चटण्या/कोशिंबीरी

पंचामृत

साहित्य:-

चिंचेचा कोळ 2 वाटया
गूळ 1 वाटी
मोहरी 1 चमचा
हिंग अर्धा चमचा
दाण्याचा कुट पाव वाटी
खोब-याचे तुकडे पाव वाटी
तीळ 2 चमचे
शेंगदाणे 4 चमचे
कढीपत्ता –
मीठ चवीनुसार
मिरच्यांचे तुकडे 2 चमचे
तिखट 1 चमचा
हळद अर्धा चमचा
धणे-जीरे पावडर 1-1 चमचा
शेंगदाणे तेल 3 चमचे
मेथीदाणे अर्धा चमचा
गरम मसाला 1 चमचा

कृती:-

तेल तापल्यावर त्यात मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे, हिंग, मेथीदाणे परतून नंतर शेंगदाणे, खोबÚयाचे तुकडे इत्यादी घालून परतावे. नंतर चिंचेचा कोळ आणि हळद, तिखट, धणे-जीरे पावडर, गरम मसाला, गूळ घालून चांगले उकळवावे. घट्ट झाल्यावर उर्वरीत बाकी जिन्नस घालून थंड करावे.

कारळाची चटणी

साहित्य:-

कारळे 1 वाटी
शेंगदाणे अर्धी वाटी
तिखट दीड चमचा
मीठ पाव चमचा
लसूण पाकळया 10-12

कृती:-

लसूण सोलून घ्या. कारळे स्वच्छ धुवून तांबूस रंगावर भाजून घ्यावे. नंतर लसूण बारीक करुन घ्या. त्यानंतर शेंगदाणे, कारळे, बारीक चिरलेला लसूण, तिखट, मीठ घालून बारीक वाटावे. शेंगदाण्याऐवजी तुम्ही तीळ किंवा खोबÚयाच सुद्धा वापर करु शकता.

तिळाची चटणी

साहित्य:-

तीळ 1 वाटी
आमचूर, तिखट, मीठ, साखर चवीनुसार
जीरे 2 चमचे

कृती:-

तीळ भाजून त्यात सर्व जिन्नस घालावे व मिक्सरमध्ये बारीक करा.

नारळाची चटणी

साहित्य –

ओला नारळ 1 नग
हिरव्या मिरच्या 2-3
कोथिंबीर 1 वाटी
लसूण पाकळया 7-8
मीठ चवीनुसार

कृती –

सर्व प्रथम नारळाचा चव काढून घ्यावा. तव्यावर थोडे तेल घालून त्यात मिरच्या टाकाव्या. गॅस मंद ठेवून झाकण ठेवावे. मिरव्या थोडया भाजून झाल्यावर नारळाचा चव, मिरच्या, कोथिंबीर, लसूण व मीठ सर्व एकत्र करुन वाटावे. खलबत्त्यात बारीक केले तर चांगले.

लाल ठेचा

साहित्य:-

लाल मिरच्या 1 वाटी
लसूण पाव वाटी
लिंबाचा रस 1 चमचा
मीठ अर्धा चमचा
शेंगदाणे तेल 2 चमचे
भाजलेले जीरे 1 चमचा

कृती 1:-

सर्व जिन्नस एकत्र करुन ठेचून घ्या.

कृती 2:

– सर्व जिन्नस थोडया तेलात परतून कुटून घ्या.

कृती 3:-

यामध्ये सुकी लाल मिरची वापरतात, लाल मिरचीचे देठ तोडून पाण्यात उकळून ही मिरची लसूण, भाजलेले जीरे, मीठ याबरोबर कुटतात.

हिरव्या मिरचीचा ठेचा

साहित्य:-

हिरव्या मिरच्याचे तुकडे 1 वाटी
कोथिंबीर 1 वाटी
सोललेला लसूण पाव वाटी
दाणे भाजून सोललेले अर्धी वाटी
मीठ, तेल चवीनुसार

कृती 1:-

थोडया तेलावर मिरच्या व कोथिंबीर परतून घ्यावी. त्यात लसूण, शेंगदाणे व मीठ घालून हे मिश्रण जाडसर वाटावं. नंतर यात तेल गरम करुन घालावं की झणझणीत ठेचा तयार. (हा ठेचा भाकरीबरोबर खातात. ज्यांना तूप तिखट खायला आवडतं. ते दाणे न घालताच हा ठेेचा करतात. कच्चं तेल घालूनही हा खाल्ला जातो.)

टोमॅटो कोशिंबीर

साहित्य:-

टोमॅटो 7-8
घोटलेले दही 2 वाटया
कांदा 1 वाटी
दाण्याचा कुट अर्धी वाटी
मीठ, साखर चवीनुसार
हिरवी मिरची 4-5
कोथिंबीर 4 चमचे

कृती:-

टोमॅटो चिरुन घ्या. दही फेटून त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, हिरवी मिरची व टोमॅटो, कांदा घाला. सर्वात शेवटी दाण्याचे कुट घाला. वरुन वाटल्यास हिंग, जीÚयाची फोडणी दया.