१९०५: नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.
१९१८: ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.
१९२७: सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.
१९३०: पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९४५: पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.
१९५६: मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९०: टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.
१९९७: १९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.
१९९८: परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO)
ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.
२०००: १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.१९४७ मधे याच दिवशी महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरुन भाषण प्रसारित झाले होते.२०००: भारताची वूमन ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रम्हण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे झालेल्या ३४ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमधे वैयक्तिक रौप्यपदक मिळवले.
२००३: शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमी/तास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

२०१५: बेरूतमधे शिया बहुल भागात २ आत्मघाती हल्ले, ४३ लोकांचा मृत्यू.