महत्त्वाच्या घटना
१८५४: जपानच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारु ध्वज वापरण्यात सुरवात झाली.
१९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
१९२४: सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९४७: जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९५६: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
१९८४: अपर व्होल्टा या देशाचे नाव बदलुन बुर्किना फासो असे करण्यात आले.
१९९३: राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली खारदुंग ला ही खिंड आपल्या चार सहकार्यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली.
१९९८: फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अॅक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
२००१: मरणोत्तर त्वचादान करुन दुस-यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
२००७: नासा चे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.
२०१४: स्कॉटलंडच्या ग्लासगोत झालेल्या राष्ट्रमण्डळ २०च्या खेळात ५८ सुवर्ण पदक मिळवून इंग्लंड पहिल्या स्थानावर राहिला.
२०१४: विश्व स्वास्थ्य संगठनेच्या आकडेवारीनुसार इबोला वायरसच्या संसर्गाने पश्चिम अफ़्रीकेत जवळपास ८९० लोकांचा मृत्यू
जन्मदिवस / वाढदिवस
१७३०: पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ . (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
१८२१: लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन . (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९२)
१८३४: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन. (मृत्यू: ४ एप्रिल १९२३)
१८४५: सर फिरोजशहा मेहता –कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक.
१९१३ मधे बॉम्बे क्रॉनिकल हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईत सुरू केले. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)
१८६३: पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर.
१८८८: भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६५)
१८९४: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८)
१९२९ : आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार –पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे
४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘लती का नाम गाडी सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच दूर गगन की छाँव में सारखे गंभीर चित्रपटही काढले. (मृत्यू: १३ आक्टोबर १९८७)
१९३१: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे . (मृत्यू: १९ मार्च २००२)
१९५०: पुडुचेरीचे ९वे मुख्यमंत्री रंगास्वामी.
१९६१: अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा .
१९७८: भारतीय राजकारणी संदीप नाईक.
मृत्यू / पुण्यतिथी