले द्यायचे राहून; ती येते आणिक जाते; दु:ख ना आनंदही, अंत ना आरंभही; नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत; ये रे घना ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना; विश्रब्ध मनाच्या कातरवेळी, एखाद्या प्राणाची दिवेलागण; समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते; ही निकामी आढ्यता का? दाद द्या अन् शुद्ध व्हा.

    गाजलेली चित्रपटगीते

    कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (चित्रपट : सामना); तुम्ही रे दोन, दोनच माणसं (चित्रपट : चानी); तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी (चित्रपट : निवडुंग); तो एक राजपुत्र, मी एक रानफूल (चित्रपट : चानी); बंद ओठांनी निघाला, पेटलेला एकला (चित्रपट : सर्वसाक्षी); मीच मला पाहते, पाहते आजच का (चित्रपट : यशोदा); लवलव करी पात, डोळं नाही थार्याला (चित्रपट : निवडुंग).

  • इंदिरा संत

    इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी – जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.

    प्रकाशित साहित्य

    कवितासंग्रह : इंदिरा संत यांच्या समग्र कविता (पॉप्युलर प्रकाशन, २०१४); गर्भरेशीम १९८२; निराकार; बाहुल्या १९७२; मरवा; मृगजळ १९५७; मेंदी १९५५; रंगबावरी १९६४; वंशकुसुम; शेला १९५१…

    कथासंग्रह : कदली; चैतू; श्यामली

    ललितलेख संग्रह : मृदगंध १९८६; फुलवेल १९९४

  • कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर)

    विष्णु वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

    मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे.

    प्रकाशित साहित्य

    कविता संग्रह : अक्षरबाग (१९९९); किनारा(१९५२); चाफा(१९९८); छंदोमयी (१९८२); जाईचा कुंज (१९३६); जीवन लहरी(१९३३); थांब सहेली (२००२); पांथेय (१९८९); प्रवासी पक्षी (१९८९); मराठी माती (१९६०); महावृक्ष (१९९७); माधवी(१९९४); मारवा (१९९९); मुक्तायन (१९८४); मेघदूत(१९५६); रसयात्रा (१९६९); वादळ वेल (१९६९); विशाखा (१९४२); श्रावण (१९८५); समिधा ( १९४७); स्वगत(१९६२); हिमरेषा(१९६४);

    निबंधसंग्रह : आहे आणि नाही (पुस्तक) – लघुनिबंध संग्रह; प्रतिसाद (पुस्तक) – लघुनिबंध संग्रह

    नाटके : ऑथेल्लो; आनंद; आमचं नाव बाबुराव; एक होती वाघीण; किमयागार; कैकेयी; कौंतेय; जेथे चंद्र उगवत नाही; दिवाणी दावा; दुसरा पेशवा; दूरचे दिवे (रूपांतरित, मूळ इंग्रजी नाटक ॲन आयडियल हजबंड. लेखक ऑस्कर वाईल्ड); देवाचे घर; नटसम्राट; नाटक बसते आहे; बेकेट; महंत; मुख्यमंत्री; ययाति देवयानी; राजमुकुट; विदूषक; वीज म्हणाली धरतीला;

  • वैजयंती

    कथासंग्रह : अंतराळ (कथासंग्रह); अपॉईंटमेंट (कथासंग्रह); एकाकी तारा; काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह); जादूची होडी (बालकथा); प्रेम आणि मांजर (कथासंग्रह); फुलवाली (कथासंग्रह); बारा निवडक कथा (कथासंग्रह); सतारीचे बोल (कथासंग्रह)

    कादंबऱ्या : कल्पनेच्या तीरावर (कादंबरी); जान्हवी (कादंबरी); वैष्णव (कादंबरी)

    आठवणीपर : वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)

    एकांकिका : दिवाणीदावा १९५४, ४ आवृत्ती १९७३; देवाचे घर १९५५, २री आवृत्ती १९७३; नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका१९६०, २ री आवृत्ती १९८६; प्रकाशाची दारे मौज दिवाळी अंक, १९५९; बेत, दीपावली, १९७०; संघर्ष, सुगंध दिवाळी अंक, १९६८.

    लघुनिबंध आणि इतर लेखन : आहे आणि नाही; एकाकी तारा; एखादं पण, एखादं फूल; प्रतिसाद; बरे झाले देवा; मराठीचिए नगरी; विरामचिन्हे

  • के. नारायण काळे

    के. नारायण काळे, पूर्ण नाव -केशव नारायण काळे (जन्म:२४ एप्रिल, इ.स. १९०४; मृत्यू : २० फेब्रुवारी, इ.स. १९७४) हे मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक होते. ते बी.ए. एल्‌‍एल.बी. होते, आणि त्यांचे इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. ग्रीक आणि युरोपियन रंगभूमीचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.

    के.नारायण काळे यांनी लिहिलेली पुस्तके

    अभिनयसाधना (’ॲन ॲक्टर प्रिपेअर्स’ या स्टॅनिलाविस्कीच्या नाट्यशास्त्रावरील ग्रंथाचे भाषांतर- १९७१); कौटिल्य (रूपांतरित नाटक-१९६१); प्रतिमा, रूप आणि रंग (१९७४); मराठी नाटक व मराठी रंगभूमी यासंबंधी समीक्षा-१९६३; सहकारमंजिरी (कवितासंग्रह-१९३२)

    के.नारायण काळे हे संपादक असलेली नियतकालिके

    रत्नाकर (१९२९); प्रतिभा (१९३३-३४); मराठी साहित्य पत्रिका (१९४०-४२; १९४६-७०)

  • केशवकुमार (प्र. के अत्रे)

    प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, इ.स. १८९८ – जून १३, इ.स. १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

    इ.स. १९२३ साली अत्र्यांनी ‘अध्यापन’ मासिक सुरू केले. इ.स. १९२६मध्ये ‘रत्‍नाकर’ व इ.स. १९२९ साली ‘मनोरमा’, आणि पुढे इ.स. १९३५ साली ‘नवे अध्यापन’ व इ.स. १९३९ साली ‘इलाखा शिक्षक’ ही मासिके काढली. जानेवारी १९, इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरु केले. त्यावेळी अत्रे काँग्रेस मध्ये होते. त्यामुळे काँग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.

    आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी)च्या अभ्यासक्रमांत होती.

    नाटके : अशी बायको हवी; उद्याचा संसार; एकच प्याला-विडंबन; कवडीचुंबक; गुरुदक्षिणा; घराबाहेर; जग काय म्हणेल?; डॉक्टर लागू; तो मी नव्हेच; पराचा कावळा; पाणिग्रहण; प्रल्हाद(नाटक); प्रितिसंगम (नाटक); बुवा तेथे बाया; ब्रम्हचारी; भ्रमाचा भोपळा; मी उभा आहे; मी मंत्री झालो; मोरूची मावशी; लग्नाची बेडी; वंदे भारतम; वीरवचन; शिवसमर्थ; सम्राट सिंह; साष्टांग नमस्कार

    काव्य : गीतगंगा; झेंडूची फुले

    कथासंग्रह : अशा गोष्टी अशा गंमती; कशी आहे गम्मत; कावळ्यांची शाळा; फुले आणि मुले; बत्ताशी आणि इतर कथा

    आत्मचरित्र : कर्हेचे पाणी – खंड एक ते पाच

    कादंबर्या : चांगुणा; मोहित्यांचा शाप

    इतर : अत्रेटोला; अत्रेप्रहार; अत्रेवेद; अध्यापक अत्रे; अप्रकाशित आचार्य अत्रे (संपादक : डॉ. नागेश कांबळे); आषाढस्य प्रथम दिवसे; इतका लहान एवढा महान; केल्याने देशाटन; क्रांतिकारकांचे कुलपुरुष; चित्रकथा भाग-१; चित्रकथा भाग-२; जय हिंद जय महाराष्ट्र; झालाच पाहिजे; दलितांचे बाबा; दूर्वा आणि फुले; मराठी माणसे, मराठी मने; महापूर; महाराष्ट्र कालचा आणि आजचा; मी अत्रे बोलतोय; मी कसा झालो?; मुद्दे आणि गुद्दे; वस्त्रहरण; विनोद गाथा; विनोबा; संत आणि साहित्य; समाधीवरील अश्रू; सिंहगर्जना; सुभाष कथा; सूर्यास्त; हंशा आणि टाळ्या; हार आणि प्रहार; हास्यकट्टा; हुंदके

  • केशवसुत

    कृष्णाजी केशव दामले (टोपणनाव: केशवसुत) ( ७ ऑक्टोबर १८६६:मालगुंड – ०७ नोव्हेंबर १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.

    वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते.

    वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते.

  • वि. स. खांडेकर

    विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी ११, १८९८ – सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.

    खांडेकरलिखित पुस्तके

    अजून येतो वासफुलांना; अमृतवेल; अविनाश; अश्रू; अश्रू आणि हास्य; आगरकर : व्यकी आणि विचार; उल्का (१९३४); उःशाप; कल्पलता; कांचनमृग ( १९३१ ); कालची स्वप्ने; कालिका; क्रौंचवध ( १९४२ ); घरटे; घरट्याबाहेर; चंदेरी स्वप्ने; चांदण्यात; जळलेला मोहर ( १९४७ ); जीवनशिल्पी; झिमझिम; तिसरा प्रहर; तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३; ते दिवस, ती माणसे; दंवबिंदू; दोन ध्रुव ( १९३४ ); दोन मने ( १९३८ ); धुके; नवा प्रातःकाल; पहिली लाट; पहिले पान; पहिले प्रेम (१९४०); पाकळ्या; पांढरे ढग (१९४९); पारिजात भाग १, २; पाषाणपूजा; पूजन; फुले आणि काटे; फुले आणि दगड; मंजिर्या; मंझधार; मंदाकिनी; मध्यरात्र; मृगजळातील कळ्या; ययाति; रंग आणि गंध; रिकामा देव्हारा (१९३९); रेखा आणि रंग; वामन मल्हार जोशी: व्यक्ति-विचार; वायुलहरी; वासंतिका; विद्युत् प्रकाश; वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८ ); समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे); समाधीवरील फुले; सहा भाषणे; सांजवात; साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे); सुखाचा शोध; सुवर्णकण; सूर्यकमळे; सोनेरी स्वप्ने भंगलेली; स्त्री आणि पुरुष; हिरवळ; हिरवा चाफा ( १९३८ ); हृदयाची हाक ( १९३०); क्षितिजस्पर्श; लग्न पाहावे करून ईत्यादी

  • ग.ह. पाटील

    प्राचार्य गणेश हरि पाटील (जन्म : १९ ऑगस्ट १९०६; मृत्यू : १ जुलै, १९८९) हे एक मराठी कवी आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत असत. ग.ह. पाटील हे बालसाहित्यिक होते. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी ’बालशारदा’ या ग्रंथाचे संपादन केले. त्या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली होती.

    ग.ह. पाटील यांच्या प्रसिद्ध आणि मुलांच्या आवडत्या कविता : अबलख वारूवरी बैसुनी येती हे पाटिल । भरजरी । शिरीं खुले मंदिल; डरांव डरांव, डरांव डरांव… का ओरडता उगाच राव?”; देवा तुझे किती सुंदर आकाश; पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती; फुलपाखरू छान किती दिसते; माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिलार्‍या बैलाची जोडी हो ईत्यादी

    ग.ह.पाटील यांची पुस्तके : गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता (संकलन, संपादिका मंदा खांडगे); पाखरांची शाळा (बाल कवितासंग्रह); बालशारदा (गद्य); लिंबोळ्या (काव्यसंग्रह) ईत्यादी

  • कवी गिरीश

    शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (ऑक्टोबर २८, इ.स. १८९३:सातारा, महाराष्ट्र, भारत – डिसेंबर ४, इ.स. १९७३) हे मराठी कवी होते.

    लेखन : कांचनगंगा (काव्यसंग्रह); चंद्रलेखा (काव्यसंग्रह); फलभार (काव्यसंग्रह); बालगीत (काव्यसंग्रह); सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह); कवी यशवंत आणि गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे ‘वीणाझंकार’ व ‘यशो-गौरी’ या नावांचे दोन कवितासंग्रह; माधव ज्यूलियन यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड ना.वा. टिळक यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.

  • गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)

    राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात – जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि ‘भावबंधन’ ही चार पूर्ण नाटके (आणि ‘राजसंन्यास’ आणि ‘वेड्यांचा बाजार’ ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते.

    प्रकाशित साहित्य

    काव्यसंग्रह : वाग्वैजयंती हा गडकर्‍यांचा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. मुक्तछंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद दुसर्‍या परिच्छेदात सांगून नंतर कविता पेश करण्याची त्यांची पद्धत कवितेला वाचकाच्या मनात अधिक खोलवर नेते. आपलं लहान बालक मृत्यूशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती ‘राजहंस माझा निजला’ ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितेसाठी गोविंदाग्रज हे टोपण नाव गडकर्‍यांनी घेतले.

    नाटके : एकच प्याला; गर्वनिर्वाण; पुण्यप्रभाव; प्रेमसंन्यास; भावबंधन; मित्रप्रीती (अप्रकाशित); राजसंन्यास; वेड्याचा बाजार

    अन्य साहित्य : चिमुकली इसापनीती; समाजात नटाची जागा; नाट्यकलेची उत्पत्ती; गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र

  • ग्रेस (माणिक गोडघाटे)

    माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७ – २६ मार्च, २०१२) हे मराठी कवी होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसरऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. “वाऱ्याने हलते रान” ह्या त्यांच्या ललितलेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता.

    प्रकाशित साहित्य

    ओल्या वेळूची बासरी (ललित लेखसंग्रह) २०१२; कावळे उडाले स्वामी (ललित लेखसंग्रह) २०१०; चंद्रमाधवीचे प्रदेश (पॉप्युलर प्रकाशन) १९७७; चर्चबेल (ललित लेखसंग्रह) १९७४; मितवा (ललित लेखसंग्रह) १९८७; बाई! जोगिया पुरुष (कवितासंग्रह) ; मृगजळाचे बांधकाम (ललित लेखसंग्रह) २००३; राजपुत्र आणि डार्लिंग (कवितासंग्रह) १९७४; वार्याने हलते रान (ललित लेखसंग्रह) २००८; संध्याकाळच्या कविता (कवितासंग्रह) १९६७; संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (ललित लेखसंग्रह) २०००; सांजभयाच्या साजणी (कवितासंग्रह) २००६; सांध्यपर्वातील वैष्णवी (कवितासंग्रह) १९९५.

  • चंद्रशेखर

    चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे तथा कवी चंद्रशेखर (२९ जानेवारी, इ.स. १८७१:नाशिक, महाराष्ट्र, भारत — १७ मार्च, इ.स. १९३७:वडोदरा, गुजरात) हे मराठी कवी होते.

    प्रकाशित साहित्य

    अर्वाचीन कविता; उघडं गुपित (कथाकाव्य); कविता रति; किस्मतपूरचा जमीनदार (कथाकाव्य-१९३६); गोदागौरव (स्तोत्रकाव्य); चंद्रिका (स्फुट कवितांचा काव्यसंग्रह -१९३२); चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल पेन्सरोझोचे मराठी रूपांतर); चैतन्यदूत (दीर्घकाव्य); धनगर (दीर्घकाव्य); रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल’ आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर; स्वदेशप्रीती (दीर्घकाव्य)

  • ना.वा. टिळक

    नारायण वामन टिळक (जन्म – ६ डिसेंबर, इ.स. १८६१ – ९ मे, इ.स. १९१९) हे मराठी लेखक होते. ना. वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी व तीक्ष्ण बुद्धीचे होते. ते मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचे जाणकार होते. त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. ते शीघ्रकवी होते.

