१६७५: चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.
१८१०: स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.
१८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.
१९८८: दुस-या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
१९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.
१९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.
१९९९: इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.

१९४२: हुतात्मा शिरीषकुमार . (जन्म: २८ डिसेंबर १९२६)
१९५०: संगीतकार खेमचंद प्रकाश . (जन्म: १२ डिसेंबर १९०७)
१९८०: पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान . (जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)
१९८२: मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा –भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (जन्म: १० एप्रिल १९२७)
१९८६ : जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात
अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना महावीरचक्र मिळाले होते.त्यांच्या लष्करप्रमुखपदाच्या काळातच ऑपरेशन ब्ल्यू स्टारची कारवाई झाली होती. (जन्म: २७ जानेवारी १९२६)
१९९२: कीर्तिचक्र, पद्मश्री लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात .
संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. (जन्म: १२ ऑगस्ट १९०६)
१९९७: कवी व नाट्यसमीक्षक नारायण पेडणेकर यांचे निधन.
१९९९: भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय . (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)
२०१२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल . (जन्म: ११ ऑक्टोबर १९३२)