भाज्यांचे प्रकार

वांग्याच कच्च भरीत

साहित्य:-

मोठी वांगी 4-5
चिरलेला कांदा अर्धी वाटी
दही अर्धी वाटी
उकडलेला बटाटा 1 नग
टोमॅटो 1 नग
हिंग पाव चमचा
जीरे 1 चमचा
मोहरी 1 चमचा
हिरवी मिरची 4-5
बारीक लसूण 1 चमचा
कोथिंबीर

कृती:-

भरीताची मोठी वांगी छान भाजून घ्या. नंतर त्याची साले काढून आतला गर वेगळा करा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा (हिरवी कांदयाची पात असेल तर उŸाम), अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ व एक उकडलेला बटाटा स्मॅश करुन घाला. आवडत असल्यास टोमॅटो सुद्धा घाला. दुसÚया एका पॅनमध्ये हिंग, जीरे, मोहरी, हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेला लसूण त्याची फोडणी तयार करा व वांग्याच्या मिश्रणावर घाला.

वांग्याच भरीत

साहित्य –

भरीताची वांगी 2-3 नग
शेंगदाणे पाव वाटी
कांदयाची पात चिरलेली 2 वाटया
लसूण 1 नग
हिरव्या मिरच्या 10-12 नग
भरडलेले धने 2 चमचे
तेल अर्धी वाटी
मोहरी, हिंग फोडणीकरीता

कृती:-

वांग्यांना टोच मारुन ती निखाÚयावर किंवा गॅसवर भाजून घ्यावीत. वरची साल काढूल बारीक चिरुन घ्यावीत. मिरच्या लसूण जाडसर वाटावं. तेल तापवून त्यात हिंगाची फोडणी करावी. त्यात मिरची-लसूण वाटण, धने घालावे. त्यावर वांगी चांगली परतावी. नंतर मीठ, भाजलेले दाणे घालावे. सर्वात शेवटी कांद्याची पात घालून परतावं.

 भरली वांगी (मसाला वांगी)

साहित्य:-

छोटी ताजी वांगी 10 नग
कांदा चिरुन तळलेला 1 नग
तळलेले सुके खोबरे अर्धी वाटी
लसूण पाकळया 7-8 नग
आलं 1 इंच
लवंगा 4 नग
एक दालचीनीचा तुकडा –
धने जीरे पूड 1 चमचा
टोमॅटो प्युरी 1 मोठा चमचा
मीठ चवीनुसार
तिखट 1 मोठा चमचा
हळद योग्य प्रमाणात

कृती:-

तळलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण, दालचिनी, लवंग एकत्र करुन मिक्सरमधून वाटून घ्यावे. छोटी वांगी देठ न काढता भरल्या वांग्याप्रमाणे चिरावी. मीठ टाकलेल्या पाण्यात टाकावी. वांग्याचे फक्त काटे सुरीने काढून टाकावे. कांदा-खोबरं वाटण, धने-जीरे पूड, टोमॅटो प्युरी, मीठ तिखट, हळद टाकून मसाला एकत्र करावा. एक मोठा कांदा व मसाला टाकावा.
पाण्यातून वांगी काढून निथळून घेऊन त्यात मसाला भरावा. कढईत तेल टाकावं (दोन टेबलस्पून किंवा अर्धी वाटी) त्यात मोहरी टाकून तेल तापल्याची खात्री करुन मग भरलेली वांगी त्यात टाकावी आणि परतून घ्यावी. झाकण ठेवावं. मसाला परतून झाला असं वाटल्यास त्यात एक वाटी गरम पाणी टाकून झाकण ठेवून शिजू द्यावं. कोथिंबीर टाकावी. वांग्याला रस हवा असल्यास पाणी जास्त टाकावं. ही भरली वांगी भाकरीबरोबर छान लागतात.

