शेअर्स खरेदी करताना

शेअर बाजारातून शेअर्स खरेदी करताना काही पथ्य पाळावी लागतात.आर्थिकदृष्ट्या चांगल्या

स्थितीतील शेअर्सच्या खरेदीत रस घ्यावा. जास्त दाराचे शेअर्स खरेदी करू नका.ऐपतीपेक्षा जास्त

शेअर्सची खरेदी करू नका. कोणत्याही शेअर्सच्या प्रेमात फार न पडता वेळोवेळी नफा घेत जावं.

त्यामुळे नवी गुतवणूक सहजसाध्य ठरते. अफवांमुळे किंवा शेअर्स बाजारातील सट्टेबाजांच्या कृतीमुळे

घाबरून जाऊ नका.शेअर बाजारातील अनिश्चित स्थिति लक्षात येताच व्यवहार करण्यापासून दूर

राहणं इष्ट ठरतं.कोणाच्याही सांगण्यावरून किंवा अंधविश्वासानं गुंतवणूक न करता, कंपनीची मूलभूत

सूत्रं अभ्यासून गुंतवणूक करावी. ज्या वेळी मागील वर्षाच्या कमीत कमी किमतीइतकी किंवा तिच्या

जवळपास शेअर्सची किंमत असते त्या वेळी कंपनीची सर्वसाधारण परिस्थिति अजमावून शेअर्स खरेदी

त्वरित करावी. गत वर्षीच्या जास्तीत जास्त किमतीइतकी शेअर्सची किंमत असेल आणि कंपनी

बद्दल विश्वास वाटत असेल तर गतवर्षीच्या सरासरी दराइतका भाव शेअर बाजारात आला असेल

तरीसुद्धा खरेदीची संधी सोडू नये.आता शेअर्सची विक्री करतानाही कोणती काळजी घ्यावी लागते ते

बघू .अवास्तव पातळीवर किंमत उत्पन्न गुणोत्तर (पी.ई.रेशो) उंचावलं की त्या कंपनीच्या शेअर्सची

विक्री त्वरित करावी. किंमत-उत्पन्न गुणोत्तर जर ४० वर पोचले की सर्वसाधारण त्या कंपनीच्या

शेअर्सची विक्री करावी. असा अलिखित पायंडा शेअर बाजारात जाणकार लोक पाळतात. फारच थोड्या

कंपन्या वृद्धीदर ५०% टक्क्यांहून अधिक दाखवतात.त्यामुळे किंमत-उत्पन्न गुणोत्तरावर लक्षं ठेवून

विक्री करावी. जर एखाद्या कंपनीच्या शेअर्सवर १००% टक्के किंवा त्याहून जास्त नफा अल्पावधीत

झाला असेल तर जास्त नफ्याची हाव नं धरता विक्री करून नफ्याचा आनंद घावा, एखाद्या कंपनीचे

शेअर्स घेतल्यावर जर खरेदी किमतीपेक्षा बाजारभाव खाली आला तर घाबरून विक्री करू नका. दहा

टक्के कमी किंवा अधिक फरक गुंतवणूक करतानाच लक्षात ठेवा म्हणजे खरेदी-विक्रिचं दडपण

जाणवणार नाही.कोणीतरी टीप दिली म्हणून शेअर्सची खरेदी-विक्री टाळावी. स्वतः अभ्यास करून,

गुंतवणुकयोग्य कंपन्या शोधून गुंतवणूक करावी. काही वेळा अल्प नफ्यात समाधानी राहणं इष्ट

ठरतं.

गुणोत्तरांचे शेअर्स गुंतवणुकीतील महत्व

प्रत्येक गुंतवणूकदारास आपल्या शेअर्समधील गुंतवणुकीवर लाभ अपेक्षित असतो. अर्थात ते योग्य

आहे. पण हा लाभ किती मिळू शकेल किंवा कंपनीची हा लाभ देण्याची इच्छा आणि कुवत कितपत

आहे याची कल्पना “पे आऊट रेशो’वरुनच येते. “पे आऊट रेशो” म्हणजे कंपनीनं एकूण कमाईतील

किती हिस्सा लाभांशाद्वारे गुंतवणूकदारांना वाटला आणि किती भाग शिल्लक ठेवला ते दाखवणारं

गुणोत्तर प्रति शेअरवर दिलेल्या लाभांशाने प्रति शेअर उत्पन्नास भागलं असता, लाभांश-‘पे आऊट

रेशो’मिळतो. तसेच कंपन्या निव्वळ नफ्यातील काही भाग गंगाजळी किंवा संचयित राखीव निधि

म्हणून बाजूला काढतात. या वरुन कंपनीची सुदृढ आर्थिक क्षमता समजते. ज्या कंपन्या भरघोस व

