आजच जग हे स्पर्धेच आहे. इथे प्रत्येकजण जणूकाही कशा ना कशाशी सतत स्पर्धा करत असतो. कंपनीच्या भाषेत बघितलं तर बाजारात प्रतिस्पर्धेच्या अस्तित्वामुळे त्यांना एक गुणात्मक आव्हान असतं अधिकाधिक चांगलं, काही वेगळं करत राहण्यासाठी एक आंतरिक दबाव असतो आणि स्पर्धेत अग्रेसर रहाण्यासाठी सतत, आपण पूर्वी साध्य केलेल्या गोष्टींच्या ही पलिकडे जाऊन काही साध्य करण्याचीर् ईष्या निर्माण होते- एकंदरीतच स्पर्धा असल्याने त्यांना आपला दर्जा तुलनात्मकदृष्टया मापण्यासाठी एक मापदंड मिळतो.

जे कंपन्यासाठी लागू आहे ते बऱ्याच अंशी वैयक्तिक पातळीवरही खरं आहे आयुष्य ही एक अखंड स्पर्धा आहे जिथे हर एक जण प्रत्येक क्षणी कुणा न कुणाच्या ‘पुढे’ जाण्याचा प्रयत्न करत असतो- जणू काही ही शर्यत नसून एक युध्दप्रकार आहे! ती भावना म्हणजे स्पर्धाचेतनेचा दृष्परिणाम आहे, ज्या अतंर्गत पुढे जाण्यासाठी काहीही केलं तरी कुणाला त्याचं फारस वावड वाटत नाही, मग ती नोकरीची स्पर्धा असो वा वर्दळीच्या रस्त्यावरली अहनिहकेची वाहन स्पर्धा असो.
हा जो ‘काहीही’ केलं तरी चालेल जा जो नकारात्मक भाग आहे त्याने आपल्या बुध्दीचा शक्तीचा ऱ्हास तर होतोच पण त्यात मुख्यत्वे आपल्या नीती मत्तेचा बळी जातो.. मग आपला स्पर्धक केलळ स्पर्धक नसून आपला शत्रू आहे. त्याला ‘संपवलं’ पाहिजे अशी शभद्र भावना मूळ धरू लागते. हे स्पर्धेचे खरे मूलस्वरूप नाही. नसावा!

जर स्पर्धेचे चांगले परिणाम, स्पर्धाचेतनेचे दुश्परिणाम टाळून आपापल्याला मिळआले तर जग खूप प्रगतीशील होईल असं नाही का वाटत?

स्पर्धेच्या भावनेतून आपली उत्तरोत्तर प्रगती कशी होईल स्पर्धाकांना आपला शत्रू न मानता, हे मी आता आपल्याला विषद करणार आहे. जसं एक संस्कृत सुभाषित आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हीच तुमचा सर्वोत्तम मित्र आहात, तथा तुम्हीच स्वत:चा सर्वात वाईट शत्रू आहात. याचाच अर्थ असा की तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठं स्पर्धात्मक आव्हान किंवा सर्वात कठीण स्पर्धात्मक धोका स्वत:कडूनच (आंतरिक) आहे.

हे तर तुम्हाला माहीतच असेल की तुमच्या स्पर्धकाला (शत्रू म्हणा पाहिजे तर) तुम्ही जेवढया जवळून ओळखाल जेवढी जास्त त्याची माहिती तुम्हाला असेल तेवढी तुमची प्रतिकारक्षमता किंवा तयारी असू शकते मग मला सांगा, एक स्पर्धक स्वत: सोडून कुणाची तुम्हाला जास्त जवळून ओळख असते?

गुणात्मक दर्जा वाढवत रहाणं हा एक कधीही न संपणारा ध्यास आहे. निर्दोष पारंगततेची (Perfection) इतिकर्तव्यता किंवा सार्थकता, ती अवस्था कधी न पोहोचण्यातच आहे जेव्हा तुम्हाला आपली सतत प्रगती करण्याची एक आंतरिक उर्मी असते, तेव्हाच तुम्ही स्वत:ला सतत त्या दिशेने ढकलत रहाता, आपला पूर्वीचा प्रत्येक पराक्रम ओलांडण्याचा ध्यास असतो तुम्हाला- हे जेव्हा होतं तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वत:शी स्पर्धा करत असता.

‘मी नेहेमी दरदिवशी आरशात पहातो, हे पहाण्यासाठी की माझ्यात कालच्यापेक्षा आज काय बदल आहे’ असं अब्राहम लिंकनने म्हटल्याचं मी एके ठिकाणी वाचल्याचं आठवतं याचाही अर्थ तोच आहे.

