१६४२: सर आयझॅक न्यूटन –इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील
कॅल्क्युलस या शाखेचे जनक (मृत्यू: २० मार्च १७२७)
१८२१: अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन . (मृत्यू: १२ एप्रिल १९१२)
१८६१: बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय . (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६)
१८७६: पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅ. मुहम्मद अली जिना. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
१८७८: शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट . (मृत्यू: ६ जुन १९४१)
१८८९: रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका लीला बेल वॉलेस. (मृत्यू: ८ मे १९८४)
१९११: बर्न होगार्थ –जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक,
शिक्षणतज्ञ (मृत्यू: २८ जानेवारी १९९६ – पॅरिस, फ्रान्स)
१९१६: अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष अहमद बेन बेला. (मृत्यू: ११ एप्रिल २०१२)
१९१८: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९८१)
१९१९: संगीतकार नौशाद अली . (मृत्यू: ५ मे २००६)
१९२१: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमिदुल्ला . (मृत्यू: १० सप्टेंबर २०००)
१९२४:अटलबिहारी बाजपेयी –भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे
ओजस्वी कवी, पद्मविभूषण( मृत्यू : १६ ऑगस्ट २०१८)
१९२६: डॉ. धर्मवीर भारती –हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, अभ्युदय व संगम
या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. (मृत्यू: ४ सप्टेंबर १९९७)
१९२६: संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू . (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९७)
१९२७: सुप्रसिद्ध सारंगीये पं. रामनारायण.
१९३२: व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार प्रभाकर जोग.
१९३६: भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट. (मृत्यू: २५ मे २००५)
१९४९: पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान नवाझ शरीफ .
१९५९: भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले .
मृत्यू / पुण्यतिथी
१९४९: वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर. (जन्म: २० मे १८८४)
१९५७: प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे –साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक.
१९१६ मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस – पंचवीस वर्षे मोफत शिकवले. (जन्म: २ सप्टेंबर १८८६)
१९७२: चक्रवर्ती राजगोपालाचारी –भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (जन्म: १० डिसेंबर १८७८)
१९७७: चार्ली चॅपलिन –अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या लाईम लाईट या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. कीड ऑटो रेसेस
अॅट व्हेनिस या त्यांच्या दुसर्या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पँट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे
लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले. (जन्म: १६ एप्रिल १८८९)
१९८९: रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला सीउसेस्कु. (जन्म: २६ जानेवारी १९१८)
१९९४: ग्यानी झैलसिंग –भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (जन्म: ५ मे १९१६)
१९९५: अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते डीन मार्टिन. (जन्म: ७ जून १९१७)
१९९८: नाटककार व दिग्दर्शक दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर.