हिरा

हिरा हे पारदर्शक रत्न आहे.सर्वात कठीण रत्न आहे.हे शुक्राचे रत्न आहे.प्रेमाचे प्रतिक म्हणून हि-याकडे

पाहिले जाते.वृषभ,तुळ राशीच्या लोकांना फायदेशीर.अध्यात्मिक,धार्मिक,सामाजिक क्षेत्रात फायदेशीर

.मानसिक आजारावर उत्तमप्रकारे काम करतो. आकर्षक व्यक्तीमत्वासाठी फायदेशीर.

सिट्रीन

पुष्कराजचे उपरत्न म्हणून सिट्रीनचा

उपयोग होतो.सौख्यप्राप्ती,

अविरहित उर्जाप्राप्ती,आत्मविश्वास,आरोग्य

या सगळ्यासाठी सिट्रीनचा वापर केला जातो.

शुध्द वातावरण व प्रदुषणमुक्त हवा करण्याची

विलक्षण ताकद या खडयात आहे.आचारविचारांचे पुर्ननिर्माण,आत्मवृध्दी,पचनसंस्था,मूत्रपिंडाचे विकार,मधुमेह,अस्वस्थपणा,बध्दकोष्ठता,अंतर्गत अवयवांची शुध्दी,रक्ताभिसरण या संबंधी या रत्नाचा उपयोग होतो.

लॅपिझ लॉझुली

हे निलमचे उपरत्न आहे.मनाने दुर्बल

असणा-या व्यक्ति सक्षम व

सामर्थ्यवान बनण्यासाठी या खड्याचा

उपयोग होतो .नजरेसाठी या रत्नाचा

उपयोग करता येतो.शारिरीक व मानसिक

सामर्थ्यासाठी या रत्नाचा उपयोग होतो.हे रत्न रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी त्याने डोळे धुतल्यास डोळ्यांवर चांगला परिणाम होतो आणि दृष्टीही सुधारते.

टरक्वाईझ

या खड्याचा मुख्य गुणधर्म म्हणजे तो

कुठलेही संकट स्वतःवर घेतो.हे पाचूचे उपरत्न

आहे.एखादे मोठे संकट येणार असेल तर तो

खडा स्वतः तुटतो व धारण करणा-याला

वाचवतो.जोडी विभक्त होऊ नये,प्रेमभंग

होऊ नये यासाठी याचा प्रभावी उपयोग

करून घेता येतो.टरक्वाईझ म्हणजेच फिरोझा हे पाचूला पर्यायी रत्न आहे.यकृतासंबंधी हा खडा काम करतो.लवकर लग्न जमावे यासाठी ही टरक्वाईझ उपयोगी आहे.मैत्रीसंबंधीही या रत्नाचा विशेष उपयोग होतो.मानसिक पातळीवरचा सुसंवादासाठी व मन:शांतीसाठीही हे रत्न वापरणे फायदेशीर ठरते.

ॲमेथिस्ट

आजच्या जगात दुर्मिळ होत चाललेली

मनःशांती देणारा,स्वतःवर नियंत्रण मिळवून

देणारा असा खडा आहे.औदासिन्य,ढळलेली

मनःशांती,ताण या सगळ्यावर हा खडा

प्रभावी कार्य करतो.हा खडा ग्रीकमध्ये आढळतो.निलमला पर्यायी रत्न म्हणून हे रत्न वापरले जाते.फेब्रुवारी महिना,बुधवार व आठ वाजताची वेळ हे तिन्ही घटक या खडयाशी संबंधित आहे

२२ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर तसेच २० जानेवारी ते १८फेब्रुवारी या काळात जन्मलेल्यांसाठी हा खडा वरदान आहे.माणसाच्या हातून घडणारी वाईट कृत्ये टाळायला याचा चांगला उपयोग होतो.दारू, विसराळूपणा,समाधान,मज्जासंस्था व त्याचे विकार,रक्तातील शर्करा,मासिक पाळी संदर्भात,शांत झोप,कुटुंबातील वारंवार संघर्ष,रागीट व चटकन चिडणा-या व्यक्ति यासंबंधी हा खडा फायदेशीर आहे.हा खडा पेलाभर पाण्यात टाकून ठेवला आणि ते पाणी पिण्यासाठी वापरले तर अऱ्धशिशी,सांधेदुखी,दातदुखी यापासून आराम मिळू शकतो.

कार्नेलियन

मानसिक ,शारिरीक विकास तसेच उत्कर्षासाठी

हे रत्न विशेष उपयोगी पडते.याला पोवळ्याचे

पर्यायी रत्न समजतात.सगळ्या दुष्ट शक्ती

विचारांना हा खडा परावृत्त करू शकतो.

बुध्दीमत्ता ,विकास,आत्मविश्वास यासाठी हे

रत्न उपयोगी आहे.सिलिकॉनशी संबंधी महत्वाचे उपरत्न.याला आत्मसन्मानाचा खडा म्हटलेले आहे.जननेंद्रियाची क्षमता,वंध्यत्व,पोटाखालील भाग,नैराश्य,संधिवात,दमा,त्वचारोग रक्ताभिसरण,मुरमे,निद्रानाश,दु:ख,ताणतणाव या सगळया गोष्टींवर हा खडा काम करतो.

(इजिप्शियन तज्ञांच्या मते हा खडा मृत्यूनंतरही जिवाचे रक्षण करतो.)

मंगळाशी संबंधीत व्यक्तींनाही या रत्नाचा चांगला उपयोग होऊ शकतो.हे रत्न कन्या राशीला अतिशय शुभप्राद ठरताना दिसतो.ज्यांचा जन्म २२ऑगस्ट ते२१सप्टेंबर या काळात झाला आहे त्यांच्या दृष्टीने हा खडा उपयुक्त आहे.

रेड गार्नेट

रेड गार्नेट सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देतो.अपघात टाळण्य़ास मदत करतो. संधिवात ,रक्ताचे विकार ,पाठीचा कणा ,आतडयांचे विकार,फुप्फुसे,ह्रदयविकार,मूत्रपिंडविकार ,हार्मोन्सचे संतुलन, आत्मसंतुलन यासाठी हे रत्न वापरता येते.

सप्तचक्र

निरोगी जीवनासाठी आपली सर्व चक्रे संतुलित असणे गरजेचे असते.यासाठी रत्नशास्त्राप्रमाणे ७ रत्नांचे एकत्र पेंडंट (याला सप्तचक्र पेंडंट म्हणतात) वापरल्यास त्याचाही चांगला फायदा होतो.रोजच्या जीवनात वावरताना आपला अनेक वाईट नजरांशी व वाईट शक्तींशी संबंध येतो.त्यापासूनसुध्दा अनेक आजार होतात.म्हणून काळया टुमेलिनवरील सप्तचक्र वापरणे अधिक चांगले.