सवाई माधवराव पेशवा
(१८ एप्रिल १७७४–२७ ऑक्टोबर १७९५). मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा, बाळाजी बाजीरावच्या खून झालेल्या नारायणराव या मुलाचा गंगाबाई या पत्नीपासून पुरंदर किल्ल्यावर मरणोत्तर जन्माला आलेला मुलगा. त्याचे बालपण पुरंदर किल्ल्यावर लष्करी बंदोबस्तातगेले. त्यामुळे राज्यकर्त्यास योग्य असे शिक्षण त्याला मिळाले नाही. पेशव्यालावाढविण्याची जबाबदारी कारभाऱ्यांवर म्हणजे नाना फडणिसादींवर आली.साहजिकच लिहिणे-वाचणे, हिशेब ठेवणे, घोड्यावर बसणे, कसरत करणे याचेजुजबी शिक्षण त्यास मिळाले; पण शहाण्यासुरत्या मुत्सद्यी माणसांच्या गाठीभेठी,राजकारण्याच्या वाटाघाटी, लष्करी मोहिम यांपासून पेशवा वंचित राहिला. त्यांच्यावयाच्या तिसऱ्या वर्षी आई गंगाबाई मरण पावली. त्यामुळे त्यास खास मायेचेकोणीच उरले नाही. पेशवाईच्या उत्तरकाळात गृहकलहामुळे निर्माण झालेल्याचमत्कारिक वेळी जन्म झाल्यामुळे या बालपेशव्यासंबंधी मराठी राज्याच्या अपेक्षाउंचावल्या. कर्तबगार चुलता थोरला माधवराव यापेक्षा मोठी कामगिरी याच्याहातून पार पडेल, या भावनेने त्यास सवाई माधवराव हे नाव प्राप्त झाले. जन्मानंतरचाळीस दिवसांनी २८ मे १७७४ रोजी त्यास सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईचीवस्त्रे मिळाली. काही दगाफटका होऊ नये, म्हणून माधवरावास पुरंदर किल्ल्यावरठेवण्यात आले. त्यानंतर कुणबिणी, नोकरचाकर, पाणक्ये, भटभिक्षुक, कारकूनअशा मंडळींच्या सहवासात पेशवा वाढला. पाच वर्षानंतरच पुरंदरची थंड हवासोसेना म्हणून पेशव्यासह सर्व मंडळी पुण्यास आली. १० फेब्रुवारी १७८३ रोजी थत्तेकुटुंबातील रमाबाई या (मृत्यू १७९३) मुलीशी त्याचे थाटाने पहिले लग्न करण्यातआले. यानंतर गणेश वि. गोखले यांच्या यशोदाबाई या मुलीशी दुसरे लग्न झाले.पुण्याच्या शनिवारवाड्यात, श्रावणमासातील सण, दक्षिणावाटप, गणपती उत्सव,दसरा, होळी आदी सण आणि वाड्यातील भोजने यांत पेशव्याचे जीवन व्यतीत होतहोते. पुणे-नासिक-वाई-सातारा या परिसरापलीकडे त्याचा प्रवास झाला नाही.त्याची आजी गोपिकाबाई हिने पेशवा सवाई माधवराव नासिकास आला असता,नानास पत्र लिहिले की, ‘हे मूल सदा लहान माणसात वावरते. बाहेरील जगाशीत्याचा संबंध नाही. हे शहाणे कसे होणार?’
सवाई माधवरावच्या वेळी पहिले इंग्रज-मराठे युद्ध (१७७४–८२), टिपूशी युद्ध (१७८६–८७), टिपूविरुद्ध केलेली श्रीरंगपट्टणची इंग्रजनिजामासहसंयुक्त मोहीम (१७९०–९२), खर्ड्याचे युद्ध (१७९५), पाटीलबाबा शिंदे यांनी मोगल बादशाही ताब्यात घेऊन उत्तरेकडील राजेरजवाडे आणि मुस्लिमसंस्थानिक यांशी केलेली युध्दे (१७८४–१७९१) असे अनेक युद्धप्रसंग घडले आणि मराठ्यांनी अखिल हिंदुस्थानात पुन्हा नावलौकिक मिळविला; पणखर्ड्याचे युद्ध वगळता इतर घटना पेशव्यास फारशा समजल्या की नाही याविषयी शंका आहे. पेशव्यांच्या दरबारात आलेल्या चार्ल्स मॅलेट या इंग्रजवकिलाने सवाई माधवरावविषयी अनेक तपशीलवार गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यावरून त्याची शरीरयष्टी, स्वभाव आणि वर्तन यांवर प्रकाश पडतो.
महादजी शिंदे-पाटीलबाबा १७९२ मध्ये महाराष्ट्रात आले. या मुक्कामात त्यांनी माधवरावास मानमरातब, मेजवान्या, पानसुपाऱ्या केल्या; स्वारीशिकारीला बरोबर घेतले व धनीपणाचा हक्क बजाविण्याविषयी सांगितले. तेव्हापासून पेशव्यास परिस्थितीचा विशेषतः परावलंबित्वाचा उलगडाझाला. खर्ड्याच्या मोहिमेवरून पेशवा १७९५ मध्ये परत आला.(दुसरा) बाजीराव रघुनाथ जुन्नर येथे कैदेत होता. त्याने पेशव्याशी गुप्तपणे पत्रव्यवहार सुरुकेला होता. नाना फडणिसाने तो पत्रव्यवहार पकडून पेशव्यास शरमिंदे केले. यावेळी कारभाऱ्याने आपल्याला कसलीही मोकळीक देऊ नये, याची त्यासखंत वाटू लागली. त्यात तापाने तो आजारी पडला. दसऱ्याचा समारंभ कसाबसा पार पडला सवाई माधवराव २५ ऑक्टोबर १७९५ रोजी तापाच्या भरातत्याने शनिवारवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली कारंज्यावर उडी टाकली व २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी तो मरण पावला.
सवाई माधवराव स्वतः कर्तबगार वा सुज्ञ नव्हता, तरी त्याच्या अस्तित्वाने मराठ्यांची सत्ता एकवटून राहिली होती. त्याच्या मृत्यूनंतर पेशवाईतपरस्परातील हेवेदावे, वैयक्तिक स्वार्थ आणि सत्तेसाठी रस्सीखेच सुरु झाली व विघटनवादी प्रवृत्तीला ऊत आला. त्यानंतर २०-२२ वर्षांत इंग्रजांनीमराठ्यांची सत्ता नष्ट केली.