नियमितपणे दरवर्षी लाभांश देतात, अशा कंपन्यांच पे आऊट गुणोत्तर नेहमीच जास्त असतं. पण

शेअर बाजारात भांडवली वृद्धीच्या दृष्टीने पे आऊट गुणोत्तर कमी असलेल्या कंपन्या बहुसंख्य

गुंतवणूकदारांना आवडतात, असा अनुभव आहे. या गुणोत्तराबरोबरच लाभांश-उत्पन्नाचं गुणोत्तर

(डिव्हिडंड यील्ड रेशो) महत्वाच ठरतं. या गुणोत्तरावरून शेअरच्या बाजारातील दराच्या तुलनेत त्या

शेअरवर लाभांशाच्या स्वरुपात किती उत्पन्न किंवा लाभ झाला ते काढता येतं. हे गुणोत्तर पुढील

सूत्रांनुसार काढता येतं. प्रति समभाग लाभांश भागिले समभागाची बाजारी किंमत गुणिले १००

म्हणजेच लाभांश-उत्पन्न गुणोत्तर. शेअर बाजारात खरेदी-विक्री करताना, गुंतवणूक मोठी असेल तर या

आधी अभ्यासलेल्या गुणोत्तरांसह इतर सूत्रे लक्षात ठेवली तर नफ्याचे प्रमाण वाढविता येईलच पण

तोट्याची शक्यता कमी करणे शक्य होईल. घसारा आणि करपूर्व नफा यांची बेरीज केली की एकूण

नफा [ग्रोस प्रॉफिट] मिळतो.याच एकूण नफ्यास भाग भांडवलाने भागिले असता प्रत्येक शेअरवरील

नफा मिळतो. नफा-उत्पन्न गुणोत्तर मिळविण्यासाठी त्या शेअरच्या बाजारभावास एकूण नफ्याने

भागिले जाते. विक्री उलाढालीने एकूण नफ्यास भगिले असतं एकूण नफ्याचे मार्जिन [ग्रोस प्रॉफिट

मार्जिन] मिळते. गुंतवलेल्या भांडवलावरील उत्पन्न टक्केवारी काढण्यासाठी भागधारकांच्या निधीसह

कर्जाच्या रकमेस करपूर्व व्याजची तरतूद करण्याआधीच्या नफ्याने भागून येणार्‍या संख्येस १००ने

गुणावे लागते. तसेच कंपनीचे स्थैर्य प्रमाण कळण्यासाठी कंपंनीच्या स्थिर मालमत्तेस भागधारकांच्या

निधिने भागून येणा-या संख्येस शंभरने गुणावे लागते. या गुणोत्तरांच्या माहितीबरोबर कंपन्यांचा

संक्षिप्त वार्षिक अहवाल वाचण्याची व अभ्यासण्याची सवय लावली पाहिजे.

नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाचे महत्व

प्रत्येक कंपनीनं आपल्या भागधारकांना नफा-तोट्याच्या ताळेबंदाबरोबरच कोणत्या तपशीलांची

सविस्तर माहिती दिली पाहिजे.हे कंपनी कायद्यात नमूद केलं आहे. या कायद्यान्वये प्रत्येक कंपनीनं

दरवर्षी आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर पुढील सहा महिन्यात आर्थिक ताळेबंद संचालकांच्या अहवालासह

व लेखा परीक्षकांच्या अहवालासह ( ऑडिटर रीपोर्ट ) भागधारकांच्या वार्षिक सर्व साधारण सभेत

सादर केला पाहिजे. हा संक्षिप्त वार्षिक अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी एकवीस दिवस

त्या कंपनीनं त्यांच्या भागधारकांना पाठवला पाहिजे. संक्षिप्त ताळेबंदात विविध मार्गांनी निधि कसा

जमा केला. ( सोर्सेस ऑफ फ्ंड्स ) तसचं या निधिचा विनियोग कसा केला. ( अॅप्लिकेशन ऑफ

फ्ंड्स ) दिलेलं असतं. जमा केलेल्या निधि पैकी भागधारकांचा निधी ( शेअर होल्डर्स फ्ंड्स ) किती

व करजाऊ घेतलेला निधी ( लोन फ्ंड्स ) किती याचा तपशील असतो. भागधारकांचा निधी दोन

भागात विभागून देतात. मूळ भागभांडवलाचा एक विभाग व राखीव निधी संचयित नफ्याचा दूसरा

भाग असतो. त्यानंतर नफा -तोट्याच पत्रक सोबत दिलेलं असतं.