    रेव्ह. ना.वा. टिळकांचे लेखन : दशावतारी नाटकांसाठी काही आख्याने आणि पदे; सं. गोदुःख विमोचन (हे मराठीतले आद्य पथनाट्य); शीलं परं भूषणम्‌ (विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले नाटक); स्व-राज्य हे खरे स्वराज्य; स्वराज्य आणि स्त्रिया (ख्रिस्ती मुलींसाठी लिहिलेली नाटुकली); ख्रिस्तायन (महाकाव्य)

  • लक्ष्मीबाई टिळक

    लक्ष्मीबाई टिळक (इ.स. १८६८ – इ.स. १९३६) या मराठी भाषेतील लेखिका होत्या. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव मनकर्णिका गोखले होते. अक्षरओळख नसलेल्या, परंतु मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्राच्या लेखिका म्हणजे लक्ष्मीबाई टिळक.

    लक्ष्मीबाई कधीही शाळेत गेल्या नाहीत. मात्र उतारवयात त्यांना आचार्य प्र. के. अत्रे यांनी ‘साहित्यलक्ष्मी’ हे बिरुद बहाल केलं. कारण त्यांची कल्पनातीत साहित्यसेवा. त्यांनी अनेक भक्तिगीतं, अभंग लिहिले. त्यांच्या कवितांचा भरली घागर हा संग्रह, आपल्या जीवनातील आठवणींचे ‘स्मृतिचित्रं’ हे चरित्र, ‘ख्रिस्तायन’ हे ओवीबद्ध-ख्रिस्तचरित्र वर्णन करणारे महाकाव्य प्रसिद्ध आहे. त्या उत्तम कीर्तनकार होत्या.

  • ग. ल. ठोकळ

    गजानन लक्ष्मण ठोकळ मराठी रसिकांना कवी आणि कथाकार या दोन्ही नात्यानी सुपरिचित आहेत. पण कथाकार म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात अधिक खोल ठसलेली आहे. अर्धशतकापूर्वी लिहिलेल्या ‘कडू साखर’, ‘गोफणगुंडा’, ‘निळे डोळे’, ‘सुगंध’, ‘मोत्याचा चारा’सारख्या ठोकळांच्या कथा आजही तितक्याच हृद्य, वेधक वाटतात. शांता शेळकेंच्य शब्दात, ग्रामीण लेखक म्हणून ठोकळ हे नाव ठळकपणे नोंदलेले गेलेले असले तरी ठोकळांच्या कथाविश्वाचा पल्ला आणि आवाका त्यांच्या कितीतरी पलीकडे विस्तारलेला आहे. त्यांनी निर्माण केलेले स्त्री-पुरुषांचे चित्रविचित्र जग हा वास्तव विश्वाचा एक छेद आहे. वाचकाचे रंजन करताकरता प्रत्यक्ष जीवनातील विविध अनुभवांचा त्यांना प्रत्यय देणारा हा एक समर्थ कथाकार. रसाळ गोष्टीवेल्हाळ निवेदक तितकाच जागरूक विचारवंत.

  • बहिणाबाई चौधरी

    बहिणाबाई नथुजी चौधरी (११ ऑगस्ट, इ.स. १८८० – ३ डिसेंबर, इ.स. १९५१) या अहिराणी-मराठी कवयित्री होत्या. बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा) ह्या गावी झाला. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. तीत त्यांचे सारे आयुष्य गेले, त्या शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे अहिराणीत ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.

    महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, “अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे.

    बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.

    बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे.

  • बा.भ. बोरकर

    बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (नोव्हेंबर ३०, इ.स. १९१० – जुलै ८, इ.स. १९८४) हे मराठी भाषेतील आणि कोंकणी भाषेतील पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते.बा.भ.बोरकर हे मराठी साहित्य प्रेमी व एक उत्कृष्ट कवी देखील होते.

    प्रकाशित साहित्य    ; अनुरागिणी (कवितासंग्रह) १९८२; आनंदभैरवी (कवितासंग्रह) १९५०; कांचनसंध्या (कवितासंग्रह) १९८१; गितार (कवितासंग्रह) १९६५; चित्रवीणा (कवितासंग्रह) १९६०; चिन्मयी (कवितासंग्रह) १९८४; चैत्रपुनव (कवितासंग्रह) १९७०; जीवनसंगीत (कवितासंग्रह) १९३७; दूधसागर (कवितासंग्रह) १९४७; प्रतिभा (कवितासंग्रह) १९३०; कागदी होड्या (लघुनिबंध) १९३८; मावळता चंद्र (कादंबरी) १९३८; अंधारातील वाट (कादंबरी) १९४३; जळते रहस्य (कादंबरी (भाषांतरित)) १९४५; भावीण (कादंबरी) १९५०; बापूजींची ओझरती दर्शने (भाषांतर) १९५०; आम्ही पाहिलेले गांधीजी (भाषांतर) १९५०; काचेची किमया (भाषांतर) १९५१; गीता-प्रवचनां ((विनोबांच्या गीताप्रवचनांचे कोंकणी भाषांतर)) १९५६; संशयकल्लोळ (भाषांतर) १९५७; बोरकरांची कविता (कवितासंग्रह (आरंभापासूनच्या पाच कवितासंग्रहांचे संकलित प्रकाशन)) १९६०; प्रियदर्शनी (कथासंग्रह) १९६०; माझी जीवनयात्रा (भाषांतर) १९६०; गीताय (भाषांतर (भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद)) १९६०; पांयजणां (कवितासंग्रह) १९६०; आनंदयात्री रवींद्रनाथ : संस्कार आणि साधना (चरित्रपर) १९६४; चांदणवेल (बोरकरांच्या निवडक मराठी कविता) (कवितासंग्रह (संपादित)) १९७२; वासवदत्ता : एक प्रणयनाट्य (भाषांतर) १९७३; संशयकल्लोळ (मूळ ले. मोलियर, मराठी रूपांतर : गो. ब. देवल) (भाषांतर) १९७६; पैगंबर (ले. खलील जिब्रान) (भाषांतर) १९७६; मेघदूत (समश्लोकी, समवृत्त, सयमक भाषांतर) १९८०; सासाय (कवितासंग्रह) १९८०; बामण आनी अभिसार (भाषांतर) १९८१; चांदण्याचे कवडसे (ललित लेखसंग्रह) १९८२; समुद्राकाठची रात्र (लघुकथासंग्रह) १९८२; पावलापुरता प्रकाश (ललित लेखसंग्रह) १९८३; प्रियकामा (कादंबरी) १९८३; भगवान बुद्ध (ले. धर्मानंद कोसंबी) (भाषांतर) १९८३; कौतुक तू पाहे संचिताचे (आत्मचरित्र (अपूर्ण) (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित) २०१०; बा. भ. बोरकरांचे अप्रकाशित साहित्य (लेखन-संग्रह (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)) २०१०; अप्रकाशित बाकीबाब (लेखन-संग्रह (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)) २०१०; महात्मायन (महाकाव्य-अपूर्ण) ईत्यादी

  • बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

    त्र्यंबक बापूजी ठोंबरे

    जन्म इ.स.१८९०

    महाराष्ट्र, भारत

    मृत्यू इ.स.१९१८

    ,महाराष्ट्र, भारत

    राष्ट्रीयत्व        भारत भारतीय

    कार्यक्षेत्र        साहित्य

    भाषा            मराठी

    साहित्य प्रकार            कविता

    वडील           बापूजी ठोंबरे

    बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.

    बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते.

    मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना. धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल.

  • कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते)

    नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी (जून १, १८७२ – ऑगस्ट ३०, १९४७) हे मराठी कवी होते. त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत. त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका’ १८९१ साली ‘करमणूक’ मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्‌मुख स्वभावामुळे ‘कवी बी’ कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.

    ‘फुलांची ओंजळ’ हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे. पिकले पान हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. त्यात ११ कविता होत्या. कवी बी यांनी एकून ४९ कविता लिहिल्या. फुलांची ओंजळची दुसरी आवृत्ती सप्टेंबर १९४७ मध्ये प्रसिद्ध झाली.

    प्रकाशित काव्यसंग्रह

    पिकले पान; फुलांची ओंजळ (१९३४)

    प्रसिद्ध कविता

    चाफा (चाफा बोलेना, चाफा चालेना..); माझी कन्या (गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या…); दीपज्योतीस; बंडवाला; कविवंदन

  • भवानीशंकर पंडित

    भवानीशंकर श्रीधर पंडित (भ.श्री. पंडित) हे एक मराठी लेखक व कवी होते.

    भवानीशंकर पंडित यांच्या शालेय पाठ्यपुस्तकांतील कविता : चिऊताईचीं पिलें; बाळाची बोली

    भवानीशंकर पंडित यांची प्रसिद्ध भावगीते : गेले ते दिन गेले (ध्वनिमुद्रित; गायक – हृदयनाथ मंगेशकर; संगीत दिग्दर्शक – श्रीनिवास खळे)

    भ.श्री. पंडित यांनी लिहिलेली पुस्तके : कवी गोविंदाग्रज

  • भा. रा. तांबे

    भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ – डिसेंबर ७, १९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.

    त्यांच्या काही प्रसिद्ध कविता

    अजुनि लागलेचि दार; कशी काळ नागिणी; कळा ज्या लागल्या जीवा; कुणि कोडे माझे उकलिल का; घट तिचा रिकामा; घन तमीं शुक्र बघ; चरणि तुझिया मज देई; जन पळभर म्हणतील हाय हाय; डोळे हे जुलमि गडे; तिनी सांजा सखे मिळाल्या; तुझ्या गळा माझ्या गळा; ते दूध तुझ्या त्या; नववधू प्रिया मी बावरतें; निजल्या तान्ह्यावरी माउली; पिवळे तांबुस ऊन कोवळे; भाग्य उजळले तुझे; मधु मागशी माझ्या; मावळत्या दिनकरा; या बाळांनो या रे या; रे हिंदबांधवा थांब ईत्यादी

  • बा. सी. मर्ढेकर

    बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ – मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्‍या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.

    परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.

    प्रकाशित साहित्य

    मर्ढेकरांची कविता; रात्रीचा दिवस/तांबडी माती/पाणी (कादंबर्‍या); सौंदर्य आणि साहित्य; कला आणि मानव

  • ग.त्र्यं. माडखोलकर

    गजानन त्र्यंबक माडखोलकर (जन्म : मुंबई, डिसेंबर २८, १९०० – मृत्यू : नागपूर, नोव्हेंबर २७, १९७६) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत.

    प्रकाशित साहित्य

    कादंबर्या : अनघा; उद्धार; ऊर्मिला; कांता; चंदनवाडी; डाक बंगला; दुहेरी जीवन; नवे संसार; नागकन्या; प्रमद्वरा; भंगलेलें देऊळ; मुक्तात्मा; मुखवटे; रुक्मिणी; शाप; श्रीवर्धन; सत्यभामा; स्वप्नांतरिता

    लघुकथासंग्रह : रातराणीची फुले; शुक्राचे चांदणे

    नाटके : देवयानी

    ललित आणि राजकीय लेखसंग्रह : अवशेष; जीवनसाहित्य; परामर्श; महाराष्ट्राचे विचारधन; माझी नमोवाणी; माझे आवडते लेखक; माझे लेखनगुरू; विलापिका; विष्णु कृष्ण चिपळूणकर : टीकात्मक निबंध; स्वैरविचार

    व्यक्तिचित्रणे : व्यक्तिरेखा; व्यक्ती तितक्या प्रकृती; श्रद्धांजली

    आत्मचरित्रपर : एका निर्वासिताची काहणी; दोन तपे; मी आणि माझे वाचक; मी आणि माझे साहित्य; मृत्युंजयाच्या सावलीत

    प्रवासवर्णनपर : मी पाहिलेली अमेरिका

    समीक्षा ग्रंथ : भारतीय साहित्यशास्त्र

  • ग. दि. माडगूळकर

    माडगूळकर गजानन दिगंबर : (१ ऑक्टोबर १९१९– १४ डिसेंबर १९७७). विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संगृहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).

    माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.

    त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल (पटकथा, संवाद, गीते १९५०), बाळा जो जो रे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), पेडगावचे शहाणे (१९५२), ऊन पाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), जगाच्या पाठीवर (१९६०), संथ वाहते कृष्णामाई (१९६७) ह्यांचा समावेश होतो. (कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांपैकी सर्व वा काही).

    तुफान और दिया (१९५६), दो आँखे बारह हाथ (१९५७), गूँज उठी शहनाई (१९५९) हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट.

    माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत.

  • मंगेश पाडगावकर

    मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत – डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पाडगांवकरांची कविता प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं हि कविता खूपच गाजली आहे.

    प्रकाशित साहित्य :

    अफाटराव; आता खेळा नाचा; आनंदऋतू; आनंदाचे डोही; उदासबोध (कवितासंग्रह); उत्सव (कवितासंग्रह); कबीर (कवितासंग्रह) (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद); कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह); काव्यदर्शन (कवितासंग्रह); गझल (कवितासंग्रह); गिरकी (कवितासंग्रह); चांदोमामा (कवितासंग्रह); छोरी (कवितासंग्रह); जिप्सी (कवितासंग्रह); ज्युलिअस सीझर (नाटक); झुले बाई झुला; तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह); तृणपर्णे (कवितासंग्रह); त्रिवेणी (कवितासंग्रह); धारानृत्य (कवितासंग्रह); नवा दिवस; निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह); फुलपाखरू निळं निळं; बबलगम; बोलगाणी (कवितासंग्रह); भटके पक्षी (कवितासंग्रह); भोलानाथ; मीरा (कवितासंग्रह); (मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद); मुखवटे (कवितासंग्रह); मोरू (कवितासंग्रह); राधा (कवितासंग्रह); रोमिओ आणि ज्युलिएट (विल्यम शेक्सपियरच्या ‘रोमिओ आणि ज्युलिएट’ या नाटकाचे मुळाबरहुकूम भाषांतर); वाढदिवसाची भेट; वात्रटिका (कवितासंग्रह); वादळ ( नाटक); विदूषक; वेड कोकरू; शब्द; शर्मिष्ठा (कवितासंग्रह); शोध कवितेचा; सलाम (कवितासंग्रह); सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह); सूर आनंदघन (कवितासंग्रह); सूरदास (कवितासंग्रह); क्षणिका ईत्यादी

  • माधव ज्युलिअन

    डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (२१ जानेवारी, इ.स. १८९४; बडोदा – २९ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.[१]. हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले [ संदर्भ हवा ]. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते.

    गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते [ संदर्भ हवा ]. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

    पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.

    प्रकाशित साहित्य

    फारसी – मराठी शब्दकोष (इ.स. १९२५); विरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य); नकुलालङ्कार (इ.स्. १९२९, दीर्घकाव्य); स्वप्नरंजन (१९३४, काव्यसंग्रह); गज्जलांजली(१९३३, स्फुट गझला); तुटलेले दिवे (१९३८, एक ‘सुनितांची माला’नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता); उमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद); द्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर); मधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर); सुधारक (१९२८, दीर्घकाव्य); भाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे); छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक); काव्यविहार (इ.स. १९४७, लेखसंग्रह); काव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)  ईत्यादी

    प्रसिद्ध कविता : कशासाठी पोटासाठी; जीव तुला लोभला माझ्यावरी; प्रेम कोणीही करीना; प्रेमस्वरूप आई; मराठी असे आमुची मायबोली ईत्यादी

  • वा.गो. मायदेव

    कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा. गो. मायदेव (जन्म – जन्म २६ जुलै १८९४)  हे माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी.  गंभीर  विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते. ‘काव्यमकरंद’, ‘भावतरंग’, ‘भावनिर्झर’, ‘सुधा’, ‘भावविहार’ हे त्यांचे काव्यसंग्रह; तर ‘बालविहार’, ‘किलबिल’, ‘शिशुगीत’, ‘क्रीडागीत’ हे बालगीतसंग्रह प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मायदेव यांनी केले होते.

  • कवी यशवंत

    यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. ‘महाराष्ट्रकवी’ म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते.

    आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. रविकिरण मंडळातील सप्तर्षींमध्ये माधव जूलियन सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे. जीवनाचे विविध पैलू यशंवतांनी आपल्या कवितेतून आकळले. त्यांची कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली.

