पायराईट

आर्थिक उन्नती साधण्यासाठी हा खडा वापरतात.अध्यात्मिक पातळीवर हा काम करतो.दीर्घायुष्य देण्यास मदत करतो.

भावनिक संतुलन राखण्यास मदत करतो.आरोग्य देतो.एकाग्रता करण्यास मदत करतो.

रोझ क्वार्टझ

आपल्यावर कोणी प्रेम करत नाही या गैरसमजातून आपला आत्मविश्वास कमी पडतो हा भाव असणा-यांनी हा खडा जरूर वापरावा.

नकारात्मक ऊर्जा सकारात्मक बनवण्यास हा खडा काम करतो.भावनिक पातळीवर काम करतो.

लहानपणीचे भय,न्यूनगंडता दूर करण्यास मदत करतो.प्रेमभंग झालेल्यांना मदत करतो.

 

स्मोकी क्वार्टझ

नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत करतो.उद्योगधंदयात,जिज्ञासुवृत्ती,ध्येयपूर्ती करणयास मदत करतो.

स्वप्रचिती येण्यासाठी हा खडा मदत करतो.

टायगर्स आय

जननेंद्रियासंबंधी विकारावर हे रत्न प्रभावीपणे काम करते.हितशत्रूंपासून वाचवतो.डोळयांच्या विकारावर काम करते.

मनोबल वाढवणारे,स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करतो.आर्थिक अडचणी सोडवण्याचे काम करतो.ध्येयपूर्ती करण्यास मदत करतो.

 

ब्लड स्टोन

साहसी कार्यक्षेत्र असणा-यांना हा खडा उपयुक्त आहे.बिकट परिस्थितीत तो आपल्याला शारिरीक व मानसिक सामर्थ्य देतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.रक्तशुध्दीसाठी याचा वापर करतात.

कॅल्साईट

सुरक्षेसाठी कवच म्हणून या खडयाचाखूपच चांगला वापर होऊ शकतो.घराच्या चारही कोप-यात व चारही दिशांच्या

मध्यावर हा खडा ठेवला तर संपूर्ण घराचे रक्षण हा खडा करतो.सर्व त-हेची अरिष्टे टाळण्याचे सामर्थ्य या खडयात आहे.

दुस-याला त्रास न देता स्वतःवरचे अरिष्ट गायब करणारा हा खडा आहे.

-होडोक्रोसाईट

हा खडा उशीखाली ठेवल्यास स्वप्नांची उजळणी आपल्याला करता येते.स्मरणशक्ती वाढते.अंतर्मन व बाहयमन

यांच्यामधील सुसंवाद साधण्याकरता याचा उपयोग होतो.भूतकाळातील वाईट गोष्टी विस्मृतीत टाकून नवी उमेद

निर्माण करणारा हा खडा आहे.

जेड

या खडयाच्या अंगी अद्भुत आकर्षणशक्ती आहे.दीर्घायुष्य लाभण्यासाठी जेड उपयोगी ठरते.चातुर्य 

व्यावहारिक शहाणपण,सहनशक्ती प्रेमाची देवाणघेवाण या सगळया गोष्टींमध्ये वृध्दी करण्याचे सामर्थ्य या खडयात आहे.

टुर्मेलिन

आपले मनस्वास्थ बाहय नकारात्मक गोष्टींमुळे हरवले असेल तर हे उपरत्न जरूर वापरावे.

नकारात्मक उर्जेचे सकारात्मक उर्जेत परावर्तन करण्याचा विलक्षण गुण या रत्नात आहे.

नजर लागणे,घात-अपघात या पासून आपला बचाव हे रत्न करते.

मूनस्टोन

भावनिक संतुलन हे या रत्नाचे मुख्य कार्य आहे.हा प्रेमभावनेशी संबंधित खडा आहे.व्दिधा

मनस्थिती असणा-यांनी मूनस्टोन धारण करणे उपयुक्त ठरू शकते.मोत्याचे उपरत्न

म्हणून मूनस्टोन वापरतात.विभक्त झालेल्या प्रेमी जीवांना हा खडा परत आणू

शकतो.ध्यानधारणेसाठीही याचा उपयोग केला जातो.स्वप्रचिती येण्यासाठी मदत करतो.आंतरिक शक्ती,आत्मविश्वास

निर्णयक्षमता यासाठी मूनस्टोनचा वापर केला जातो.

सुजिलाईट

एखादया गोष्टीच्या त्रासापासून सुटका करायला,बरे व्हायला हा खडा मदत करतो.

यातील गडद रंग हा प्रभावी मानला जातो.भावनाप्रधानता,हळवेपणा,जगाचा तिटकारा,

उदासिनता,या सगळयांसाठी हा खडा परिणामकारक ठरतो.डोकेदुखी व अर्धशिशीसाठी याचा वापर करतात.

घातक सवयींपासून सुटका करतो. लैंगिक विकारावरही काम करतो.

संदर्भ-  रत्नशोध डॉट कॉम