अंडे

संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.

अंडय़ातील प्रथिनांमध्ये ‘अमायनो अ‍ॅसिडस्’ असतात. यातील नऊ ‘इसेन्शियल’ अमायनो अ‍ॅसिडस् शरीर तयार करु शकत नाही अशी आहेत. ही अमायनो अ‍ॅसिडस् असलेल्या पदार्थामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात. प्रथिनांबरोबरच अंडय़ांमध्ये चरबी, ‘ड’, ‘बी १२’ आणि ‘अ’ जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस, सोडियम, कॅल्शियम, सेलेनियम आणि लोह ही खनिजे आहेत. अंडय़ातील ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोळे व त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयोग होतो. ‘ड’ जीवनसत्त्वामुळे हाडे व स्नायू बळकट होतात. अंडय़ातील लोह शरीरात चांगले शोषले जाते व त्यामुळे अ‍ॅनिमियासारख्या आजारांना प्रतिबंध होतो. अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२,

विशेष म्हणजे अंडय़ांमध्ये ‘कोलिन’ हा अन्नघटक देखील आहे. तो शरीरात कमी असेल तर ‘फॅटी लिव्हर’सारखे आजार होण्याची शक्यता असते. कोलिनमुळे मज्जासंस्थेचे कार्य सुधारते. गरोदरपणात कोलिन कमी पडले तर जन्मलेल्या बाळाला पुढे जाऊन ‘लर्निग डिसॅबिलिटी’ किंवा स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. एका अंडय़ाच्या पिवळ्या बलकात ११५ मिलिग्रॅम कोलिन असते.

अंडे हे ‘लो सोडियम’ व ‘हाय पोटॅशियम’ असे अन्न आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, पर्यायाने हृदयविकार टाळण्यासाठी अंडय़ाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. असे अनेक फायदे असूनही मोठी माणसे अंडी खाताना साशंक असतात. ही भीती असते ‘कोलेस्टेरॉल’ची. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. त्यासाठी अंडय़ाच्या पांढऱ्या व पिवळ्या भागांमधील फरक जाणून घेऊया.

एक अंडे साधारणपणे ५५ ग्रॅम वजनाचे असते. एका आख्ख्या अंडय़ात ७५ उष्मांक असतात. त्यात ६.२ ग्रॅम प्रथिने, ५ ग्रॅम चरबी आणि २१० मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल असते. महत्त्वाची बाब ही, की या घटकांचे प्रमाण अंडय़ाच्या दोन्ही भागांमध्ये वेगवेगळे असते.

आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

ऑक्टोबरचा दुसरा शुक्रवार हा जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या अंडय़ांचे उत्पादन वाढत असून त्या तुलनेत अंडी खाण्याचे प्रमाण फारच कमी आहेत. प्रत्येक मानवाने वर्षभरात १८० अंडी खाणे आवश्यक असताना प्रत्येक भारतीय मात्र  वर्षभरात केवळ सरासरी ३८ अंडी खातो.

१)अंड्याच्या बलकातील ‘कोलीन’ हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो
२) अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त
३)अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात.

४)अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ होते.

५)चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते.

६)अंड्यामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो. त्यामुळे ज्यांना आम्लपित्ता त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंडे खावे.