    प्रकाशित साहित्य

    यशोधन (कवितासंग्रह); मित्रप्रेम रहस्य (कवितासंग्रह); तुटलेला तारा (कवितासंग्रह); यशवंती (कवितासंग्रह); बंदिशाळा (कवितासंग्रह); यशोगंध (कवितासंग्रह); यशोनिधी (कवितासंग्रह); जयमंगला (); पाणपोई (कवितासंग्रह); वाकळ (कवितासंग्रह); छत्रपति शिवराय (खंडकाव्य); घायाळ (अनुवादित कादंबरी); प्रापंचिक पत्रे

  • वसंत बापट

    विश्‍वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट (२५ जुलै, इ.स. १९२२ – १७ सप्टेंबर, इ.स. २००२) हे मराठी कवी होते. लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्‍न होते. ‘बिजली’ ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. ‘अकरावी दिशा’, ‘सकीना’ आणि ‘मानसी’ हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट इ.स. १९८३ ते इ.स. १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते.

    पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा’ ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. ‘गगन सदन तेजोमय’ सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, सांगून गेली.

    प्रकाशित साहित्य

    काव्यसंग्रह : अकरावी दिशा; अनामिकाचे अभंग आणि इतर कविता; अबडक तबडक (बालकवितासंग्रह); अहा, देश कसा छान; आजची मराठी कविता (संपादित, सहसंपादन डॉ. चारुशीला गुप्ते); आम्हा गरगर गिरकी (बालकवितासंग्रह); चंगा मंगा (बालकवितासंग्रह); ताणेबाणे; तेजसी; परीच्या राज्यात (बालकवितासंग्रह); प्रवासाच्या कविता; फिरकी (बालकवितासंग्रह); फुलराणीच्या कविता (बालकवितासंग्रह); बिजली; मानसी; मेघहृदय; रसिया; राजसी; शततारका; शतकांच्या सुवर्णमुद्रा; शिंग फुंकिले रणी; शूर मर्दाचा पोवाडा; सकीना; सेतू ईत्यादी

    गाजलेल्या कविता : आभाळाची आम्ही लेकरे; उत्तुंग आमुची उत्तर सीमा; केवळ माझा सह्यकडा; गगन सदय तेजोमय; देह मंदिर चित्त मंदिर; फुंकर; बाभुळझाड; शतकानंत आज पाहिली; सदैव सैनिका, पुढेच जायचे; सैन्य चालले पुढे वगैरे

  • वा. भा. पाठक

    वामन भार्गव ऊर्फ वा. भा. पाठक (जन्म १९ ऑगस्ट १९०५ – २७ जानेवारी १९८९) कवी, कादंबरीकार, समीक्षक अशा विविध नात्यांनी पाठक यांनी वाङ्मयक्षेत्रात लेखन केले़; पण प्रामुख्याने त्यांची ओळख आहे ती कवी म्हणूनच. ‘प्रवासी’ हे त्यांचे खंडकाव्य विशेष प्रसिद्ध असून, ‘आशागीत’ या संग्रहात त्यांच्या निवडक कवितांचा समावेश आहे. प्रवासी, मानवता, ओढणी ही त्यांची खंडकाव्येही प्रसिद्ध आहेत.

    खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे; चिंधड्या उडवीन राई राईएवढ्या.. ही कविवर्य वामन भार्गव ऊर्फ वा. भा. पाठक यांची ही कविता सगळ्यांना आठवत असेल.

    पाठक यांच्या कवितेचे गुणगान करताना अत्रे यांनी म्हटले होते, ”… पाठकांच्या काव्यगुणाचा प्रथम परिचय मला त्यांच्या ‘शिवराज आणि बालवीर’ या सुंदर नाट्यगीतामुळे झाला. ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या! उडवीन राइ राइएवढ्या! ‘ अशा झणझणीत इशाऱयाच्या शब्दांनी सुरवात झालेल्या या तडफदार काव्यात चिमुकल्या सावळ्याच्या तेजस्वी स्वभावाचे व तिखट इमानाचे चित्र पाठक यांनी भरदार रंगात रंगविलेले आहे. शितावरून भाताची परीक्षा करणे हे वाङ्मयात पुष्कळ वेळा धोक्याचे असते, हे माहीत असूनसुद्धा त्या एकाच कवितेवरून पाठकांच्या उच्च काव्यशक्तीसंबंधी त्या वेळी मी जी अटकळ बांधिली होती, ती तदनंतर त्यांच्या वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या कवितांच्या व आता एकत्रितस्वरूपात प्रसिद्ध होत असलेल्या या त्यांच्या गीतसंग्रहाच्या (आशादीप) वाचनाने खरी ठरली आहे, हे पाहून मला फार आनंद वाटतो. ”

  • वा.रा कांत

    वामन रामराव कांत (ऑक्टोबर ६, १९१३ – सप्टेंबर ८, १९९१) हे मराठी कवी, गीतकार होते.

    गाजलेल्या कविता/गाणी : आज राणी पूर्विची ती प्रीत तू मागू नको; त्या तरुतळी विसरले गीत; बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात; राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्न माझे ?; सखी शेजारिणी, तू हसत रहा; हास्यांत पळे गुंफीत रहा ईत्यादी

    काव्यसंग्रह : दोनुली; पहाटतारा; बगळ्यांची माळ; ‘मरणगंध’ (नाट्यकाव्य); मावळते शब्द; रुद्रवीणा; वाजली विजेची टाळी; वेलांटी; शततारका (१९५०); सहज लिहिता लिहिता ईत्यादी

  • वि.द. घाटे

    वि.द. घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८ जानेवारी, १८९५ – ३ मे, १९७८) हे मराठी कवी, लेखक होते. वि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार वापरले. आचार्य अत्रे यांच्या बरोबर त्यांनी ’नवयुग वाचनमाला’ संपादित केली. त्यांनी महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली गेलेली वाचनमाला लिहिली.

    प्रकाशित साहित्य

    काही म्हातारे व एक म्हातारी (व्यक्तिचित्रण); दिवस असे होते (आत्मचरित्र); नाट्यरूप महाराष्ट्र (नाट्येतिहास); पांढरे केस हिरवी मने; मधु-माधव (काव्यसंग्रह(सहकवी माधव ज्युलियन)); बाजी आणि डॅडी ईत्यादी

  • विंदा करंदीकर

    गोविंद विनायक करंदीकर उर्फ ‘विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले.

    समग्र वाङ्मय

    काव्यसंग्रह : धृपद; जातक; विरूपिका; अष्टदर्शने; स्वेदगंगा; मृद्गंध

    संकलित काव्यसंग्रह : आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन – विजया राजाध्यक्ष); विंदा करंदीकर यांची समग्र कविता; संहिता (इ.स. १९७५) (संपादन – मंगेश पाडगावकर)

    बालकविता संग्रह : अजबखाना; पिशीमावशी आणि तिची भुतावळ; अडम तडम; बागुलबोवा; एकदा काय झाले; राणीची बाग; एटू लोकांचा देश; सर्कसवाला; टॉप; सशाचे कान; परी गं परी; सात एके सात

    ललित निबंध : आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५); करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६); स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८); समीक्षा

    उद्गार (इ.स. १९९६); परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)

    इंग्रजी समीक्षा : अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७); लिटरेचर अॅज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)

    अनुवाद : अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७); फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५); राजा लिअर (इ.स. १९७४) (मूळ लेखक- विल्यम शेक्सपियर)

    अर्वाचीनीकरण : संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर (इ.स. १९८१)

  • कवी विनायक (विनायक जनार्दन करंदीकर)

    विनायक जनार्दन करंदीकर ऊर्फ कवी विनायक (जन्म:धुळे, सप्टेंबर १५, १८७२ – मार्च ३०, १९०९) हे मराठी भाषेतील कवी होते. यांनी एक मित्र या टोपणनावाने देखील लेखन केले. आधुनिक कविपंचकातील ते एक होते.

