आनंदवनातील शिबिरातून परतल्यानंतर जीवनाची दिशा ठरली होती, मात्र मार्ग सापडत नव्हता. मुख्य अडचण जागेची होती. स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या माध्यमातून मुंबईतील नीळकंठ कुलकर्णी यांनी श्रीगोंद्यातील वडिलोपार्जित वाडा स्नेहालयाला देऊ केला. डॉ. कुलकर्णी यांनी तो अनंत झेंडे यांच्या स्वाधीन केला.

फारसे शिक्षण नसलेल्या अनंत झेंडे या ध्येयवेडय़ा तरुणाने ही संस्था उभी केली आहे. खासगी शिक्षणसंस्थेत शिपायाची नोकरी सांभाळून त्याने या आदिवासी, फासेपारधी, डोंबारी अशा उपेक्षित समाजातील मुलांसाठी हा संसार उभा केला, तोही केवळ लोकसहभागातून. डोंबारी समाजात मूल स्वत:च्या पायावर उभे राहू लागले की, लगेचच त्याच्या अंगाचे मुटकुळे करून शारीरिक कसरतीची सवय लावली जाते. त्यांच्या प्रदर्शनातूनच या समाजाची उपजीविका, भटकंती होते. या अशा जीवनवैशिष्टय़ांमुळेच या दोन्ही समाजांची अवस्था दयनीय आहे ‘विद्यार्थी सहायक समिती’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या या उपक्रमाचे रूपांतर आता शोषित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था प्रकल्पात झाले आहे. संस्थेचा व्याप वाढतो आहे, मात्र आर्थिक मेळ घालणे हेच मोठे आव्हान आहे. सरकारी किंवा तशा तत्सम मदतीशिवाय सगळा उपद्व्याप सुरू ठेवताना आता त्याच्या मर्यादाही जाणवू लागल्या आहेत. मात्र लोकसहभागावर श्रद्धा ठेवून झेंडे यांचा हा खटाटोप सुरू आहे. लोकसहभाग एवढा एकच आधार संस्थेला आहे. तो सढळ हाताने लाभला तरच या उपेक्षितांचा हा प्रपंच चालेल, बहरेल. एकलव्य प्रकल्पात फासेपारधी समाजातील ४२ मुले, साधना बालभवनात झोपडपट्टीतील ८० मुले आणि आरंभ बालनिकेतनात भटक्या डोंबारी समाजातील ५६ मुले सध्या संस्थेच्या आश्रयाला आहेत. या सर्वाचा निवास, भोजन आणि मुख्यत्वे शिक्षण अशी तब्बल १७८ मुलांची जबाबदारी संस्थेने उचलली आहे.अनंत झेंडे नगरमधील स्नेहालय संस्थेच्या संपर्कात आले. येथे रुळतानाच त्यांनी आमटेंच्या आनंदवन परिवारात सोमनाथ शिबिरातील श्रम संस्कार छावणीत सहभाग घेतला आणि त्यांना जीवनाचे ध्येय सापडले. सुरुवातीला विद्यार्थी साहाय्य समिती आणि आता महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था, ही या ध्येयाच्या दिशेनेच सुरू केलेली वाटचाल आहे, असे अनंत झेंडे यांनी सांगितले. संस्थेला कसल्याही प्रकारचे शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरती संस्थेचे काम सुरु आहे. समाजातील दुर्लक्षित मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत हे संस्थेचे ध्येय आहे. मुलांच्या शिक्षणाबरोबर त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठीहि मुलांकडे लक्ष दिले जाते. मुलांच्या शिक्षण आणि सर्वांगीण प्रगतीसाठी गृह उपयोगी साहित्य, शैक्षणिक साहित्य खरेदी करताना संस्थेला अनेक अडचणी भासत असतात. या अडचणी दूर करण्यासाठी आम्हाला आपल्या सहयोगाची अत्यंद आवश्यकता आहे. संस्थेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहयोग देण्यासाठी तुम्ही संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊ शकता. महामानव बाबा आमटे बहूउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेला दिलेल्या सर्व देणग्यांना 80G कलमान्वये आयकर सवलत आहे.
संस्थेला मदत करण्यासाठी आपण संपर्क करू शकता.

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    Registered Office:
    VSS (Vikas Seva Sanstha)
    Post – Shrigonda, Taluka – Shrigonda,
    Dist – Ahmednagar, Maharashtra,
    Pin Code 413701.

  • दूरध्वनी

    Office: (+91) 02487 220020
    Mobile:(+91) 94049 76833
    (+91) 99221 68569
    (+91) 98204 90903