।।शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।। -उपनिषद
निरोगी, स्वस्थ शरीर हेच खरे धर्म आणि पैसा मिळविण्याचे मुख्य साधन आहे. तेव्हा त्याचे नियोजन कसे असावे? हे सर्व ज्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. ते शास्त्र म्हणजे आयुर्वेदशास्त्र आणि या शास्त्राचे मुख्य दैवत म्हणून धन्वंतरींचा उल्लेख सर्वत्र मिळतो.

ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:

अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय

त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप

श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥

धन्वंतरी म्हणजे समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निघाली, त्यापैकी एक प्रमुख रत्न. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे मूळ निर्माते. देवांचे राजवैद्य! भगवान धन्वंतरी हे आरोग्याचे दैवत असून ते आयुर्वेदाचे आदिदेव मानले जातात. धन्वंतरीच्या पूजा विधीप्रसंगी सर्वांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात येते. आपल्या चार भूजांमध्ये त्यांनी दिव्य असे शंख चक्र जलौका व अमृतकलश धारण केले आहेत, जे पावित्र्याचे रोगनाशाचे आरोग्याचे व दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. धन्वंतरीच्या आयुर्वेदाचे आठ भाग पुढीलप्रमाणे आहेत
काय (शरीरविज्ञान, (२) बाल (बालवैद्यक), (३) ग्रह (भूतपिशाचादिकांपासून झालेल्या पीडांचे वैद्यक), (४) ऊर्ध्वांग (शिरोभागात व तेथील इंद्रियांत होणाऱ्या विकारांचे वैद्यक) (५) शल्य (शस्त्राघाताची चिकfत्सा) (६) द्वंष्ट्रा (विषचिकित्सा), (७) जरा (आरोग्य वाढविणारे रसायन), (८) वृष (वाजीकरण).
समदोष: समाग्नीश्च समधातु मालक्रिय:!
प्रसन्नत्भेन्द्रीय मन: स्वस्थ इत्यभिधियते!

अर्थात शरीराला धारण करणारे तीन दोष (वात, पित्त, कफ) सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) तीन मल (मूत्र, स्वेद, पुरीष) आणि अग्नि, पचनशक्ती हे १४ घटक यांची कार्य प्राकृत असणे, इंद्रिये (ज्ञानेन्द्रीये, कर्मेंद्रिये) आणि त्याचबरोबर मन, आत्मा प्रसन्न असणे हे “स्वस्थ” अर्थात निरोगी माणसाचे लक्षण आयुर्वेदाने सांगितले आहे.

“मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण” हे संतवचन प्रसिद्ध आहे. कारण सध्या प्रचंड धावपळ, ताणतणाव यामुळे मानसिक विकारांचे प्रमाण वाढत आहे. आयुर्वेदात रोग होण्याची दोन प्रमुख कारणे सांगितली आहेत.

1) रोगा सर्वे पि मन्दग्नो – भूक न लागणे, अपचन त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे घटकाचे शरीरात शोषण न होणे परिणामी अपचित घटकद्रव्ये शरीरात साठल्याने वेगवेगळ्या आजाराची निर्मिती होते.
2) रोगासर्वे पि जायन्ते वेगोदीरणधारणे :- प्राय: सर्व रोगाचे कारण हे मलमूत्र आदींचा वेग आल्यावर तो थांबवून धरणे हे आहे. शौचाला लागल्यावर किवा लघवी आल्यावर कामाच्या व्यापात ती अडवून ठेवणे हे प्राय: व्यवहारात घडते ते चुकीचे आहे. यामध्ये मल, मूत्र यासोबत शिंक, ढेकर, सर्दी, जांभई इ. चा समावेश आहे. याचे ही धारण करू नये. या दोन कारणांनी आजारावर अर्थात शरीरावर नियंत्रण राहू शकते.
आयुर्वेदात स्वास्थ्य टिकविण्यासाठी अनेक रसायन द्रव्ये सांगितली आहेत. यामध्ये आवळा, जेष्ठमध, पिंपळी, लसून, अडुळसा, गुळवेल, जिरे, धने, च्यवनप्राश इत्यादीचा वापर अवश्य करावा.

आजार टाळण्यासाठी दिनचर्या आहार-विहार, नियमितपणा फार महत्वाचा आहे.

”ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थमायुष:”

अनेक आजारांचे मूळ आपल्या सवयी मध्ये लपलेले आहे. सदोष दिनचर्या, असंतुलित व अवेळी घेतला जाणारा आहार, असमाधानी वृत्ती, सततची चिडचिड, आजारात औषधे घेण्यात हानाकानी अशा अनेक कारणांनी आपले आयुष्य बिघडत असते. म्हणून प्रथम दिनचर्या सुधरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

रात्रीची झोप किमान ७ ते ८ तास व्हायलाच पाहिजे. यासाठी रात्री लवकर बेडवर जाणे अतिशय गरजेचे आहे. केवळ लवकर झोपायला गेल्यानेच पूर्ण झोप मिळू शकते. कारण सकाळी उठून दिवसभराच्या कामाचा आराखडा आधीपासूनच तयार असतो, त्यात बदल करणे शक्य नसते,

अभ्यंग –

संपूर्ण शरीराला स्निग्ध अशा तेलाने मर्दन करणे, म्हणजे मालिश करणे. आयुर्वेदात प्रत्येकाने रोज न चुकता अभ्यंग केलेच पाहिजे, असे आवर्जून सांगितले आहे. शरीराला रोज अभ्यंग करणे शक्य नसल्यास डोके, पाय व कान यांनातरी तेल मर्दन करावे. अभ्यंगासाठी तिळतेल हे सर्व श्रेष्ठ आहे. ते नसल्यास साधे गोडतेल, खोबरेल तेल वापरावे. त्यानंतर उटण्याने स्नान करावे

आहार –

सर्व सहा रसांनीयुक्त ( मधुर, आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू) असा आहार असावा, परंतू त्यासाठी जठराग्नी चांगला प्रदिप्त असावा. म्हणजे पचन सुलभ होते.

आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र भारताने पूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. आयुवेृद हे फक्त चिकीत्सा पध्दती नसून एक जीवन पध्दती आहे..
दिनचर्या
दिन म्हणजे दिवस आणि चर्या म्हणजे आवरण.
दिवसभर किंवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करावयाचे आचरण म्हणजे दिनचर्या.

१. ब्रम्ह मुहूर्त

सूर्योदयाच्या अगोदर साधारण दीड तास अगोदर उठावे म्हणजे सूर्याच्या गतीशी एकरूप होता येते. आयुर्वेदानुसार सकाळी उठण्यासाठी एक शुभ मुहूर्त सांगितला आहे – ब्रम्ह मुहूर्त म्हणजेच ब्रम्हाची – शुद्ध चेतनेची वेळ.

सूर्योदयाच्या एक तास आधी वातावरणात एक छान ऊर्जा भरून राहिलेली असते. मग सूर्योदयाच्या अर्धा तास आधी वातावरणात आणखी एक उर्जेचा भर येतो. अशा, स्फूर्ती अशा गोष्टी या काळात उभारून येतात. ब्रह्मज्ञान (ध्यान आणि चिंतन), सर्वोच्च ज्ञान आणि चिरंतन आनंद मिळविण्यासाठी हा काळ उत्तम समजला जातो.या काळात वातावरण शुद्ध, शांत आणि मन शांत करणारे असते आणि मनही झोपे नंतर ताजे तावाने असते.

या काळात ध्यान केल्याणे मनाची स्थिती सुधारते आणि सत्व गुण वाढतो आणि रजस आणि तमस गुणांमुळे होणारी मनाची अस्वस्थता व चलबिचल आणि आळस कमी होतो.

२. श्वासाची शक्ती

कोणत्या नाकपुडीतून श्वासोच्छवास जास्त जोरात चालू आहे ते तपासा. आयुर्वेदानुसार उजवी नाकपुडी ही सूर्य नाडी (पित्त) असते आणि डावी नाकपुडी ही चंद्र नाडी (कफ) असते. मेंदूचा उजवा भाग सृजनशील क्रियांवर नियंत्रण करतो तर डावा भाग तार्किक मौखिक क्रियांवर नियंत्रण करतो. संशोधनानुसार जेव्हा डाव्या नाकपुडीने श्वास घेतला जातो तेव्हा मेंदूचा उजवा भाग प्रभावी होतो. आणि तसेच उलटही होते

३. सकारात्मक लहरी

प्राचीन परंपरेनुसार सकाळी उठून तळहातावरील रेषा बघण्याचा प्रघात ठेवा. ( लक्ष्मी, ज्ञान आणि शक्ती) त्यानंतर अंगठ्याने हाताच्या बोटांवर गोल गोल फिरवा. आधी घड्याळाच्या दिशेने आणि मग उलट्या दिशेने. दोन्ही हात एकमेकांवर चोळा. नंतर उजवे मनगट उजव्या बाजूने आणि डावे डाव्या बाजूने फिरवा. ज्या बाजूची नाडी चालू असेल त्या तळहातावर प्रथम ओठ टेकवून चुंबन घ्या आणि नंतर दुसऱ्या हातावर. (चुंबनाने ऊर्जा वाढते. तळहातावर चुंबन देण्याने तुम्ही स्वत:ला व्यक्त करण्याच्या उत्तम साधनाला उत्तम लहरी पोहोचवत आहात.) दोन्ही हात एकमेकावर चोला आणि हलकेच हात चेहऱ्यावर फिरवा आणि नंतर डोके, कांदे, दंड, पाय, यावर फिरवा. असे करण्याने तुम्ही एक कवच तयार कर्ता जे नकारात्मक शक्तींपासून तुम्हाला दिवसभर दूर ठेवेल.