    विनायकांनी विपुल कविता लिहिलेली आहे. राष्ट्रभक्तिपर कविता, प्रणयरम्य कविता, वीररसयुक्त कविता, हिरकणी, अहल्या, पन्ना, पद्मिनी, राणी दुर्गावती, संयोगिता, तारा यांच्यासारख्या वीरांगनांची मुक्तकंठाने प्रशंसा करणारी कविता वगैरे उल्लेखनीय कविता त्यांनी लिहिल्या आहेत.

    उद्गार (इ.स. १९९६); परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)

    इंग्रजी समीक्षा : अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७); लिटरेचर अॅज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)

    अनुवाद : अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७); फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५); राजा लिअर (इ.स. १९७४) (मूळ लेखक- विल्यम शेक्सपियर)

    अर्वाचीनीकरण : संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर (इ.स. १९८१)

  • शांता शेळके

    जन्म ऑक्टोबर १२, १९२२

    इंदापूर (पुणे जिल्हा), महाराष्ट्र, भारत

    मृत्यू जून ६, २००२

    पुणे, महाराष्ट्र, भारत

    राष्ट्रीयत्व        भारत भारतीय

    कार्यक्षेत्र        साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण

    भाषा            मराठी

    साहित्य प्रकार

    कथा, कादंबरी, कविता,

    चरित्र लेखन, वृत्तपत्रांत सदरलेखन

    वडील           जनार्दन शेळके

    शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ – जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या.

    प्रकाशित साहित्य

    अंगतपंगत; अनोळख; अलौकिक; आतला आनंद; आंधळी; आंधळ्याचे डोळे; इतस्तत:; इतार्थ; एक गाणे चुलीचे; कविता विसावया शतकाची; कविता स्मरणातल्या; कळ्यांचे दिवस फुलांच्या राती; काही जवळ काही दूर; किनारे मनाचे; गोंदण; चौघीजणी; जन्मजान्हवी; जाणता अजाणता; तोच चंद्रमा; त्रिवेणी : गुलजार; धूळपाटी; नक्षत्रचित्रे; निवडक शांता शेळके; पत्रम् पुष्पम्; पावसाआधीचा पाऊस; पूर्वसंध्या; बासरी; मधुसंचय; मनातले घर; मेघदूत; रंगरेषा; रूपसी; रेशीमरेघा; ललित नभी मेघ चार; लेकुरवाळी; वडीलधारी माणसं; वर्षा; शांतस्मरण; श्रावण शिवरा; सतीचा वाडा; संस्मरणे; सांगावेसे वाटले म्हणून; सुवर्णमुद्रा ईत्यादी

  • फ.मुं. शिंदे

    महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील ‘रुपूर’ गावी १९४८ साली फकीरराव मुंजाजी शिंदे यांचा जन्म झाला. ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं’, असा अंतरीचा उमाळा ‘आई’ या कवितेमधून व्यक्त करणारे ज्येष्ठ कवी प्रा. फकीरराव मुंजाजी शिंदे पेशाने मराठीचे प्राध्यापक आहेत. फ. मुं. यांनी केवळ कविताच लिहिल्या नाहीत तर त्याचबरोबर त्यांनी समीक्षात्मक, ललित लेखनही केलं. त्यांनी मराठीत उपरोधिक अंगाने लेखन केले. त्यांनी नेहमीच भावपूर्ण, संवेदनशील लेखन केलं. याचं कारण त्यांचा स्वभावही तसाच आहे. त्यांचं लेखन अंत:करणाला भिडणारं असून ते अंतर्मुख करणारं आहे.

    प्रकाशित साहित्य

    अवशेष (१९७९); आई आणि इतर कविता; आदिम (१९७५); आयुष्य वेचताना; कबंध; कालमान (काव्यसमीक्षा); गणगौळण; गाथा; गौरवग्रंथ; जुलूस; दिल्ली ते दिल्ली; फकिराचे अभंग; निरंतर; निर्मिकाचं निरूपण; निर्वासित नक्षत्र; पाठभेद; प्रार्थना; फकिराचे अभंग; मिथक; मी सामील समूहात; मेणा; लाकडाची फुले; लोकगाणी; वृंदगान; सार्वमत; सूर्यमुद्रा; स्वान्त (१९७३); क्षेत्र

  • वि.दा. सावरकर

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर – २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.

    सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.

    सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या; त्या जुलै २०१३मध्ये सापडल्या. नंतर त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या. सावरकरांच्या गझला, काही हिंदी कविता आणि आणि मराठीतून हिंदीत भाषांतरित केलेल्या सावरकरांच्या काही रचना यांची एक सीडी निघाली आहे. सीडीतील कविता जावेद अली, जसविंदर नरुला, स्वप्नील बांदोडकर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, साधना सरगम आणि वैशाली सामंत यांनी गायल्या आहेत.

    ग्रंथ आणि पुस्तके

    वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या “सागरा प्राण तळमळला”, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “जयोस्तुते”, “तानाजीचा पोवाडा” ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.

    इतिहास : १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा पहिले स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास]ला जोडला); भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

    कथा : सावरकरांच्या गोष्टी भाग – १; सावरकरांच्या गोष्टी भाग – २

    कादंबरी : काळेपाणी; मोपल्यांचे बंड अर्थात् मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.

    आत्मचरित्रपर : माझी जन्मठेप; शत्रूच्या शिबिरात; अथांग (आत्मचरित्र पूर्वपीठिका)

    हिंदुत्ववाद : हिंदुत्व; हिंदुराष्ट्र दर्शन; हिंदुत्वाचे पंचप्राण

    लेखसंग्रह : गरमागरम चिवडा; गांधी गोंधळ; जात्युच्छेदक निबंध; तेजस्वी तारे; मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना – अनुवादित; लंडनची बातमीपत्रे; विज्ञाननिष्ठ निबंध; सावरकरांची राजकीय भाषणे; सावरकरांची सामाजिक भाषणे; स्फुट लेख

    नाटके : संगीत उत्तरक्रिया; संगीत उःशाप; बोधिवृक्ष (अपूर्ण); संगीत संन्यस्तखड्ग

    महाकाव्ये : कमला; गोमांतक; विरहोच्छ्वास; सप्तर्षी

    स्फुट काव्य : सावरकरांच्या कविता

  • सुरेश भट

    सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते.

    त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली.

    काव्यसंग्रह : एल्गार; काफला; झंझावात; रंग माझा वेगळा (१९७४); रसवंतीचा मुजरा; रूपगंधा; सप्‍तरंग; सुरेश भट – निवडक कविता; हिंडणारा सूर्य (गद्य)

  • वि.म. कुलकर्णी

    वि.म. कुलकर्णी (ऑक्टोबर ७, इ.स. १९१७ – मे १३, २०१०) हे मराठी भाषेतील कवी आणि बालकुमार-साहित्यिक होते. ’नाटककार खाडिलकर’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी १९५० मध्ये पीएच.डी. संपादन केली.

    प्रकाशित साहित्य

    अंगत पंगत (बालकवितासंग्रह); आश्विनी (काव्यसंग्रह); कमळवेल (काव्यसंग्रह); गाडी आली गाडी आली झुक झुक झुक (बालगीत); गरिबांचे राज्य (चित्रपटकथा); चंद्राची गाडी (बालकवितासंग्रह); चालला चालला लमाणांचा तांडा(पाठ्यपुस्तकातली कविता); छान छान गाणी (बालकवितासंग्रह); झपूर्झा (ग्रंथसंपादन); नवी स्फूर्तिगीते (बालगीते); नौकाडुबी (अनुवादित कादंबरी); न्याहारी (कथासंग्रह); पहाटवारा (काव्यसंग्रह); पाऊलखुणा (काव्यसंग्रह); पेशवे बखर (ग्रंथसंपादन); प्रसाद रामायण (काव्यसंग्रह); फुलवेल (बालकवितासंग्रह); भाववीणा (काव्यसंग्रह); मराठी सुनीत (ग्रंथसंपादन); मला जगायचंय (कादंबरी); मुक्तेश्वर सभापर्व (ग्रंथसंपादन); मृगधारा (काव्यसंग्रह); रंगपंचमी (बालकवितासंग्रह); रामजोशीकृत लावण्या (ग्रंथसंपादन); रामसुतकृत साधुविलास (संपादित ग्रंथ); ललकार (बालकवितासंग्रह); विसर्जन (काव्यसंग्रह-१९४३); वृत्ते व अलंकार (भाषाशास्त्र); साहित्य दर्शन (ग्रंथसंपादन); साहित्यशोभा वाचनमाला (संपादित ग्रंथ)