नफा-तोटा पत्रक (प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट) म्हणजे विविध उत्पन्न आणि खर्च यांचा सारांशरूपातील

अहवाल असतो. नफ्या-तोट्याच्या पत्रकावरून कंपंनीच्या व्यावसायिक कामगिरीवर प्रकाश पडतो.

उत्पन्न हा घटक कंपंनीच्या उत्पादन विकृतून मिळतो. तसेच यात अतिरिक्त उत्पन्न किंवा तोटा

यांचाही समावेश असतो. इतर उत्पन्नात निर्यातीचा प्रोत्साहनकारी लाभ, लाभांश, व्याज, भाड्याचे

उत्पन्न मालमत्ता विकृतून झालेला नफा, तांत्रिक शूल्के इत्यादींचा समावेश असतो.

कच्चा माल व इतर खर्च, व्याज, घसारा, आणि करसाठी केलेली तरतूद इत्यादींचा समावेश खर्च या

घटकात येतो. कच्चा माल व इतर खर्चात उत्पादनखर्चासह कर्मचा-यांना द्यायची देणी, उत्पादनाच्या

विक्री तसेच वितरणाचा खर्च आणि आस्थापनेचा खर्च यांचा समावेश असतो.

कर्जरोखे, मुदतकर्ज, खेळत्या भांडवलाची गरज, वित्तीय शुल्क, आणि हमीदारांसाठीची दलाली

इत्यादींसाठी देण्यात येणारी रक्कम व्याज म्हणूच दर्शवलेली असते. करांसाठी असेली तरतूद

कंपंनीवरील त्या कालावधीसाठी असलेले करदायित्व दर्शविते. करोत्तर नफ्यातील काही हिस्सा

गुंतवणुकीसाठी, लाभांशासाठी आणि गंगाजळीसाठी(रिझर्व्ह) राखून ठेवला जातो. उर्वरित नफा

ताळेबंदात दर्शविलेला असतो.

कोणत्याही कंपनीचे मूळ उद्दीष्ट व्यवसायातून नफा कमविणेच असते. त्यामुळे कंपंनीच्या

व्यावसायिक कामगिरीचे चित्र विक्री-खर्च आणि नफा यातूनच स्पष्ट होत जाते. अर्थात यातूनच

कंपंनीच्या व्यवस्थापनाच्या गुणवत्तेची ओळख पटून त्यांची दिशा स्पष्ट कळून येते.

कंपनीची उलाढाल आणि गुणोत्तरे

शेअर्सच्या गुंतवणुकीत गणिती प्रक्रिया चुकत नसल्याने गुणाकार–भागाकार केल्याशिवाय नेमके ज्ञान

किंवा उत्तर प्राप्त होत नाही. आर्थिक विश्लेषणात अनेक प्रकारची गुणोत्तरे नजरेखालून घालावी

लागतात. ज्या कंपनीचा शेअर खरेदी करावयाचा असतो त्या कंपनीच्या आर्थिक आणि क्रियाशील

कामगिरी अजमावण्यासाठी करंट रेशो आणि क्विक रेशो बघितला जातो. या रेशोंवरून कंपनीची

रोखता [लिक्विडिटी] अजमावता येते. करंट रेशो मिळण्यासाठी करंट अॅसेट्सला[चालू मालमत्ता] करंट

लायबिलिटीजने [चालू कर्जे] भागिले जाते. अर्थात या चालू कर्जात अल्प मुदतीच्या कर्जाचा अंतर्भाव

असतो. क्विक रेशो काढण्यासाठी करंट अॅसेट्समधून इन्वेंटरी वजा करून करंट लायबिलिटीजने

भागिले जाते. भाग भांडवल रचनेचे गुणोत्तर कंपनीने आजवर वापरलेले भाग भांडवल आणि विद्यमान

कर्ज यामधील प्रमाण दर्शविते.

कर्ज-समभाग गुणोत्तर काढताना एकूण कर्ज निधीस निव्वळ मोल[नेट वर्थ]ने भगिले जाते. हेच

गुणोत्तर एकूण कर्जतून निव्वळ मोल वजा करून येणा-या संख्येस निव्वळ मोलने भागिले असताही

मिळते. कंपंनीच्या शिरावर असणा-या कर्जावरील व्याजाचा बोजा त्या कंपंनीच्या उत्पन्नावर किती

परिणामकारी ठरतो ते इंटरेस्ट कवरेज गुणोत्तराने कळते. हे गुणोत्तर व्याज आणि कर पूर्व नफ्यास

व्याजाने भागिले असता प्राप्त होते.

