बौद्धिक अक्षम मुलांना सर्वागाने सक्षम बनवण्याचा वसा कोल्हापुरातील ‘चेतना अपंगमती विकास संस्थे’ने हाती घेतला आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेने या मुलांना मायेची ऊब दिली, नवी भरारी घेण्यासाठी सक्षम बनवले. बौद्धिक अक्षम बालकांना शिक्षण-प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यात या संस्थेची कामगिरी मोठीच. समाजात अशा प्रकारच्या बालकांबद्दल गैरसमज आणि पालकांमध्ये न्यूनगंड अधिक. मात्र, या मुलांना शिक्षण-प्रशिक्षणातून सक्षम करतानाच पालक आणि नागरिकांचे संस्थेद्वारे प्रबोधनही करण्यात येते. पालक-शिक्षक संघ हा घटक संस्थेत कार्यरत आहे. या माध्यमातून मुले आणि पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘गतिमंदत्व : गैरसमज व वास्तव’ हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून व्याख्याने, शिबिरे, चर्चासत्रे, परिसंवाद असे विविध उपक्रम संस्था राबवते. अशा मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, याचेही मार्गदर्शन संस्थेकडून केले जाते. मात्र, संस्था अद्याप कायमस्वरूपी जागेच्या शोधात असून, संस्थेचा गाडा इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी दानशूरांची गरज आहे.

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    Shenda Park, Kolhapur – 416012.

  • दूरध्वनी

    : 0231-2690307.

    : 09822682028.