वालाचे बिरडे

साहित्य –

मोड आलेले कडवे वाल 2 वाटया
हळद, हिंग, तिखट चवीनुसार
नारळाचे दूध 1 वाटी
आल, लसूण, हि. मिरची, कोथिंबीर पेस्ट अर्धी वाटी

कृती –

तेल गरम झाल्यावर त्यात आलं, लसूण, हि. मिरची, कोथिंबीर पेस्ट घालून चांगले परतून घ्या. नंतर यात मोड आलेले कडवे वाल, चवीनुसार मीठ घालून शिजू दया. नंतर यात नारळाचे घट्ट दूध घाला. चवीनुसार मीठ घालून भाताबरोबर सव्र्ह करा.

पिठलं

साहित्य –

बेसन (गुठळीचे) 2 वाटया
दही अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
हिरवी मिरचीचे तुकडे 2 चमचे
लसूण 1 चमचा
हळद, हिंग पाव-पाव चमचा
मोहरी 1 चमचा
कोथिंबीर 4 चमचे

कृती –

सर्व प्रथम दह्यामध्ये बेसन, हिंग, हळद, मीठ व पाणी एकत्र करुन घाला. एका लोखंडी कढईत तेल घालून मोहरी, लसूण, हिरवी मिरची परतून त्यात थोडे पाणी व तयार केलेले बेसनाचे मिश्रण घाला. थोडे घट्ट झाल्यावर कोथिंबीर सव्र्ह करा.

दोडक्याचे मुटकूळे

साहित्य:-

दोडके 300 ग्रॅम
कणीक 1 वाटी
बेसन अर्धी वाटी
तेल 4 चमचे
मोहरी 1 चमचा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
हिंग चिमूटभर
कोथिंबीर –

कृती:-

प्रथम अर्धी वाटी कणीक, अर्धी वाटी बेसन चांगले भाजून घ्या. 2 चमचे तेल घेवून त्यामधे मोहरी फोडणीला टाकून थोडी आल्याची पेस्ट घाला. त्यानंतर हळद, पाव चमचा आमचूर पावडर, चवीनुसार साखर, तिखट, हिंग व मीठ घालून ही दोन्ही पीठं त्यामध्ये परतून घ्या. थोडे पाणी शिंपडून त्याचे मुटकूळे बनवून घ्या. 300 ग्रॅम दोडके व्यवस्थित चिरुन त्याला हींग, मोहरी, हळद व तिखटाची फोडणी देवून चवीनुसार मीठ घाला, त्यावर हे मुटकूळे ठेवून झाकण लावा बंद करा. दोडक्याला जे पाणी सुटेल त्या पाण्याच्या व वाफेवर मुटकूळे शिजू दया. कोथिंबीर घालून खायला दया.
टीप:- यात आपण कणीक आणि बेसन वापरले आहेत. पण याशिवाय तुम्ही एखादी डाळ,ज्वारी बाजरीचे पीठ, किंवा थालीपीठाची, चकलीची भाजणी वापरु शकता.

कुळथाचं पिठलं

साहित्य:-

कुळथाचे पीठ 1 वाटी
दही अर्धी वाटी
लसूण 2 चमचे
मोहरी 1 चमचा
हिरवी मिरची 4-5
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
तेल 4 चमचम
मीठ चवीनुसार
कोथिंबीर –

कृती:-

4 चमचे तेलात 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून थोडे हिंग, हळद घाला व 2 वाटया पाणी घाला. अर्धी वाटी दह्यात 1 वाटी कुळथाचं पीठ घालून पेस्ट बनवा. हे मिश्रण फोडणी दिलेल्या पाण्यात ओता. चवीनुसार मीठ घालून मिश्रणाला उकळी येवू दया. थोडी कोथिंबीर घालून गरम भाताबरोबर सव्र्ह करा.