अधिकाधिक विक्रीसाठी कच्च्या मालाचे नियोजन आवश्यक ठरते. तसेच तयार होणा-या उत्पादंनाचेही

व्यवस्थापन गरजेचे असते. इन्वेंटरी उलाढालीचे गुणोत्तर [इन्वेंटरी टर्नओवर रेशो] निश्चित करताना

इन्वेंटरीस निव्वळ विकरीने भागून जेवढ्या दिवसांसाठीचे प्रमाण काढवयाचे आहे तेवढ्या दिवसानी

गुणावे. ऋणको-उलाढाल प्रमाण [डेब्टर्स टर्नओवर रेशो] काढताना ऋणकोच्या [संड्रि डेब्टर्सं] टर्नओवर

रेशो संख्येस निव्वळ विक्रीने भागावे. हे प्रमाण जेवढ्या दिवसांचे हवे आहे तेवढ्या दिवसानी गुणावे.

धनको-उलाढाल गुणोत्तर निश्चित करताना धनकोंच्या [संड्रि क्रेडिटर्स]संख्येस निव्वळ विक्रीने भागून

जेवढ्या दिवसांसाठीचे प्रमाण काढवयाचे आहे तेवढ्या दिवसानी गुणावे. खेळत्या भांडवलाच्या

उलाढालीचे प्रमाण [वर्किंग कॅपिटल टर्नओवर रेशो] काढताना चालू मालमत्तेतून चालू कर्जे वजा करून

येणा-या संख्येस निव्वळ विक्रीने[नेट सेल्स] भागावे. व्याजाच्या उलाढालीचे प्रमाण काढताना

व्याजाच्या रकमेस निव्वळ विक्रीने भागून शंभरने गुणावे.

पोर्टफोलियोवरील उत्पन्नदराचे सूत्र

बहुसंख्य गुंतवणूकदार जो आपल्या रोखेसंग्रहात [पोर्टफोलियो] विविध प्रकारची आर्थिक साधंनांद्वारे

गुंतवणूक करतो, त्यास आपल्याकडे असलेल्या रोखेसंग्रहातील शेअर्स, बॉण्ड्स किंवा रोख्यांवर किती

उत्पन्नदर प्राप्त होत आहे ते पुढील सूत्रानं कळते. तीन टप्प्यात हे गणित करावं लागतं.

१) प्रथम शेअर्स, बोंड्स किंवा रोख्यांवरील व्याज, लाभांश, भांडवली नफा (स्वीकारलेला) व प्रत्यक्षात

दिसत असलेला भांडवली नफा (पण न स्वीकारलेला) यांची बेरीज करावी, ही बेरीज (अ) समजू.

या वजाबाकीतून येणारी संख्या प्रारंभीच्या गुंतवणुकीत मिळवावी. ही बेरीज (ब) समजू.

३) रोखेसंग्रहात किती दिवसात हे शेअर्स,रोखे, किंवा बोण्ड्स धारण अवधी उत्पन्नदर किती टक्के

(होल्डिंग पीरियड रिटर्न रेट) दर्शवीत आहेत ते (अ) संख्येस (ब) संख्येने भागिले असता कळतं.

पुढील उदाहरणावरून हे अधिकच स्पष्ट होईल. समजा रोखेसंग्रहाची (पोर्टफोलिओ) सुरवात 1 लाख १०

हजार ५०० रु पासून झाली, असून ८,६०० रुपयांची लाभांश व व्याज धरून वर्षभरातील लाभाची रक्कम

आहे. भांडवली नफा १२,००० रूपयांचा झाला असून, न स्वीकारलेला नफा होण्याऐवजी तोटा झालेला

दिसत आहे. हा तोटा ६००० रूपयांचा,नवीन निधी १०,००० रूपयांचा एप्रिल महिन्याच्या सुरवातीस

जमा केला तर ४००० रु. चा निधी ऑक्टोबर महिन्यात काढून घेतला. या रोखेसंग्रह धारण-अवधी

उत्पन्नदर प्रतिवर्ष पुढील प्रमाणे येतो.

जर सहा हजार रुपयांच्या तोट्याऐवजी नफा झाला असता तर हा दर अजून वाढला असता.

कंपंनीच्या वार्षिक अहवालात काय असते?

