ग्लोबल मराठी मंडळे

जगभरात मराठीचा प्रचार – प्रसारासाठी कार्यरत मंडळे

माझ्या मराठी मातीचा,

लावा ललाटास टिळा,

हिच्या संगाने जागल्या,

दऱ्या खोऱ्यातील शिळा

शिक्षणा साठी किंवा नोकरी, धंद्या निमित्ताने मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि साहित्य यांबद्दल प्रत्येकाला जाज्वल्य अभिमान आणि उत्कट प्रेम असतं. याचं कारण म्हणजे त्याची मराठी मातीशी जुळलेली नाळ. अश्याच महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नातं सांगणा-या सा-यांसाठी एकत्र येण्याचं, उत्सव साजरे करण्याचं आणि नाती दृढ करण्यासाठीची ही जागतिक केंद्रच. सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, आधुनिक अशा बलशाली महाराष्ट्राच्या ह्या प्रागतिक शाखाच आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही !