जन्मदिवस / वाढदिवस
१७३१: हायड्रोजन आणि आॅरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेंडिश. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१०)
१८३०: स्पेनची राणी इसाबेला (दुसरी).
१८४४: बद्रुद्दिन तैय्यबजी –कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष (मृत्यू: १९०६)
१८७१ : शंकर श्रीकृष्ण देव –निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक (मृत्यू: २३ एप्रिल १९५८)
१८७७: मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस . (मृत्यू: २२ ऑगस्ट १९६३)
१८९९: कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे –भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते,
गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना तत्कालीन सोविएत संघराज्यातर्फे ऑर्डर ऑफ लेनिन सन्मान प्रदान करण्यात आला.(मृत्यू: २२ मे १९९१)
१९०२: कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के. शिवराम कारंथ. (मृत्यू: ९ डिसेंबर १९९७)
१९०६: रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण –लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (१९६४), पद्मविभूषण (२००१),
साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (१९८०) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. द गाईड, द वर्ल्ड ऑफ नागराज, वेटिंग फॉर महात्मा
इ. कादंबर्या, तसेच मालगुडी डेज, ए हॉर्स अँड टू गोट्स इ. कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले. (मृत्यू: १३ मे २००१)
१९०९: क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला –क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ – पुणे, महाराष्ट्र)
१९१०: हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस .
१९१२: भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा . (मृत्यू: ३० मे २०००)
१९१६ : डॉ. लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक (मृत्यू: २० मे १९९२)
१८९८: अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी . (जन्म: २६ सप्टेंबर १८५८)
१९११: जॅक डॅनियल चे संस्थापक जॅक डॅनियल .
१९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त . (जन्म: ९ जुलै १९२५)
१९८३: मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना.
२०००: सिरीमाओ बंदरनायके –श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान
सॉलोमन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले. खाजगी शाळा,
तेलकंपन्या रबराचे मळे व चहाचे मळे यांचे राष्ट्रीयीकरण केले. (जन्म: १७ एप्रिल १९१६)
२००५: युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे .
२००६: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे . (जन्म: ४ ऑक्टोबर १९१३)
२००८: कथ्थक नर्तिकारोहिणी भाटे. (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)
२०११: गझल गायक जगजित सिंग . (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)