कंपनीच्या वार्षिक अहवालात साधारणतः अकरा शीर्षकाखाली कंपनी कायद्यानुसार आवश्यक असणारी

माहिती व आकडेवारी सादर केलेली असते. अनुक्रमणिकेनंतर संचालक मंडळातील व व्यवस्थापनातील

उच्चपद्स्थ सदस्यांची नावं दिलेली असतात. कंपनीचे बॅंकर्स म्हणजेच कंपनी कोणत्या बँकानमार्फत

आर्थिक व्यवहार करते त्यांची नावं असतात. लेखापरीक्षकाचं (ऑडिटर्सं) नाव देतानाच अंतर्गत

लेखापरीक्षकांचही (इंटरनल ऑडिटर्स) नाव दिलेलं असतं. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा (रजिस्टर्ड

ऑफिस) व मुख्य कार्यालयाचा (हेड ऑफिस) संपूर्ण पत्ते दिलेले असतात. कंपनीचे निबंधक व शेअर

हस्तांतरण एजंट म्हणून काम करणार-या रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजन्सीचे

नाव,पत्ता,दूरध्वनी,फॅक्स व ई-मेल दिलेले असतात. पुढील पानावर कंपनीच्या किंवा उद्योगसमूहाच्या

अध्यक्षांच उद्योगसमूहाबरोबरच कंपनी कामगिरीवर आणि भविष्यातील विकासाबाबत केलेलं भाष्य

असतं. यात प्रतीशेअर उत्पन्न आणि लाभांशाचा उल्लेखही असतो.

जर कंपनीला मुख्य कार्यकारी अधिकारी (सी ई ओ) असेल ते प्रत्येक विभागावर कंपनीच्या कार्य

पद्धतीबाबत, तसचं विकलेल्या किंवा नव्याने विकत घेतलेल्या कंपन्यांची माहिती व त्या कृतीमागील

कारणमीमांसा त्यांच्या भाष्यात स्पष्ट केलेली असते. कॉर्पोरेट गव्हर्न्सच्या अहवालात संचालकांच्या

एकूण किती सभा झाल्या आणि किती संचालक किती सभांना हजर होते ते सांगितलेलं

असतं.लेखापरीक्षण समिती सदस्यांची नावं आणि घेतलेले निर्णय, किंवा नोंदवलेली निरीक्षणं थोडक्यात

मांडलेली असतात. संचालकांना देण्यात येणारं वेतन व इतर फायदे स्पष्ट दर्शवलेले

असतात.भागधारक किंवा गुंतवणुकदारांच्या तक्रारी निवारण्यासाठी एक समिती स्थापलेली असते.या

समितीकडे एकूण किती तक्रारी आल्या आणि किती तक्रारींच निवारण केलं त्याची आकडेवारीही

दिलेली असते. मागील तीन वर्षाच्या सर्वसाधारण वार्षिक सभा कुठे आणि कोणत्या दिवशी, कोणत्या

वेळी झाल्या याचाही उल्लेख असतो. व्यवस्थापकीय पातळीवरील महत्वाचे निर्णय आणि

विश्लेषणात्मक अहवाल यांची थोडक्यात माहिती दिलेली असते. गेल्या वर्षभरातील शेअर बाजारातील

कंपनीच्या शेअर्सची झालेली वध-घट, उच्चतम व न्युनतम दर (प्रत्येक महिन्याचे) दर्शवलेले असतात.

एकूण भागधारक किती, त्यात प्रवर्तक विदेशी वित्तसंस्था ,देशी वित्तसंस्था ,अनिवासी भारतीय व

निवासी व्यक्तींच्या शेअर्सची धारण टक्केवारी त्यांच्या एकूण शेअर्सच्या संख्या दर्शवून मांडलेली

असते.लेखा परीक्षकांचा अहवाल त्यानंतर दिलेला असतो. लेखापरीक्षण अहवालानंतर नफा-तोटा पत्रकं,

ताळेबंद व त्यांचे लेखापरीक्षित अहवाल दिलेले असतात. कंपनीच्या दहा वर्षातील कामगिरीचा आढावा

दर्शवताना उत्पन्न, मालमत्ता, भागभांडवल, प्रतिशेअर उत्पन्न, शेअरचं पुस्तकी मूल्य आणि लाभांशाचं

प्रमाण दिलेलं असतं.

ए-डी-इंडेक्सचे परिमाण

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना बाजारातील प्रचलित शब्द ,संकल्पना व विविध प्रकारच्या आर्थिक

गणिती प्रक्रियांना सामोरं जावं लागतं. क्लिष्ट आणि बेभरवशाचा असणारा शेअर बाजार अजून गूढ

वाटू लागतो. ब-याचश्या संकल्पना आणि गणिती प्रक्रियांची याधीच ओळख करून घेतली आहे. प्रत्यक्ष

व्यवहार करताना काही शब्द किंवा संकल्पना पुढ्यात येतात आणि गोंधळायला होतं. एखादा दलाल

किंवा गुंतवणूकदार बोलतो की ‘अबक’ कंपनीज शेअर गोज इन द टॅंक’याचा अर्थ अबक कंपनीच्या

शेअर्सची किंमत झपाट्यानं कमी होत असून तोट्याकडे वाटचाल चालू आहे. मराठीत हाच अबक शेअर

डब्यात गेला’ असही म्हणू शकतो. शेअर बाजारातील विशीष्ट शेअर किंवा शेअर्सच्या व्यवहारांची संख्या

आणि उलाढाल मोठी असेल तर मात्र शेअर्सच्या खरेदी-विक्रीतील किमतीतील फरक कमी असतो.