 शेव टमाटर

साहित्य –

जाड तुरकाटी शेव 1 वाटी
चिरलेले टमाटर 2 वाटी
चिरलेला कांदा 1 वाटया
आलं-लसूण पेस्ट 4 चमचे
तिखट, हळद चवीनुसार
धने-जीरे पावडर 1-1 चमचा
गरम मसाला र् आा चमचा
कोथिंबीर पाव वाटी
जीरे 1 चमचा

कृती –

फ्रायपॅनमध्ये तेल घेवून जीरे, आलं-लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, क्रमाक्रमाने घाला. नंतर चवीनुसार हळद, तिखट, मीठ, गरम मसाला व थोडेसे पाणी घाला. आवडत असल्यास थोडासा गुळ किंवा साखर घालून सर्वात शेवटी उकळी आल्यावर शेव व कोथिंबीर घालून सव्र्ह करा.

टमाटर चटणी

साहित्य:-

लाल टोमॅटो 200 ग्रॅम
मीठ चवीनुसार
गूळ चवीनुसार
हळद पाव चमचा
तिखटं चवीनुसार
जीरे अर्धा चमचा
बारीक चिरलेला लसूण 1 चमचा

कृती:-

दोन चमचे तेलात जीरं, हिंग, लसूण परतल्यावर यात टोमॅटो घालावे. टोमॅटोचे थोडे पाणी सुटल्यावर इतर जिन्नस घालून तेलसुटेस्तावर परतावे.

चुन बोंडयाचा रस्सा

साहित्य –

बेसन 2 वाटया
बारीक चिरेलला लूसण 2 चमचे
बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर 4 चमचे
खोबरं 4 चमचे
खसखस 2 चमचे
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
हिंग पाव चमचा

कृती –

बेसनामध्ये हळद, तिखट, मीठ, थोडे तेल व पाणी घालून भिजवून घ्या. आलं-लसूण पेस्ट थोडया तेलात परतून त्यात खसखस, खोबरं, कोथिंबीर, मीठ, हळद, हिंग घालून परतून घ्या. नंतर यात कच्चा कांदा व कच्चा लसूण घालून मसाला बनवा. हा मसाला भिजवलेल्या बेसनाच्या गोळात घालून छोटे बाॅल्स तयार करुन रस्स्यात सोडून उकळून घ्या.
रस्सा – 5 कांदे लाब कापून थोडया तेलात परतल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट 4 चमचे, खसखस अर्धी वाटी, खोबरं अर्धी वाटी घालून खमंग परतून मिक्सरमध्ये वाटून घ्या. तेल फोडणीला घालून त्यात थोडे जीरे, खडा मसाला व वरील वाटलेली पेस्ट, हळद, तिखट व थोडे पाणी घालून तेल सुटेस्तोवर उकळून मध्ये थोडी धणे-जीरे पावडर व गरम मसाला, चवीनुसार घालून उकळवा.

पाटोडी रस्सा

पाटोडीसाठी (हिला पाटवडी असेसुद्धा म्हणतात )
साहित्य –

सावजी ग्रेव्ही 2 वाटया
चण्याच्या डाळीचे पीठ 1 वाटी
खोब-याचे कीस 2 चमचे
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
तेल 2 चमचे
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा

कृती:-

पाटोडीसाठी:- थोडया तेलात मोहरी फोडणीला घालून त्यात हिंग, हळद, तिखट, मीठ व 1 वाटी पाणी घालून, बेसन घाला ढवळत राहा. मिश्रण शिजवा थोडे घट्ट झाल्यावर त्यात थोडी कोथिंबीर घालावा. नंतर हे मिश्रण ट्रेमध्ये घालून थापा. वरुन थोडा खोबरा कीस घाला. थंड झाल्यावर वडया कापाव्यात. भाजी सव्र्ह करतेवेळी सावजी ग्रेव्हीला थोड पातळ करुन चवीनुसार मीठ घालावे. नंतर यात तयार पाटोडया घालून एक उकळी आणावी.

