राष्ट्र दिन – यमन.
जागतिक जैवविविधता दिन.महत्त्वाच्या घटना
१३७७: पोप ग्रेगोरी अकराव्याने पाच पोपचे फतवे काढून इंग्लिश तत्त्वज्ञानी जॉन वायक्लिफची मते खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
१७६२: स्वीडन आणि प्रशियामधे हॅम्बुर्गचा तह झाला.
१९०६: राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.
१९०६: अथेन्समध्ये तिसरे ऑलिंपिक खेळ सुरु. काही काळानंतर यांची अधिकृत खेळ म्हणून मान्याता काढून घेण्यात आली.
१९१५: स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ जण ठार आणि २४६ जण जखमी झाले.
१९२७: चीनच्या झिनिंग जवळ झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० लोक ठार झाले.
१९४२: दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली.
१९६०: ग्रेट चिलीयन भूकंप हा ९.५ तीव्रतेचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
१९६१: हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.
१९७२: सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.
१९८७: मेरठ जिल्ह्यात हाशिमपूरा हत्याकांड झाले.
१९८९-अग्नी या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे ओरिसातील मंडीपूर येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले.
२००४: भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली.
२००९: भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा दुसऱ्यांदा शपथविधी.
२०१५: आयर्लंड देश सार्वजानिक जनमतदानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.
जन्मदिवस / वाढदिवस
१४०८: हिंदू संत अन्नामचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १५०३)
१६८८: अलेक्झांडर पोप, इंग्लिश कवी.
१७७२: सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा बंगालमध्ये. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)
१७८३: विद्युत चुंबक आणि विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन . (मृत्यू: ४ डिसेंबर १८५०)
१८१३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्नर . (मृत्यू: १३ फेब्रुवारी १८८३)
१८५९: स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल. (मृत्यू: ७ जुलै १९३०)
१८७१: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट . (मृत्यू: २० डिसेंबर १९३३)
१९०५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक बोडो वॉन बोररी. (मृत्यू: १७ जुलै १९५६)
१९०७: ब्रिटिश अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते लॉरेन्स ऑलिव्हिये. (मृत्यू: ११ जुलै १९८९)
१९४०: भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.
१९४८: भारतीय अभिनेते आणि पटकथालेखक नेदुमुदी वेणू .
१९५९: भारतीय राजकारणी मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म.
१९८४: फेसबुकचे सह-संस्थापक डस्टिन मॉस्कोविट्झ .
१९८७: सर्बियाचे टेनिस खेळाडू नोव्हान जोकोव्हिच .
मृत्यू / पुण्यतिथी
१५४५: भारतीय शासक शेरशाह सूरी यांचे निधन.
१८०२: अमेरिकेच्या पहिल्या फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २ जून १७३१)
१८८५: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८०२)
१९९१: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)
१९९५: चित्रकार व शिल्पकार रविंद्र बाबुराव मेस्त्री यांचे निधन.
१९९८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२८)
२००३: डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके भारतीय हृदयरोगतज्ञ.