तसच,वित्तीय संस्थांच्या खरेदी-विक्रीतील कृतींचा फार कमी परिणाम होत असतो. अशा वेळी अॅक्टिव

मार्केट’ असल्याच म्हंटलं जातं.ज्या शेअर्समुळे हे मार्केट असं कृतीशील बनलेलं असतं त्या शेअर्सना

अॅक्टिव शेअर्स’असं म्हंटलं जातं. शेअर्स बाजारातील तेजीचा प्रवाह (बुलीश ट्रेण्ड ) किंवा मंदीचा प्रवाह

( बेअरिश ट्रेण्ड ) निश्चित करण्यासाठी ए-डी-इंडेक्स’( एड्व्हांन्स डिक्लाईन इंडेक्स ) हे परिमाण

उपयुक्त ठरतं.ज्या शेअर्सच्या किमतीत वाढ होत आहे,अशा शेअर्सच्या संख्येला ज्या संख्या एकापेक्षा

अधिक असेल तर तेजीचा प्रवाह दर्शवतो. जर हा भागाकार एकापेक्षा कमी संख्या दर्शवत असेल तर

मंदीचा प्रवाह दर्शवतो. उदाहरणावरून लक्षात येईल-जर एका विशिष्ट दिवशी ३०० शेअर्सच्या किमतीत

वाढ झाली आहे .परंतु १५० शेअर्सच्या किमतीत घट झाली आहे .तर ३०० भागिले १५० केले असता

भागाकर २ आला. या दिवशी तेजीचा प्रवाह आहे हे सिद्ध होतं.

बहुसंख्य गुंतवणूकदार अज्ञानापोटी वा चुकीच्या माहितीमुळे एका दिवसातील व्यवहारातून ( डे ट्रेडिंग )

नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. ज्यांची सट्टेबाज वृत्ती आहे अशांचा ‘डे ट्रेडिंग’ कडेच कल असतो.

परंतु वर्ष दोन वर्षात शेअर्स गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगली ‘मालमत्ता’ निर्माण केल्यानंतरच योग्य

मार्गदर्शन, अभ्यास आणि व्यवहारातील सातत्याच्या जोरावर ‘डे ट्रेडिंग’ सावध पणे करावं. अशा

सावधपणे आणि योग्य माहितीच्या आधारे केलेल्या व्यवहारांतून नफा मिळवता येऊ शकतो.

पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची ओळख

पोर्टफोलिओ मॅनेजमेंट बद्दल बरेच शेअर दलाल कंपन्या आणि म्युच्युअल फण्ड्सकडून ऐकायला

मिळते. काही कंपन्या दहा लाख रुपयांपासून निधि मागतात तर काही फक्त कोटी रुपयांत निधि

असेल तरच स्वीकारतात. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजेच रोखेसंग्रह व्यवस्थापन. या रोख्यांमध्ये

शेअर्स, डिबेंचर्स, सरकारी बोंड्स[रोखे] आणि म्युच्युअल फंडांचे युनिट्स असतात. १९५१ मध्ये ही

पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची संकल्पना अर्थतज्ञ मारकोवित्झ यांनी मांडली. विविध प्रकारच्या

रोख्यांमध्ये[सिक्युरिटीज] मध्ये [शेअर्स, डिबेंचर्स, सरकारी बोंड्स[रोखे] आणि म्युच्युअल फंड्स इत्यादी]

गुंतवणूक विभागली असतं जोखीमेचे प्रमाण कमी होऊन या वैविध्यपूर्ण गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न

मिळवता येते हे या संकल्पनेतून मांडले. त्या बद्दल त्यांना १९९०चे नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला.

हा पुरस्कार मारकोवित्झ यांना शार्प आणि मिलर या दोन अर्थशास्त्रज्ञांसह देण्यात आला होता.

भांडवली मालमत्ता मूल्यांकन प्रतिकृती विकसित करण्यात शार्प यांचा वाटा होता. त्यात त्यांनी

बाजाराशी निगडीत असलेल्या व नसलेल्या जोखमांचे वर्गीकरण करून जोखमीचे नेमके मोजमाप

करण्याबाबतचे सिद्धान्त मांडले होते. जोखीम नियोजनांच्या घटकांबरोबरच कंपन्यांचे, उद्योगक्षेत्राचे

आणि सरकारी औद्योगिक धोरणांचे विश्लेषण करणे ही एक महत्वाची क्रिया या रोखेसंग्रह

व्यवस्थापनात म्हणजेच पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये होत असते.