४. संरक्षक मंत्र

सकाळच्या नित्यक्रमातील तील अगदी साधा आणि परिणामकारक असा मंत्र म्हणा. मंत्र म्हणून झाल्यावर रिकाम्या मानाने काही क्षण स्वस्थ बसा.

कराग्रे वसते लक्ष्मी.
(हाताच्या टोकावर लक्ष्मीचा, धनाच्या देवीचा वास आहे)
करमध्ये सरस्वती
(तळहाताच्या मध्यभागी सरस्वतीचा वास आहे. ज्ञान आणि कला यांची देवता.)
करमूले तू गोविंदम
(तळहाताच्या खालच्या भागात गोविंदाचा, कृष्णाचा वास आहे).
प्रभाते शुभ करदर्शनम्
(सकाळी तळहाताचे दर्शन घेणे शुभ आहे.)

आपल्या हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचा वास असतो, मध्ये सरस्वतीचा आणि मुळाशी गोविंदाचा वास असतो. त्यामुळे सकाळी हाताचे दर्शन घ्यावे.

५. सकारात्मक पाऊल

जमीनीवर पाय ठेवण्याआधी प्रार्थना करावी –
समुद्रवसने देवी पर्वत स्तन मंडले|
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ||

पोटाची आणि दातांची स्वच्छता करुन त्यानंतर सूर्य नमस्कार घालावे.

६. स्वच्छ व्हा

गंडूष: गंडूष म्हणजे गुळण्या करणे किंवा तोंडात धरून ठेवणे. तेल किंवा औषधी पदार्थ तोंडात धारण केले जातात. तोंडाच्या आतील भागावर याचा चांगला परिणाम होतो. ही क्रिया स्वस्थ व मुखरोग असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करावी.थंड पाण्याने हात, तोंड धुवा. पाणी हे वीज वाहक आहे आणि संवेदनशील टिश्यू ना त्रास होत नाही. हात, पाय, तोंड, चेहरा आणि डोळे गार पाण्याने धुवा. नाक, दात आणि जीभ घासा.

७. व्यायाम आणि ध्यान करा

दोन्ही नाड्या समान वाहू लागे पर्यंत नाडी शोधन प्राणायाम करा. हृदयचक्र किंवा आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा. सकाळच्या ताज्या हवेत सावकाश चालून या. अवती भोवतीच्या मनाला भावणाऱ्या साध्या सुंदर गोष्टी बघा. शक्यतो ताजी पांढरी वासाची फुले, हलक्या रंगाची फुले वगैरे बघा.

व्यायाम म्हणजे साधारणपणे काही योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम. पण चालणे, पोहणे या सारखे कोणतेही व्यायाम करू शकता. सकाळी केलेल्या व्यायामाने शरिर आणि मन मोकळे होते. जठराग्नी प्रज्वलित होतो, मेद कमी होतो, आणि एकूण हलकेपणा आनंद जाणवतो आणि शरिर प्रानाने भरून जाते. तरीही खूप दमवणार एव्यायाम करण्यापेक्षा तुमच्या क्षमतेपेक्षा अर्धा किंवा त्याहूनही कमी व्यायाम करावा. वय, आजार आणि शरीर प्रकृतिनूसार तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम किंवा योगसाधना करावी.

८. स्वत:चे लाड करा

व्यायामानंतर अर्ध्या तासानंतर व स्नानापूर्वी पर्ण अंगाला केलेली तेलाची मालिश म्हणजे अभ्यंग होय.. क्षणोक्षणी झिजणाऱ्या शरीरयंत्राला तेल दिल्याने त्या शरीरयंत्राच्या सर्व अवयवरूपी लहान मोठ्या भागाची झीज कमी होते. आयुष्यमान वाढते. अभ्यंगासाठी तीळतेल, चंदन बलालाक्षादितेल किंवा साध्या खोबरेल तेलाचाही वार करता येतो. यामुळे त्वचा सुकर राहते. नियमित अभ्यंग करणार्‍या व्यक्तीमध्ये वृध्दत्व उशीरा येते. विशेषकरून डोके, कान आणि पाय या तीन ठिकाणी मालीश करणे शरीराला लाभदायक ठरते. तळपायास अभ्यंग केल्याने डोळे सतेज राहतात.अंगाला तीळाच्या तेलाने मालिश करा. (अभ्यंग) डोके, कपाळ, कानशिले, हात आणि पाय यांना २- ३ मिनिटे मालिश करणे पुरेसे आहे.

