आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस

       महत्त्वाच्या घटना

१९२४: अडोल्फ हिटलर यांची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.
१९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.
१९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा
जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान.
१९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.
२०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर
यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.

१७३१: बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला. (जन्म: ४ मे १६४९)
१९१५: भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे. (जन्म: १२ मे १८६३)
१९३३: विष्णू वामन बापट –संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले. (जन्म: २२ मे १८७१)
१९५६:देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज –कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले
आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)
१९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने. (जन्म: २४ जून १८९३)
१९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट.
१९९६: कार्ल सगन –अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील
उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३४ – ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु. एस. ए.))
१९९६: बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार . (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)
१९९८: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
२००१: सेनेगलचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेन्घोर . (जन्म: ९ ऑक्टोबर १९०६)
२०१०: अभिनेत्री नलिनी जयवंत . (जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)
२०१०: लेखक सुभाष भेंडे . (जन्म: १४ ऑक्टोबर १९३६)