वांगी बटाटे रस्सा

साहित्य –

वांग्याचे काप 1 वाटी
बटाटे काप 1 वाटी
कांदा अर्धी वाटी
आलं-लसूण 2 चमचे
धणे-जीरे पावडर 1-1 चमचा
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
चिंच अर्धा इंच
गूळ चवीनुसार
मीठ चवीनुसार

कृती –

लोखंडाच्या कढईत कांदा फोडणीला घालून चांगला परतल्यावर त्यात आलं-लसणाची गोळी, न सोललेले बटाटयाचे काप, वांगी घालून मीठ घाला. थोडा पाण्याचा हबका मारुन कमी पाण्यावरच शिजवा. धणे-जीरे पावडर, हळद, तिखट, चिंच, गूळ घालून खायला दया.

 कच्च्या तेलातले वांगे (कोल्हापुरी)

साहित्य:-

मसाल्याची छोटी वांगी 5 ते 7
कोल्हाूपरी चटणी 5 चमचे
आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची चटणी 1 चमचा
मीठ चवीनुसार
शेंगदाणा तेल अर्धी वाटी

कृती:-

वांग्याला मध्ये चिर देवून मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. कोल्हापूरी चटणीमध्ये हिरवी चटणी व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण वांग्यांमध्ये भरावे. अशी भरलेली वांगी पातेल्यात ठेवून त्यावर कच्चे तेल घालावे. साधारण वांगी बुडतील इतपत वर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालावे व मंद आचेवर अंगच्याच पाण्याने शिजवावे. शिजल्यानंतर तांबडया व पांढÚया रश्श्याबरेाबर अशी सुकी वांगी सव्र्ह करावी.
टीप:- झाकणावर पाणी टाकून पदार्थात पाणी न घालता शिजवण्याची ही पद्धत पारंपारिक आहे. फक्त शिजवतांना थोडी काळजी घ्यावी. याची चव निश्चितच वेगळी लागते.

 कढी गोळे

कृती:-

एका पॅनमध्ये तेल घेवून त्यामधे मोहरी, मेथीदाणा, कढीपत्ता, जीरे, हिंग घालून थोडे पाणी घाला. एक वाटी दह्यात तीन चमचे चण्याच्या डाळीचे पीठ घालून एकजीव करा. नंतर हे मिश्रण फोडणी दिलेल्या पाण्यामध्ये ओतून उकळी येईस्तोवर गरम करा. नंतर यात चवीनुसार मीठ, साखर व थोडे जास्तीचे पाणी घाला. दुसÚया एका भांडयात हिरवे चणे किंवा मटारचे दाणे बारीक करुन घ्या. त्यामधे चवीनुसार आलं, लसूण व मीठ घाला. थोडी कणीक घालून हलक्या हाताने गोळे करुन कढीत घाला. पाच ते सात मिनिटे मंद आचेवर उकळू दया.

फुलकोबी बटाटा रस्सा

साहित्य –

फ्लाॅवर पाव किलो
बटाटे 2 नग
मोहरी 1 चमचा
हिरव्या मिरच्या 2-3
हळद पाव चमचा
तिखट, मीठ चवीनुसार
हिंग पाव चमचा
कोथिबीर –

कृती –

फ्लाॅवर धुऊन तुकडे करुन बाजूला ठेवा तसेच बटाटयाचे सुद्धा काप करुन ठेवा.लोखंडाच्या कढईत तेल फोडणीला गरम करुन त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या व फ्लाॅवर व बटाटयाचे काप घाला. थोडे परतून त्यात हळद, तिखट, हिंग घाला. चवीनुसार मीठ, साखर घालून अंगच्याच पाण्याने शिजवा. वाटल्यास थोडे पाणी सुद्धा घालू शकता कोथिंबीर घालून गरमच खायला दया.