कंपंनीच्या शेअर्सची निवड करताना किंवा त्या कंपंनीच्या ऋणबंध पत्रे [डिबेंचर्स] खरेदी करताना त्या

कंपनीचा सर्व बाजूंनी अभ्यास होणे आवश्यक ठरते. कंपन्यांचा ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रकांचा

अभ्यास महत्वपूर्ण ठरतो. स्थिर किंवा कायमस्वरूपी उत्पन्नाचे कोणते मार्ग कंपन्यांकडे आहेत, तसेच

करदायीत्वाची गरज भागविण्यासाठी कंपन्यांनी कोणते उपाय योजिले आहेत. असे अनेक क्लिष्ट

आणि गणिती प्रक्रियायुक्त विश्लेषण यात केले जात असते. उदयोगक्षेत्राचे विश्लेषण करताना

सरकारची त्या उद्योग क्षेत्राविषयी असलेली विद्यमान धोरणे आणि त्यांचे अपेक्षित असलेले चांगले-

वाईट परिणाम यांचा विचार रोखेसंग्रह व्यवस्थापकाने करणे अपेक्षित असते.

पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचा करार करण्याआधी

पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये सुमारे चाळीस ते पन्नास गुणोत्तरे [रेशो], सूत्रे [फॉर्म्युलाज], आणि

समीकरणांचा [इक्वेशन्स] उपयोग केला जात असतो. संगणकीकृत प्रक्रियेमुळे या गणिती प्रक्रिया

सुलभ होता असल्या तरी प्रत्येक गुंतवणूकदाराची गरज, उद्दिष्टे आणि अपेक्षा लक्षात घेऊनच हे

व्यवस्थापन अतिशय शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध होणे आवश्यक होणे आवश्यक ठरते. पोर्टफोलिओ

मॅनेजमेंटमध्ये फक्त शेअर्स, म्युच्युअल फंडांचे युनिट्स आणि बोंण्ड्स असतात असा एक गैरसमज

काही लोकांमध्ये आहे. काही वित्तीय संस्था शेअर्स-रोख्यांसह सोन्या-चांदीत एवढच नव्हे तर

प्लॅटिनममध्ये, हिर-यां मध्ये-दुर्मिळ रत्ने- माणकांमध्ये, वाईनमध्ये, स्थावर मालमत्तेत तसेच दुर्मिळ

वस्तु-शिल्पे-चित्रे, पोस्टल स्टॅम्प्स, भारत सरकारने काढलेली विशेष स्मृति नाणी, शर्यतीतील घोडे अशा

अनेक प्रकारच्या ‘अॅसेट्स’म्हणजेच मालमत्तांमध्ये ही संपत्ती [वेल्थ] विभागून ठेवतात. या प्रकारच्या

सर्व मालमत्तांच्या नियोजनाची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेणार्‍या संपत्ती

व्यवस्थापकाची संख्या आज देशात लक्षणीय आहे. अर्थात त्यासाठी घेतले जाणारे व्यवस्थापन

शुल्कसुद्धा मोठे असते.

बहुसंख्य पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा वेल्थ मॅनेजमेंट करणा-या वित्तीय संस्था निधी किंवा निधीसह

आधीचा सर्व रोखेसंग्रह स्वीकारून त्याची पोचपावती करारान्वये देतात. त्याशिवाय गुंतवणूकदाराला

त्या वित्तीय संस्थेच्या नावे प्राधिकर पत्र [पॉवर ऑफ अॅटर्नि] द्यावे लागते. त्या वित्तीय संस्थेच्या

नियमांनुसार ते सांगतील त्या बँकेत बचत आणि डिमॅट खाती उघडणे बंधनकारक ठरते. सरासरी

निव्वळ मालमत्तेच्या मूल्यानुसार [नेट अॅसेट वॅल्यू ] एकरकमी शुल्क पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसाठी

आकारण्यात येते. काही वित्तीय संस्था दरवर्षीच्या होणार-या नफ्यातील हिस्सा काढून घेतात. तर काही

संस्था फक्त शुल्कच आकारतात. याशिवाय ताबा शुल्क [कस्टोडियन चार्जेस], बँकिंग शुल्क,

लेखापरीक्षण शुल्क [ऑडिट फीज] इत्यादि शुल्के गुंतवणूकदारांकडूनच वसूल केली जातात. अर्थात या

सर्व शुल्कांची आकारणी सेबीने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे करणे त्या वित्तीय संस्थांवर

