अभिजात मराठी

आजि सोनियाचा दिनु | वर्षे अमृताचा घनु | ” असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. त्यांच्या या अमृतमयी शब्दांची बरसात मनाला सुखावून जाते कारण मराठीच्या ‘‘ या अक्षरात ‘मी’, ‘माझी मराठी’, ‘मायबोली’ अशा या सर्व ‘म’कारांत मी, माझे, महान, मानसन्मान असे सर्व ‘म’ सामावलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, ” मराठी असे आमुची मायबोली’. इतर भाषा या तिच्या भगिनी आहेत. त्यांच्याशी आपले नाते ‘मावशीचे’ – म्हणजे त्यातही परत ‘म’चाच आरंभ! मग या भाषा मावशींशीही आपले नाते आहे, ते गोडच असणार व गोडच असले पाहिजे.
जो मराठी द्बेष्टा नाही, जो मराठीचा राग-द्वेष, दुस्वास करत नाही तर उलट ज्यांच्या रोमा-रोमात मराठीची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असेल असे सर्वजण ‘मराठीच’ होय. अशा व्यक्तींकडून मराठीचा अपमान कधीच होणार नाही तर उलट मराठीच्या उन्नतीला व प्रसाराला त्यांचा हातभारच लागेल.

अशा या मराठीचे कौतुक काय सांगावे! मराठीत उच्चार, व्यंजन, स्वर यांत गल्लत तर नाही. (असलीच तर ती अत्यल्प). मराठी भाषा ही अत्यंत तरल, सुक्ष्म व संवेदनाशील आहे. अशा या संपन्न, परिपूर्ण भाषेचा जगातील ८००० (आठ हजार) भाषांमध्ये १५ वा क्रमांक लागतो.

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी….’ मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही तमाम मराठी जनांची इच्छा आणि स्वप्न.. हा दर्जा आपल्याला मिळणे ही मराठी माणसाच्या जीवनातली एक अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही कसोटय़ा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मराठी भाषा या कसोटय़ा निश्चितपणे पूर्ण करते. केंद्र सरकारने आजवर हिंदुस्थानातील सहा भाषांना हा दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम् व ओडिया या त्या सहा भाषा आहेत.

  • अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे :

अभिजात भाषा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्यांना भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो तेव्हा भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोरच उमटवली जाते. मुख्य म्हणजे भाषेच्या विकासकार्यासाठी अधिक चालना मिळत जाते.

  • अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचे निकष :

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अभिजात मराठी भाषा (१०  जानेवारी २०१२) रोजी स्थापन करण्यात आली. मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास स्थापन करण्यात आली. मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करून पुरावे गोळा करण्याचे काम या समितीकडे सोपविण्यात आले. प्रा. पठारे यांच्यासमवेत हरी नरके व अन्य काही सदस्य या समितीत आहेत. या समितीने केलेले काम महत्त्वाचे आहे. हे काम कोणत्या स्वरूपाचे  आहे हे ध्यानात घेण्यासाठी एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने कोणते निकष ठरविले आहेत. हे बघणे आवश्यक ठरते. त्यातून अभिजात भाषा हा दर्जा मिळविण्यासाठी या समितीने केलेला अभ्यास व मराठी भाषाविषयक संशोधन सिद्ध करण्याची समितीची भूमिकाही ध्यानात येऊ शकते. हिंदुस्थान हे बहुभाषिक राष्ट्र आहे. हिंदुस्थानची विविधता लक्षात घेण्यासाठी भाषांचे वैविध्य हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. केंद्र शासनाने ठरविलेले निकष पुढीलप्रमाणे आहेत.

एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचे निकष :

  • भाषेची प्राचीनता
  • भाषेची मौलिकता आणि सलगता
  • भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण
  • प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱया खंडासह जोडलेले/असलेले नाते

बोली भाषेत सांगावयाचे झाल्यास,

– ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं ती भाषा अभिजात

– ज्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास ती भाषा अभिजात

– ज्या भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण आहे ती भाषा अभिजात

– प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम आहे ती भाषा अभिजात

एकूण 52 बोली भाषेपासून आपली मराठी भाषा नटलेली आहे. मराठी भाषेची महती दुर्गाभागवतांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांनी 1885 साली, तर ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी 1927 सालीच त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवली आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

अभिजनांची भाषा म्हणजे अभिजात भाषा असा आतापर्यंत प्रस्थापित समज होता. पण प्रा. रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून त्याची उत्तम मांडणी केली आहे. मराठीचं वय 800 वर्षे सांगितलं गेल्यामुळंही त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळं आता आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या केवळ एक पाऊल दूर आहोत.

गाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केला आहे. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे, याचा अंदाज येऊ शकेल. मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. म्हणूनच मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी होतेय.

एकूण 52 बोली भाषेपासून आपली मराठी भाषा नटलेली आहे. मराठी भाषेची महती दुर्गाभागवतांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांनी 1885 साली, तर ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी 1927 सालीच त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवली आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

अभिजनांची भाषा म्हणजे अभिजात भाषा असा आतापर्यंत प्रस्थापित समज होता. पण प्रा. रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून त्याची उत्तम मांडणी केली आहे. मराठीचं वय 800 वर्षे सांगितलं गेल्यामुळंही त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळं आता आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या केवळ एक पाऊल दूर आहोत.

गाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केला आहे. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे, याचा अंदाज येऊ शकेल. मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. मराठी भाषेस अभिजात भाषा दर्जा मिळणे ही आपली मागणीच नाही तर आपला हक्क आहे.. लवकरच सर्व शासकीय अडथळ्यांची शर्यत पार करून आपली मराठी अधिकृतपणे अभिजात बिरुदावली लावेल हे नि:संशय!

  • प्रा. रंगनाथ पठारे यांचा ‘अभिजात मराठी भाषा’ अहवाल