गोडाचे प्रकार

सत्यनारायणाचा शिरा

साहित्य –

रवा सव्वा वाटी
साखर सव्वा वाटी
तूप सव्वा वाटी
दूध सव्वा वाटी
केळी 1 नग
तुळशीची पाने –
वेलची पूड 1 चमचा
काजू-किसमीस 3 चमचे

कृती –

प्रथम रवा थोडा कोरडा भाजून नंतर त्यात तूप घाला. खमंग भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ, वेलची पावडर, काजू-किसमीस व दूध एकत्र करुन घाला. थोडे गरम पाणी सुद्धा घाला. नंतर लगेच साखर घालून एक वाफ येवू दया. भांडयात काढून त्यावर केळयाचे काप, तुळशीचे पान घालून नैवेद्य दाखवा.

घावन-घाटलं

साहित्य:-

तांदूळ 1 वाटी
दूध 2 वाटया
रवा अर्धी वाटी
तूप –
साखर अर्धी वाटी
वेलची पावडर 1 चमचा
केशर –

कृती:-

तांदूळ 2 तास भिजवून वाटून घ्यावे. त्यानंतर त्याचे छोटे-छोटे दोसे करावेत. रवा तूपावर भाजून त्यात दूध व थोडेसे पाणी घालून शिजवावे. चवीनुसार साख, वेलची पावडर, केशर घालून घावना बरोबर सव्र्ह करा.

श्रीखंड

साहित्य –

दह्याचा चक्का 250 ग्राम
पिठी साखर 250 ग्राम
चारोळी 1 चमचा
पिस्ते 1 चमचा
बदाम काप 2 चमचे
वेलची पूड अर्धा चमचा

कृती –

चक्का एका बाउलमध्ये घ्यावा. त्यात साखर घालावी आणि चांगले मिक्स करावे. बारीक जाळीची चाळणी किंवा गाळणे घेऊन त्यात चक्क्याचे मिश्रण घालून चमच्याने दाब देऊन चाळणीतून गाळून काढावे, म्हणजे रवाळपणा निघून जाईल, तसेच साखर आणि चक्का चांगला मिक्स होईल. गाळलेल्या तयार श्रीखंडात वेलचीपूड, चारोळ्या, पिस्ता, आणि बदाम घालून व्यवस्थित मिक्स करावे.
टीप – जर पुरण यंत्र वापरणार असाल तर चक्का आणि साखरेचे मिश्रण पुरणयंत्रातून फिरवावे. नंतर चाळणीतून गाळून घ्या.

आम्रखंड

साहित्य –

श्रीखंड 2 वाटया
आंब्याचा पल्प 1 वाटी
क्रीम 1 वाटी

कृती –

सर्व साहित्य एकत्र करुन थंड करा.

 गुळाची जिलेबी

साहित्य:-

मैदा 1 वाटी
बेसन 2 चमचे
आरारोट 2 चमचे
दही 2 चमचे
वनस्पती तूप तळायला
1 तरी गुळाचा पाक 1 वाटी

कृती:-

जिलेबी तयार करण्याच्या 1 दिवसाअगोदर दही, आरारोट, मैदा, बेसन, कोमटसर पाण्यात घट्ट भिजवून ठेवणे. दुसÚया दिवशी जेव्हा आपल्याला जिलेबी करायची आहे, त्या अगोदर सर्व प्रथम एक तारी गुळाचा पाक तयार करुन घेणे. नतंर आदल्या दिवशी भिजवून ठेवलेले मिश्रण जिलेबी छिद्र असलेल्या कापडयात घेऊन त्याच्या जिलेबी काढून घेणे व लगेचच गुळाच्या पाकात बुडवून खायला देणे.

शेवई खीर

साहित्य –

शेवया 1 वाटी
दूध दीड लिटर
तूप 2 चमचे
ड्रायफ्रुट पाव वाटी
केशर अर्धा चमचा
वेलची पूड 1 चमचा

कृती –

प्रथम दूध गरम करुन त्यास अर्धे आटवून घ्या. नंतर शेवया तूपावर भाजून नंतर पाण्यात शिजवून पाणी काढून टाका शिजलेल्या शेवया आटवलेल्या दूधात घालून त्यात केशर, वेलची पूड, ड्रायफ्रुट घालून उकळवा. घट्टसर झाल्यानंतर सव्र्ह करा.

रव्याची खीर

साहित्य –

रवा 1 वाटी
दूध 1 लिटर
साखर पाऊण वाटी
पाणी 1 वाटी
वेलची पूड 1 चमचा
जायफळ पूड अर्धा चमचा
चारोळी 4 चमचे
तूप 4 चमचे
मीठ चिमूटभर

कृती –

सर्व प्रथम रवा तूपावर तांबूस रंगावर भाजून घ्या. नंतर यामध्ये 1 लिटर दूध व एक वाटी पाणी घालून चांगले घट्ट होईस्तोवर उकळून घ्या. नंतर यात साखर वेलची पावडर, जायफळ, चारोळी, चिमूटभर मीठ घालून चांगली उकळून खायला दया.

पुरण पोळी

साहित्य:-

हरभरा डाळ 3 वाटया
गूळ 2 वाटया
साखर 1 वाटी
जायफळ पावडर अर्धा चमचा
वेलची पावडर अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
कणीक 1 वाटी
मैदा 1 वाटी
साजूक तूप पाव वाटी
तेल 2 चमचे

कृती:-

सर्व प्रथम एका भांडयात 4-5 वाटया पाणी घालून हरभरा डाळ शिजवून घ्या. डाळ शिजत आल्यावर त्यात गूळ व साखर घालावा. गूळ आणि साखर मिसळल्यावर डाळ चांगली शिजली की ती गॅसवरुन खाली उतरुन घ्या. नंतर पुरण्याच्या साच्यातून तिला बारीक करुन घ्या. त्यात थोडे जायफळ पावडर व वलेची पुड सुद्धा घाला
कणीक, मैदा, थोडं मीठ मिसळून 2 चमचे तेल मिसळून चांगले भिजवून मळून घ्यावे. त्यानंतर एका गोळयाची पोळी लाटून त्यावर तयार केलेले पुरण पसरवा चारही बाजूंनी पोळी गुंडाळून बंद करा व थोडी लाटून घ्या. तव्यावर तूपाच्या साहाय्याने खरपूस भाजून साजूक तूपाबरोबर सव्र्ह करा.

खवा पोळी

खव्याची पोळी ही एक दिवस आधी बनवून थंड सुद्धा खातात यालाच साटोरी असे सुद्धा म्हणतात.

साहित्य –

खवा 1 वाटी
बेसन पाव वाटी
पीठी साखर 1 वाटी
वेलची पूड 1 चमचा
मैदा 1 वाटी
कणीक 1 वाटी
मीठ पाव चमचा
तेल 4 चमचे

कृती –

सर्व प्रथम कणीक, मैदा, तेल, मीठ एकत्र करुन छान मळून ठेवा. खवा खमंग भाजून घ्या. थंड करुन त्यामध्ये भाजलेले बेसन, पीठी साखर, वेलची पूड घालून एकत्र करा. नंतर भिजलेल्या कणकीच्या गोळयात पुरणाप्रमाणे भरुन पातळ पोळी लाटा व चांगले शेकून खायला दया.

उकडीचे मोदक

साहित्य:-

तांदूळाची बारीक पिठी 1 वाटी
ओलं खोबरं 1 वाटी
गूळ अर्धी वाटी
वेलची पूड 1 चमचा
मीठ चिमुटभर
तूप पाव वाटी
तेल 1 चमचा

कृती:-

एक वाटी पाणी गरम करुन चांगले उकळल्यावर त्यात चिमुटभर मीठ व एक चमचा तेल घालावे. त्यानंतर गॅस बंद करुन एक वाटी तांदूळाची पिठी घालावी व वाफ येऊ दयावी. दुसÚया भांडयात गुळाचा पाक करुन त्यात ओलं खोबरं व वेलची पूड घालावी. थोडंस परतून गॅस बंद करावा. तांदूळाची पिठी चांगली मळून त्याची हातावर छोटी लाटी घेऊन गोल पसरवावी. त्याला प्रथम बोटाने कळया पाडून मधे तयार खोबÚयाचे सारण भरावे. नंतर मोदक तयार करुन वाफवून घ्यावा. साजूक तूपाबरोबर खायला दयावा.

शंकरपाळे

साहित्य –

मैदा 2 वाटया
पिठी साखर दीड वाटी
दूध 4 चमचे
बेकिंग पावडर अर्धा चमचा
मीठ पाव चमचा
तूप 2 चमचे

कृती –

सर्व साहित्य एकत्र करुन दूधाच्या साहाय्याने घट्ट भिजवून घ्या. नंतर या मिश्रणाची लांब पोळी लाटून त्याचे छोटे-छोटे चैकोनी तुकडे पाडून तेलात तळून घ्या.