कोळी नृत्य
कोळी बांघव समुद्रावर पोटासाठी अवलंबून असल्याकारणाने समुद्रालाही देव मानतात आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला वाजतगाजत सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करतात. घरोघरी नारळाचे गोड नैवेद्य करतात जसे नारळीभात, नारळवडी, करंज्या. त्यांच्या मते, हा नारळ अर्पण करून समुद्र शांत होतो, त्याचबरोबर समुद्र आपल्याला त्याच्यातील साधन संपत्ती देतो, त्यामुळे हा त्याचा मान. शिमगा (होळी) ह्या सणात ह्या समाजात पंधरा दिवस आधी चालू होतो. होळी हा सण कोळीवाड्यात फार आवडीने साजरी करतात. हे कोळी लोकांचे लोकप्रिय नृत्य आहे . सणासुदीच्या आणि लग्नप्रसंगात कोळी स्त्री-पुरुष समुहाने नाचतात . कोळीनृत्यातील ताल ,ठेका ,पदन्यास बघण्यासारखा असतो . कोळीगीते सुद्धा महाराष्ट्रात तितकीच लोकप्रिय आहेत . हा समाज देवांवर जास्त विश्वास ठेवतो, त्यांची देवी श्री एकवीरा देवी (कार्ला डोंगर) लोणावळा आणि खंडोबा (जेजुरी) येथे दरवर्षी भेट देतात आणि नवस बोलून तो फेडतात. तसेच दर वर्षी नारळी पौर्णिमेचा दिवस सरल्यानंतर होडी , बोटीची पूजा करून ते समुद्रात व्यवसायासाठी उतरवतात. ह्या समाजामध्ये मुख्यतः वेताळ देव आणि कुर्स देव एका निर्जीव दगडामध्ये देवत्व जातात. तसेच मुंबईतील माहीम येथील रहिवाशी वांद्रे येथील श्री कडेश्वरी देवी हिला बारेकरणी आई म्हणून संबोधतात, बारेकरणीचा अर्थ बारा – कोसावर म्हणजेच दूर असलेली देवी. दरवर्षी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिला मान – पान देतात. ह्या समाजात लग्न उत्सवही फार आनंदात साजरी करतात. ह्या कोळी लोकांचे रोजचे परिधान करावयाचे पोशाख स्त्रियांसाठी लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल (मोठे) आणि शर्ट त्याबरोबर कान टोपेरा ( कान आणि डोके झाकणारी टोपी ) असे असते. कोळी स्त्रियांना दागदागिन्यांची फार आवड असते. कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यात ते नटून – थटून शुंगार करतात.
काही कोळी नृत्य
१. मी हाय कोळी, २. एकविरा आई तू डोंगरावरी,
३. वेसावची पारू नेसली गो,
४. हीच काय ती सोनटिकली,
५. नवरीच्या मांडवान नवरा आयलाय,
६. चिकना चिकना म्हावरा माझा,
७. सण आयलाय गो नारळी पुनवेचे,
८. नाताळचे रिटा सणाला,
९. हे पावलाय देव माना मल्हारी,
१०. पोरी सांगताय गो,
११. ये गो ये, ये मैना पिंजरा बनाया सोने का,
१२. येरा केलास माना पागल केलास,
१३. डोंगराचे आरुन इक बाय चांद उंगवला,
१४. बेगीन चल गो चंद्रा, होरी आयलीय बंदरा,
१५. आज कोळीवाऱ्यानं धनुच्या दारान,
१६. वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव,
१७. शिंगाला नवरा झायलाय गो कोलबी नवरी झायली ग बाय,
१८. या गो दांड्यावरण बोलतय नवरा कोणाचा येतो,