21. मुगवडीची भाजी

साहित्य:-

मुंगडाळ 2 वाटया
आलं 2 चमचे
लसूण 2 चमचे
हिरवी मिरची 5-6
चिरलेला कांदा पाव वाटी
भाजलेली खसखस 3 चमचे
धने-जीरे पावडर 2 चमचे
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
मीठ चवीनुसार
तमालपत्र 2-3

कृती:-

मुगवडी करीता मुंग डाळ पाण्यात भिजवून वाटून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून छोटे छोटे वडे उन्हात वाळत घाला. कडकडीत वाळल्यावर डब्ब्यात भरुन ठेवा. किंवा या वडया बाजारात सुद्धा मिळतात. फ्रायपॅनमध्ये थोडे तेल टाकून या वडया परतून घ्या. त्याच तेलात थोडी आलं, लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, 3 चमचे भाजून वाटलेली खसखस, धने-जीरे पावडर, हळद, तिखट, तमालपत्र व्यवस्थित परतून घ्या. थोडे पाणी घालून तळलेल्या मुंगवडया घाला चवीनुसार मीठ सुद्धा घाला. वडया शिजत आल्या की गरम मसाला व कोथिंबीर सव्र्ह करा.

22. म्हाद्या

साहित्य –

दाण्याचा कुट 2 वाटया
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
आमचूर पावडर 1 चमचा
मीठ, साखर, हळद चवीनुसार
तिखट चवीनुसार,
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
धने-जीरे पावडर 1 चमचा
चिरलेली हिरवी मिरची 3-4
कांदे अर्धी वाटी.

कृती –

कढईत तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात आलं, लसूण आणि कांदे घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर, जीरा पावडर, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ, साखर घालून थोडया वेळ परतावे. शेवटी शेंगदाण्याचे कुट घालावे व वरुन थोडे पाणी घालून वाफेवर शिजवावे. वरुन सजावटीकरीता कोथिंबीर घालावी.

23. सावजी सुसॅन

कृती: 1 किलो मैदा पाण्यात घट्ट भिजवून त्याला दहा मिनिटांनी नळाखाली धुवावे. असे करत असताना, ह्यातील स्टार्च निघून जाईल व जे उरेल त्यास ’’ग्लूटन’’ असे म्हणतात. ते जवळपास 200 ते 150 ग्रॅम असेल. हा पदार्थ पाण्यात विरघळत नाही. ह्यानंतर थोडया उकळत्या पाण्यात एक चमचा मीठ घालून, त्यात हा पदार्थ सोडावा. 5-7 मिनिटे शिजवल्यानंतर, ह्याचे पाणी काढून तुकडे करावेत. ह्याला ’’सुसॅन’’ म्हणतात. (टीप: हे सुसॅन 5-6 दिवस फ्रीजमध्ये टिकते.) ह्याच्या भाजीसाठी 200 ग्रॅम सुसॅनला 2 वाटया सावजी ग्रेव्ही घालून गरम करावे. नुसते असेच सुसॅन टाकण्याऐवजी ते तळून टाकले तरी चालते. कोथिंबीर घालून गरमागरम वाढावे.

24. खसखसीची भाजी

साहित्य:-

भिजलेली खसखस 2 वाटया
किसलेला कांदा अर्धी वाटी
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
हिरवी कोथिंबीर 1 चमचा
धने जिरे पावडर 1 चमचा
हिंग पाव चमचा
तेल –
लवंग 1-2
तेजपान 2-3
काळा मसाला अर्धा चमचा

कृती:-

पातेल्यात तेल घालावे. तेल तापल्यावर त्यात लवंगा, तेजपान घालावे. फोडणी चांगली झाल्यावर त्यात लसूणची पेस्ट व किसलेला कांदा घालून परतावे. भिजलेली खसखस पाटा वरवंटयावर किंवा मिक्सरवर वाटून घ्यावे. कांदा लालसर झाल्यावर त्यात खसखस तेल सुटेस्तोवर शिजवावी. नतंर त्यात उरलेले मसाले, आलं व चवीनुसार मीठ घालून, थोडे पाणी घालून, थोडे परतून ही भाजी पोळी बरोबर खायला दयावी. अतिशय वेगळी आणि रुचकर अशी ही भाजी होते.