    प्रसिद्ध कविता

    आम्ही जवान देशाचे (कविता) (गायक : पंडितराव नगरकर); एक अश्रू (कविता); एक दिवस असा येतो (कविता); गाडी आली गाडी आली झुक झुक झुक (कविता); माझा उजळ उंबरा (कविता) (गायक : गजानन वाटवे); माझा (कविता) (गायक : गजानन वाटवे); माझ्या मराठीची गोडी (कविता) (गायक : कमलाकर भागवत); लमाणांचा तांडा (कविता); सावधान (कविता)(गायक : वसंतराव देशपांडे)

  • नामदेव ढसाळ

    नामदेव लक्ष्मण ढसाळ (फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ – जानेवारी १५, इ.स. २०१४) हे मराठी कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि बौद्ध-दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोली भाषेत लेखन करणारे ते मराठीतले एक महत्त्वाचे लेखक होते. दलित समाजात आपल्या कविताच्या माध्यमातून जनजागृती केली.

    साहित्यकृती

    कविता संग्रह : आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी (१९७६); खेळ (१९८३); गोलपीठा (१९७२); तुझे बोट धरून चाललो आहे; तुही इयत्ता कंची (१९८१); मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात; मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५); या सत्तेत जीव रमत नाही (१९९५); मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह); गांडू बगीचा; तुझे बोट धरुन चाललो आहे; निर्वाणा अगोदरची पीडा

    चिंतनपर लेखन : सर्व काही समष्टीसाठी; बुद्ध धर्म: काही शेष प्रश्न; आंबेडकरी चळवळ; आंधळे शतक; दलित पँथर- एक संघर्ष (हे पुस्तक नामदेव ढसाळ यांच्या मृत्यूनंतर त्‍यांच्या पहिल्या मासिक स्मृतिदिनी, म्हणजे १५ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रकाशित झाले.)

    कादंबरी : निगेटिव्ह स्पेस; हाडकी हाडवळा; उजेडाची काळी दुनिया

    नाटक : अंधार यात्रा

  • गुरु ठाकूर

    गुरू ठाकूर ( जन्म जुलै १८) हा मराठी गीतकार, पटकथा-संवादलेखक, नाटककार, चित्रपट-अभिनेता आहे.

    मराठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गुरु ठाकूर यांनी स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा, संवाद लेखक, गीतकार अशी चौफेर मुशाफिरी केली असून त्यांतल्या प्रत्येक क्षेत्रात लोकप्रियतेसोबत त्या त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्तम छायाचित्रकार, अभिनेता आणि कवी म्हणूनही त्यांनी स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे.

    चित्रपट : अगं बाई अरेच्चा! – संवाद ,गीते; गोलमाल – गीते; मातीच्या चुली – गीते; घर दोघांचे – गीते; लेक लाडकी – गीते; तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं – गीते; अनोळखी हे घर माझे – गीते; सुंदर माझे घर – गीते; ऑक्सिजन – गीते; मर्मबंध – संवाद, गीते; मी शिवाजीराजे भोसले बोलतोय – गीते; शिक्षणाच्या आईचा घो – गीते; नटरंग – संवाद,गीते,अभिनय; झेंडा – गीते; क्षणभर विश्रांती – गीते; रिंगा रिंगा – गीते; लालबाग परळ – गीते; सिटी ऑफ गोल्ड – गीते; अगडबम – गीते; जय महाराष्ट्र भटिंडा धाबा – गीते; बालकपालक – गीते; नारबाचीवाडी – गीते; मंगलाष्कट्क वन्स मोअर – गीते; टाईमपास – गीते

    दूरचित्रवाणी : हसा चकट फू – लेखन,गीते; श्रीयुत गंगाधर टिपरे – लेखन,गीते; जगावेगळी – लेखन; दूरदर्शन – ; असंभव – गीते; कुलवधू – गीते; प्राजक्ता – गीते

    रंगमंच : तू तू मी मी – गीते; आता होऊनच जाऊ द्या – गीते; भैया हातपाय पसरी – लेखन, गीते; म्हातारे जमीं पर – गीते

  • संदीप खरे

    संदीप खरे (जन्म – मे १३, १९७३ ) हे प्रसिद्ध मराठीकवी व गायक आहेत. त्यांचे ‘दिवस असे की’ आणि ‘आयुष्यावर बोलू काही’ या गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. त्याचे १००० च्या वर प्रयोग झाले आहेत. आजही त्यांचे कार्यक्रम हाउसफुल असतात. आयुष्यावर बोलू काही बरोबरच, ते कवी वैभव जोशी ह्यांच्यासोबत ‘इर्शाद’ हा कवितांचा कार्यक्रम देखील करतात.

    कवितासंग्रह : मौनाची भाषांतरे; कधी हे कधी ते; नेणिवेची अक्षरे; तुझ्यावरच्या कविता

    गीतसंग्रह : दिवस असे की; मी गातो एक गाणे; कधी हे कधी ते; आयुष्यावर बोलू काही; नामंजूर; सांग सख्या रे; अग्गोबाई ढग्गोबाई; डिबाडी डिपांग; दमलेल्या बाबाची कहाणी; हृदयामधले गाणे

    कार्यक्रम : आयुष्यावर बोलू काही; कधीतरी वेड्यागत; इर्शाद

  • लक्ष्मीकांत तांबोळी

    लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी (सप्टेंबर २१, इ.स. १९३९, देगलूर, नांदेड जिल्हा, महाराष्ट्र – हयात अज्ञात) हे मराठी भाषेतील कवी, लेखक आहेत.

    प्रकाशित पुस्तके

    हुंकार (इ.स. १९५९); तवंग (इ.स. १९६८); अस्वस्थ सूर्यास्त (इ.स. १९७०); दूर गेलेले घर (इ.स. १९७०); कृष्णकमळ (इ.स. १९७२); अंबा (इ.स. १९७८); गंधकाली (इ.स. १९७९); सलाम साब (इ.स. १९८१); मी धात्री मी धरित्री (इ.स. १९९१); काव्यव्यृत्ती आणि प्रवृत्ती (इ.स. १९९३); कबिराचा शेला (इ.स. १९९६)

  • अशोकजी परांजपे

    अशोक गणेश परांजपे (जन्मदिनांक अज्ञात – एप्रिल ९, इ.स. २००९) हे मराठी गीतकार होते. ते मुंबई येथे महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे संचालक होते. त्यानंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले होते.

    अशोक परांजपे यांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी, गण-गवळण आणि नाट्यगीत या प्रकारची गीते लिहिली. इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी) रिसर्च सेंटरचे त्यांचे काम सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये जाउन तेथील लोककलावंतांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या. त्या संदर्भात परांजपेंनी १९९२मध्ये पंढरपूर भक्तिसंगीत महोत्सव आणि १९८६मध्ये आनंदवन येथील महाराष्ट्र आदिवासी कला महोत्सव, असे दोन महोत्सव आयोजित केले. या कामाची नोंद फोर्ड फाउंडेशनने घेतली आणि ऑस्ट्रियातल्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हिडिओग्राफी (आयओव्ही) या आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेने परांजपे यांना सभासदत्व दिले. त्यानंतर अशोक परांजपे यांनी अनेक मराठी कलावंतांना फ्रान्स, आयर्लंड, जपान आदी देशांत नेऊन तेथे त्यांना कला सादर करण्याची संधी मिळवून दिली.