बंधनकारक आहे. या वित्तीय संस्था गुंतवणूकदारांना त्यांच्या संपूर्ण पोर्टफोलिओचा म्हणजेच

रोखेसंग्रहाचा साप्ताहिक, मासिक, किंवा त्रैमासिक अहवाल देतात. पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसाठी निधी

आणि किंवा विद्यमान आपला रोखेसंग्रह देण्याआधी नामवंत आणि विश्वासपात्र वित्तीय संस्थाकडून

कोटेशन्स जरूर मागावीत. कोणत्याही जाहिरातीला आणि आमिषाला बळी न पडता तसेच कोणतीही

भीड न बाळगता मनातील शंका विचारून प्रसंगी सेबीच्या वेबसाईटवरील माहितीच्या आधारे प्रत्यक्ष

गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. वित्तीय संस्थेबरोबर केल्या जाणा-या कराराची प्रत आधीच मागवून घेऊन

तुमच्या चार्टर्ड अकौंटंटशी किंवा कायदेशीर सल्लागाराला दाखवून त्यांच्या सल्ल्याने त्या करारांवर

सह्या कराव्यात.

पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचे खरे उद्दीष्ट

पोर्टफोलियो मॅनेजर म्हणजेच रोखेसंग्रह व्यवस्थापक ज्यावेळी गुंतवणूकदाराचा सर्व पोर्टफोलियो

ताब्यात घेतो,त्यावेळी त्याचे पहिले उद्दीष्ट त्या गुंतवणूकदारासाठी चांगली संपत्ती [वेल्थ] निर्माण

करण्याचे असले पाहिजे. अचूक वेळ साधून किंवा योग्य वातावरण बघून उच्च दर्जाच्या कंपन्यांच्या

शेअर्सची खरेदी-विक्री योग्य किमतीत करण्याचे कौशल्य आणि अनुभव असणे आवश्यक असते.

पोर्टफोलिओ मॅनेजमेंट मध्ये कधीच‘इन्स्टंट’परिणाम आढळत नसतात. इथे ‘झट मंगनी पट

ब्याह’प्रकार नसल्याने उतविळपणे त्या व्यवस्थापकाच्या मागे लागून अधिक उत्पन्न दर मिळणार

नसतो. केवळ शेअर बाजार निर्देशांकावर आधारित घटकांवर अवलंबून न राहता दीर्घ मुदतीत चांगला

लाभ देण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांवर लक्ष केन्द्रित करणे हिताचे ठरते. पोर्टफोलियो मॅनेजर

गुंतवणूकदाराच्या गरजा-उद्दिष्टे आणि विद्यमान आर्थिक क्षमता लक्षात घेऊन पोर्टफोलियोची रचना

करण्यात काही अवधि जात असतो. निधी कोटी रुपयांत असेल किंवा आधी असलेला पोर्टफोलिओ

अतिरिक्त निधीसह व्यवस्थापनासाठी दिला तर धोरणात्मक मालमत्ता विभागणी [Strategic Asset

Allocation] करण्यासाठी हा अवधि काही महिन्यांपर्यंत जातो. अन्यथा किमान दहा दिवसांपासून ते

महिनाभरात हा पोर्टफोलियो तयार केला जातो.

एकदा शेअर्स म्हणजेच इक्विटी पोर्टफोलियोच्या जोखीमेचे परिमाण [हे परिमाण ‘बिटा’मध्ये मोजतात]

निश्चित केले की त्या परिमाणानुसार शेअर्सची निवड केली जाते. त्याचबरोबर योग्य वेळ साधून

शेअरबाजारातील अल्प मुदतीतील प्रवाह अभ्यासून जोखीमेच्या परिमाणातील बदल नियोजित केले

जातात. अर्थात अशा प्रकारचे मोठे बदल करताना वित्तीय संस्था त्या गुंतवणूकदारांना विश्वासात

घेतात. दीर्घ मुदतीत स्थिर, चांगले आणि कमी जोखीमयुक्त उत्पन्न प्राप्त करण्याचे आणि किंवा

संपत्ती निर्माण करण्यासाठी इथे खूपच सावधपणे आणि संयमाने निर्णय घेतले जात असतात. “धिरे

धिरे रे मना, धिरे साब कछू होय1 माळी सिंचे सौ घडा, ऋतु आए फळ होय1” संत कबीरानी

सांगितल्या प्रमाणे माळ्याने रोज शंभर घडे पाणी दिले तरी ज्या ऋतुत फळे यायची त्याच वेळी

येणार म्हणून हे मना तू धीर धर॰ हाच संदेश पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सुरू करताना गुंतवणूकदारांनी

कायम लक्षात घ्यावा.

              विनायक कुलकर्णी, “गोष्टी पैशांच्या ” लेखक