स्वत:मध्ये कायम सकारात्मक व प्रगतीशील बदल घडवून आणण्यासाठी सतत सतर्क व प्रयत्नशील रहाणे माझ्या स्वत:च्या अनुभवानुसारसुध्दा स्वत:चेच पूर्वीचे साध्य / पराक्रम पाठी टाकण्याच्यार् ईष्येपेक्षा अधिक चांगलं आव्हान दुसरं कुठलंही असू शकत नाही.

याउलट जर तुम्हाला अशीर् ईष्या नसेल किंवा आयुष्यात जे काही करायचं आहे ते हातून झालं आहे आता काही फारसं करण्यासारखं उरलं नाही अशा संन्यस्त विचारांनी तुम्हाला आळशी किंवा निष्क्रीय मनोवृत्तीचं बनवलं तर मग खरोखरीच तुमच्या हातून पुढे काही होण्यासारखं नाही आणि कुठलाही स्पर्धक किंवा शत्रुही तुमची यापेक्षा जास्त अवनति, उद्योगपती करु शकणार नाही. खरं म्हणजे अशा स्वविनाशी ऱ्हासासाठी तुम्हाला कुठल्याही बाह्य शत्रूची गरजच नाही.

म्हणूनच मी ‘स्वत: स्वत:शीच स्पर्धा करण्याच्या कल्पनेचा खंदा पुरस्कर्ता आहे. स्वत:शी स्पर्धा ही एक अखंड तेवणारी आंतरिक ज्योत आहे. ही एक अनंत तीव्र इच्छा आहे – जी तुम्हाला एक सबळ स्पर्धात्मक मनोभूमिका देते

तस पहायला गेलो तर बाह्य स्पर्धा ही एक फसवी संकल्पना आहे, कारण एकदा का आपण एका गोष्टीकडे आपला स्पर्धक म्हणून पहायला लागले की, आपण आपला दर्जा त्यांच्या सक्षम # अक्षमतेच्या सापेक्षतेने मोजत रहातो म्हणजेच जेव्हा स्पर्धकाचा दर्जा घसरतो तर आपलंही आव्हान तेवढं सक्षम वा दर्जेदार रहात नाही. याउलट स्वत: स्वत:च्या स्पर्धेचा निकष असणं हे निरपेक्ष (absolute) परिणाम झालं माझ्या मते ही खरीखुरी स्पर्धा झाली अशी स्पर्धा एक निकोप स्पर्धा होते, जिथे – आपल्याला स्वत:लाच शत्रू म्हणून ‘संपवण्याची’ इच्छा नसल्याने नकारात्मक वा ऱ्हासकारक शक्तीची कीड आपल्या मनाला लागत नाही.

आता लोकांशी (अकारण) स्पर्धा करण्याच्या सध्याच्या मन:स्थितीकडे एका वेगळया दृष्टीकोनातून पाहू या. आपल्यापैकी प्रत्येकजण जन्माला येतांना एक स्वत:च असे देणं घेऊन येतो – जे गुण अवगुणांचा स्वत:चं असं (त्या माणसासाठी) एकमेव गाठोडं आहे जे प्रत्येकाचं प्रत्येकासाठी वेगळं आहे. देवाने प्रत्येकाला काळजीपूर्वक वेगळ बनवलं आहे. शरीर, मन विचार करण्याची प्रक्रिया किंवा यांचं Combination! आपल्यापैकी कुणीही दुसऱ्यासारंखा तंतोतंत नाही त्यामुळे (Ideally) कांद्याबटाटयां प्रमाणे आपला बाजार भरत नाही . आपल्यापैकी प्रत्येकाकडे कुठल्याही दुसऱ्या माणसापेक्षा देण्यासाठी काहीतरी वेगळं असल्याने तत्वत: कुणाचीच कुणाशी थेट स्पर्धा नाही.

हा दृष्टीकोण मनाची कवाडं उघडून एका वेगळया जाणीवेचे किरण मनात पसरवतो, इतरांसाठी एक निकोप आदर वाटतो. मग कुणीच कुणाचा शत्रू असत नाही, नि हे जग जगण्यासाठीचं एक अधिक कारण बनतं.

माझ्यासाठी ‘स्वत:साठी स्पर्धक’ बनणं फार सुंदर व प्रगतीशील संकल्पना आहे. माझ्या स्वत:च्या अनुभवावरुन मी सांगू शकतो की जर तुम्ही स्वत:शी स्पर्धा केली तर तुमची स्पर्धेची चेतना कधी संपणारच नाही !

यतीन सामंत