९. योग्य प्रकारे स्नान

उदवर्तन, स्नान करण्यापूर्वी व अभ्यंगानंतर शरीराला औषधी चूर्ण स्वरूपातील उटणे चोळतात यालाच उद्वर्तन म्हणतात. उद्वर्तनामुळे त्वचेचे रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे त्वचेची कांती वाढते व अति गरम नाही आणि अति गार नाही अशा कोमट पाण्याने स्नान करा. स्नानामुळे पचनशक्ती वाढते. शरीर पुष्ट होते. थकवा नाहीसा होतो. व्यायाम आणि योगसाधना केल्यानंतर अर्ध्या तासाने स्नान करावे.साबण शक्यतो टाळावा. उटणे नसल्यास डाळीचे पीठ व त्रिफळाचूर्ण वापरावे. ज्याची कफप्रवृत्ती आहे किंवा ज्ंयाना कफाचे आजार नेहमी होतात अशांनी स्नानासाठी गरम पाणी वापरावे. पित्तप्रकृती असलेल्यांनी थंड पाणी वापरावे. सददृ, खोकला इ. कफविकार असणार्‍यांनी रोज डोक्यावरून स्नान टाळावे. सर्वांनीच डोक्यावरून गरम पाणी घेऊ नये असे आयुर्वेद सांगते, कारण त्यामुळे केस गळणे, केस लवकर पांढरे होणे या गोष्टी होण्याची शक्यता असते. त्वचेचे आजार होत नाहीत.

१०. नित्य उपासना

आपल्या इष्टदेवतेची उपासना, प्रार्थना दररोज करावी. यामुळे सत्वगुणाची वाढ होते.

११. न्याहारी

सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान करावी.

१२.  दुपारची वेळ

दुपारी १२ ते १ च्या दरम्यान जेवण करावे. पचनशक्ती यावेळी सर्वात जास्त असते. आयुर्वेदानुसार दुपारचे जेवण हे दिवसातील सर्वात जड असावे. जेवणानंतर अन्न पचनासाठी शतपावली करणे चांगले. अगदी लहानशी डुलकी काढायला हरकत नाही पण त्याहून जास्त झोप काढणे आयुर्वेदात त्याज्य आहे.

१३. तिन्हीसांजेची वेळ

हा दिवस आणि रात्रीच्या मधला संधिकाल असतो. ही संध्याकाळच्या प्रार्थनेची आणि ध्यानाची वेळ असते.

१४. रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण लवकर घ्यावे.दुपारच्या जेवणापेक्षा हलके असावे. रात्रीच्या जेवणानंतर झोपेपर्यंत तीन तास तरी अंतर असावे म्हणजे अन्न पचनाला मदत होते. जड जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. रात्रीचा दुसरा प्रहार सुरू होण्यापूर्वी रात्रीचे भोजन करावे. हे भोजन दिवसाच्या भोजनापेक्षा कमी मात्रेत व पचायला हलके असावे. रात्री तांदुळ इ. पदार्थ शिजवण्यापूर्वी तुपावर भाजून घ्यावे. रात्री दही खाऊ नये.

१५. झोपण्याची वेळ

रात्री १०.३० ही झोपण्यासाठी चांगली वेळ आहे. शरिर मन शांत करण्यासाठी झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना जरासे मालिश करावे. रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान दीड ते दोन तासांचे अंतर असले पाहीजे. 20 वर्षांपासून 60 वर्ष वयाच्या व्यक्तींमध्ये साधारणपणे 6 ते 8 तास झोप आवश्यक असते. झोपताना येाग्य तेवढी मोकळी हवा मिळेल अशी सोय करावी. आयुर्वेदानूसार दिवास्वाप म्हणजे दिवसा झोप घेणे टाळावे असे सांगितले आहे. दुपारचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपल्यास त्या जेवलेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही. त्याचप्रमाणे शरीर जड होते. निरूत्साह निर्माण होतो. कफ निर्मिती जास्त होते.
ज्या व्यक्ती अति स्थूल आहेत, चरबी वाढलेली आह, सर्दी खोकला असे कफविकार झालेले आहेत अशांनी दिवसा झोपणे टाळावे.