    साहित्य

    नाटके : संत गोरा कुंभार; संत कान्होपात्रा; बुद्ध इथे हरला आहे

    काही गीते : अवघे गर्जे पंढरपुर (नाट्यगीत, गायक – प्रकाश घांग्रेकर; नाटक – गोरा कुंभार; संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी; राग – आसावरी, जौनपुरी); आला आला ग सुगंध मातीचा (भावगीत, गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – अशोक पत्की); एकदाच यावे सखया (भावगीत, गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – अशोक पत्की); कुणी निंदावे वा वंदावे (भावगीत, गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – अशोक पत्की); केतकीच्या बनी तिथे (भावगीत, गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – अशोक पत्की; राग – बागेश्री, गोरख कल्याण); केशवाचे भेटी लागलेसे (नाट्यगीत, गायक – प्रकाश घांग्रेकर; नाटक – गोरा कुंभार; संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी); कैवल्याच्या चांदण्याला (नाट्यगीत, गायक – जितेंद्र अभिषेकी; नाटक – गोरा कुंभार; संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी; राग – भैरवी); तुझिया गे चरणीचा झालो (नाट्यगीत, गायक – शौनक अभिषेकी; नाटक – महानंदा; संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी); दीनांचा कैवारी दुःखितांचा सोयरा (भक्तिगीत गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – कमलाकर भागवत); नाम आहे आदी अंती (भक्तिगीत गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – कमलाकर भागवत); नाविका रे वारा वाहे रे (कोळीगीत, गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – अशोक पत्की); पाखरा जा दूर देशी (भावगीत, गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – अशोक पत्की); पाहू द्या रे मज विठोबाचे (नाट्यगीत, गायक – अजित कडकडे; नाटक – गोरा कुंभार; संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी); पैलतिरी रानामाजी (भावगीत, गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – अशोक पत्की); ब्रह्म मूर्तिमंत (नाट्यगीत, गायक – प्रकाश घांग्रेकर; नाटक – गोरा कुंभार; संगीत – पं. जितेंद्र अभिषेकी); वाट इथे स्वप्नातिल (भावगीत, गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – अशोक पत्की); विनायका हो सिद्धगणेशा (नाट्यगीत, गायक – रामदास कामत; संगीत – विश्वनाथ मोरे; नाटक – आतून कीर्तन वरून तमाशा; राग – ललत); समाधी घेऊन जाई (भावगीत, गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – कमलाकर भागवत); सहज तुला गुपित एक (भावगीत, गायिका – सुमन कल्याणपूर; संगीत – अशोक पत्की); साक्षीस चंद्र आणि (भावगीत, गायिका – सुषमा श्रेष्ठ; संगीत – शांक-नील)

  • सुधीर मोघे

    सुधीर मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी, ८ फेब्रुवारी, इ.स. १९३९ – पुणे, महाराष्ट्र, १५ मार्च, इ.स. २०१४) हे एक मराठी कवी, गीतकार व संगीतकार होते.

    मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात सुधीर मोघे यांचा संचार होता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरली होती. . ’विमुक्ता’ या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग होण्याआधीच सुधीर मोघे निर्वतले.

    प्रकाशित साहित्य

    कविता संग्रह : आत्मरंग; गाण्याची वही; पक्षांचे ठसे; लय; शब्द धून; स्वतंत्रते भगवती

    गद्य : अनुबंध; कविता सखी (लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेले सदर लेखन); गाणारी वाट; निरांकुशाची रोजनिशी

    चित्रपट गीतकार : सुमारे ५० हून अधिक चित्रपटांचे गीतलेखन (काही निवडक नावे : राजा शिवछत्रपती; आत्मविश्वास; एक डाव भुताचा; कळत नकळत; चौकट राजा; जानकी; पुढचं पाऊल; राजू; लपंडाव; शापित; सूर्योदय; हा खेळ सावल्यांचा; लक्ष्मीची पावले; गोष्ट धमाल नाम्याची; चोराच्या मनात चांदणे)

  • अरुण म्हात्रे

    अरुण म्हात्रे (जन्म ऑक्टोबर २५ १९५४) हे मराठी भाषेतील कवी आणि निवेदक आहेत.

    कवितासंग्रह : ऋतू शहरातले (इ.स. १९९०); कवितांच्या गावा जावे(३१ जुलै, इ.स. २००१)

  • दशरथ यादव

    दशरथ यादव (जन्म ८ ऑक्टोबर १९७०) हे माळशिरस ता.पुरंदर जिल्हा पुणे येथील मूळचे असून ते पुणे हडपसर येथे राहत आहे. मूळ पत्रकारितेचा पेशा असला तरी कवी, लेखक, कादंबरीकार साहित्यिक, गीतकार, म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.

    साहित्य लेखन : उन्हातला पाऊस; गुंठामंत्री; बाराशे कवनाचे वारीचे खंडकाव्य; मातकट (कादंबरी); यादवकालीन भुलेश्वर (संशोधनपर पुस्तक); वारीच्या वाटेवर (ऐतिहासिक कादंबरी); शिवधर्मगाथा (पाच हजार अंभग); लेखणीची फुले (कवितासंग्रह)

    चित्रपटासाठी लेखन

    गुंठामंत्री -कथा; ढोलकीच्या तालावर -गीते; दिंडी निघाली पंढरीला- कथा; भक्तिसागर या माहितीपटाचे लेखन; महिमा भुलेश्वराचा – गीताचा अल्बम; रणांगण – पटकथा संवाद; सत्याची वारी -माहितीपटाचे लेखन

  • यशवंत मनोहर

    डॉ. यशवंत मनोहर (जन्म – २६ मार्च, इ.स. १९४३) हे एक मराठी कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक आहेत.

    कवितासंग्रह : उत्थानगुंफा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर:एक चिंतनकाव्य; मूर्तिभंजन; जीवनकाय

    वैचारिक निबंधलेखन : डॉ. आंबेडकरांचा बुद्धधम्म; प्रबोधनविचार; मंडल आयोग : भ्रम आणि सत्य; आपले महाकाव्यातील नायक : शम्बूक-कर्ण-एकलव्य; आपल्या क्रांतीचे शिल्पकार : आंबेडकर-फुले-बुद्ध; डॉ. आंबेडकर : एक शक्तिवेध; बुद्ध आणि त्याचा धम्म : सारतत्व; आंबेडकरसंस्कृती; आंबेडकरवादी विद्रोही निबंध; आंबेडकरी चळवळीतील अंतर्विरोध; डॉ. आंबेडकरांचा बुद्ध कोणता ?; बहुजन क्रांतीचे महानायक : जोतीबा फुले; मूल्यमंथन; रिपब्लिकन पक्ष: बांधणीची एक दिशा; शिक्षकांपुढील आव्हाणे; अध्यापकांपुढील जळते प्रश्न; आजचे शिक्षण आणइ अध्यापक; डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली ?; डॉ. आंबेडकरांनी विपश्यना का नाकारली ?; महाबुद्ध डॉ. आंबेडकर; समाजुरिवर्तनाची दिशा; आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा: समता सैनिक दल; आंबेडकरवादी बौद्ध भिक्खू कसा असावा ?; धम्मदीक्षेचा सुवर्णमहोत्सव: तुम्हाला काय मागतो ?

    समीक्षा : दलित साहित्य: सिद्धान्त आणि स्वरूप; स्वाद आणि चिकित्सा; बाळ सीताराम मेर्ढेकर; निबंधकार डॉ. आंबेडकर; दलित साहित्यचिंतक; आंबेडकरवादी आस्वादक समीक्षा; समाज आणि साहित्यसमीक्षा; शरच्चंद मुक्तिबोधांची कविता (संपादन); मराठी कविता आणि आधुनिकता; आंबेडकरी चळवळ आणि साहित्य; परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाड्मयीन मूल्ये; आंबेडकरवादी मराठी साहित्य; युगसाक्षी साहित्य; नवे साहित्यशास्त्र; विचारसंघर्ष; आंबेडकरवादी महागीतकार: वामनदादा कर्डक; प्रतिभावंत साहित्यिक: आत्माराम कनीराम राठोड; साहित्यसंस्कृतीच्या प्रकाशवाटा

    प्रवास वर्णन : स्मरणांची कारंजी

    कादंबरी : रमाई; मी सावित्री जोतीबा फुले; मी यशोधरा

    पत्रसंग्रह : पत्रप्राजक्त

    श्रद्धांजलीपर लेख : सातवा ऋतू अश्रूंचा