घटना
१८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या .
१९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.
१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.
१९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
१९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.
१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
२०१६: वेस्ट इंडिजच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाने २०१६ टी २० विश्वचषक जिंकला.
जन्म/वाढदिवस
१८२३: जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सीमेन्स. (मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३)
१८४२: फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास . (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८९१)
१८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन. (मृत्यू: ३ जुलै १९८५)
१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक एवेरी फिशर. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)
१९०२: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं नारायणराव व्यास . (मृत्यू: १ एप्रिल १९८४)
१९२६: अॅमवे कंपनी चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस.
१९३३: डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी.
मृत्यू/पुण्यतिथी
१९२३: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन. (जन्म: ४ ऑगस्ट १८३४)
१९२९: मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक कार्ल बेन्झ . (जन्म: २५ नोव्हेंबर १८४४)
१९३१: फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन . (जन्म: १६ जानेवारी १८५३)
१९६८: नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांची हत्या झाली. (जन्म: १५ जानेवारी १९२९)
१९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो. (जन्म: ५ जानेवारी १९२८)
१९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय. (जन्म: ७ मार्च १९११- खुशीनगर, देवरिया, उत्तर प्रदेश)
१९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले. (जन्म: ५ जुलै १९२०)
२०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर.
२०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा . (जन्म: १ सप्टेंबर १९४७)