परतलेली भेंडी

साहित्य

बारीक लांब चिरलेली भेंडी 2 वाट्या
आलं लसूण पेस्ट 2 चमचे
अर्धा लिंबाचा रस 1 चमचा
मीठ चवीनुसार
तिखट, हळद चवीनुसार
कार्नस्टार्च अर्धी वाटी
तेल तळायला

कृती:-

बारीक चिरलेल्या भेंडीमध्ये काॅर्नस्टार्च सोडून सर्व जिननस घालावे. दहा मिनिटेे मुरल्यानंतर भेंडीचे बारीक लांब तुकडे काॅर्नस्टार्च मध्ये घोळवून डीप फ्राय करावे व त्यावर थोडा चाट मसाला घालावा. अशा प्रकारे तयार झालेली कुरकुरीत भेंडी स्नॅक्स म्हणून सुद्धा खाता येते.

हिरव्या मिरच्यांची भाजी

साहित्य –

मोठी हिरव्या मिरच्या 200 ग्रॅम
दाण्याचा कुट 1 वाटी
आमचूर पावडर 1 चमचा
मीठ, साखर चवीनुसार
खसखस 1 चमचा
सुकं खोबरं 4 चमचे
लसूण पेस्ट दीड चमचा
कोथिंबीर अर्धी वाटी
मोहरी 1 चमचा
हळद, हिंग पाव-पाव चमचा

कृती –

मिरच्या सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. नंतर हा मसाला मिरच्यांमध्ये भम्न बाजूला ठेवा. कढईत थोडे तेल घालून मोहरी, हिंग, हळद याची फोडणी करुन त्यात भरलेल्या मिरच्या घाला. चवीनुसार मीठ घालून मिरच्यांना परतून घ्या वाटल्यास थोडा पाण्याचा शिबका मारा व लगेचच सव्र्ह करा.

बटाटाच्या काच-या

साहित्य –

बटाटयाचे पातळ काप 2 वाटया
मोहरी 1 चमचा
हिरवी मिरची 3-4
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
हिंग पाव चमचा
कोथिंबीर 2 चमचे

कृती –

बटाटयाचे पातळ काप करुन पाण्यात ठेवा. फ्रायपॅनमध्ये मोहरी फोडणीला घालून त्यामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, हिंग परतून घ्या. साधारण पाच बटाटे असेल तर 2 कांदे घ्यावे. कांदा लालसर झाल्यावर चवीनुसार हळद, तिखट, मीठ घाला. आवडत असल्यास थोडी साखर व बटाटयाचे काप घाला, कोथिंबीर घालून सव्र्ह करा.

बटाटयाची सुकी पिवळी भाजी

साहित्य –

उकडलेले बटाटा 200 ग्रॅम
मोहरी अर्धा चमचा
हळद, हिंग पाव-पाव चमचा
हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट 4 चमचे
लिंबू, मीठ, साखर चवीनुसार
ओलं खोबरं 2 चमचे
कोथिंबीर 4 चमचे

कृती –

सर्वप्रथम तेल गरम करुन मोहरी, हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट, हळद, हिंग घालून कुस्करलेले बटाटे त्याच बरोबर मीठ, साखर, लिंबू घालून छान परतून घ्या. ओलं खोबरं व कोथिंबीर घालून सव्र्ह करा.

 झुणका

साहित्य:-

बेसन 1 वाटी
बा. चिरलेले कांदे अर्धी वाटी
तेल अर्धी वाटी
आलं-लसूण पेस्ट 1-1 चमचा
हळद पाव चमचा
धने पावडर अर्धा चमचा
तिखट चवीनुसार
आमचूर पावडर –
मीठ, साखर चवीनुसार
मोहरी अर्धा चमचा

कृती:-

तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात आलं, लसूण आणि कांदे घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर, जीरा पावडर, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ, साखर घालून थोडया वेळ परतावे. शेवटी बेसन घालावे व वरुन थोडे पाणी घालून वाफेवर शिजवावे. वरुन सजावटीकरीता कोथिंबीर घालावी.