हिंगोली जिल्हा पर्यटन स्थळे

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये शीख धर्मियांच्या पाच प्रमुख धर्मस्थानांपैकी एक महत्त्वाचे स्थान असलेले नांदेड आणि औंढा नागनाथ या सारखी धार्मिक स्थळे असणारा हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती ज्णून घेऊया.

औंढा नागनाथ

औंढा नागनाथ

बारा ज्योतिर्लिंग हे भारतातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील पाच महाराष्ट्रात आहेत. शतकानुशतके या ठिकाणी शिवांची पूजा केली जाते. औंढा नागनाथ…

संत नामदेव संस्थान

संत नामदेव संस्थान

जिल्ह्यातील नरसी गावात संत श्री. नामदेव यांचा जन्मस्थळ आहे. संत 1270 मध्ये जन्म झाला आणि त्याचे संपूर्ण नाव नामदेव दामाजी…

दिगंबर जैनची मूर्ती

मल्लिनाथ दिगंबर जैन

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरद शहापूर गावात जैन समाजातील सर्वात ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे. 300 वर्षे जुने असलेले लॉर्ड मल्लिनाथ यांचे…

नांदेड

नांदेड हे शीख धर्मियांच्या पाच प्रमुख धर्मस्थानांपैकी एक महत्त्वाचे स्थान आहे. येथेच गुरु गोविंद सिंह यांनी आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे घालविली. येथील सच खंड श्रीहुजूर साहिब गुरुद्वारा तसेच अनेक हिंदू मंदिरेही येथे प्रसिद्ध आहेत.

माहूर

माहूर हे तीर्थस्थान श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान आहे असे मानले जाते. रामगड किल्ला तसेच अनेक लहान मोठी मंदिरे या परिसरात आहेत. साडेतील शक्तीपिठांपैकी एक असलेली माहूरची रेणुकादेवी हे ही पर्यटकांचे आकर्षण आहे. येथून जवळच माहूरगड किल्ला आहे.

पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा आणि अभयारण्य

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे. याच भागात किनवट अभयारण्य आहे. येथे वाघ, चित्ते इ. प्राणी तसेच काही रंगीबेरंगी पक्षी आढळतात. (या अभयारण्यात यवतमाळ जिल्ह्याचाही काही भाग समाविष्ट आहे.)

शीख पंथाचे दहावे (शेवटचे) गुरू गोविंदसिंहजी यांची समाधी

नांदेडची भूमी पावन झाली ती शीख पंथाचे दहावे (शेवटचे) गुरू गोविंदसिंहजी यांच्या येथील वास्तव्याने ! शिखांच्या पाच तख्तापैकी एक नांदेड हे गणले जाते. गुरू गोविंदसिंहाच्या ७ ऑक्टोबर, १७०८ रोजी झालेल्या निर्वाणानंतर, गोदावरी काठी १८३२-१८३७ या दरम्यान त्यांची समाधी बांधण्यात आली. हे स्थळ ‘तख्त सचखंद श्री हुजूर अबचलनगर साहिब’ या नावाने प्रचलित आहे. दुमजली अशा ह्या समाधी स्थानाचे बांधकाम, अमृतसरच्या सुवर्ण मंदिराशी साधर्म्य असणारे आहे.

विष्णुपूरी धरण

विष्णुपूरी हे धरण गोदावरी नदीवर बांधलेले आहे. हे धरण म्हणजे आशियातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. हा प्रकल्प नांदेड शहरापासून ८ कि.मी. अंतरावर असार्जन गावाच्या जवळ आहे. हे धरण बांधण्याचे श्रेय माजी मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांना जाते. त्यांची आठवण म्हणून महाराष्ट्र शासनाने या जलाशयाला शंकर सागर जलाशय असे नाव दिले आहे.

कंधार किल्ला

कंधार हे तेथील किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेले लहानसे शहर आहे. कंधार किल्ला हा शहराच्या मध्यभागी वसलेला आहे. हा किल्ला चारही बाजुंनी पाण्याने वेढलेला आहे.

घोड्यांचा बाजार (मालेगाव)

येथील लोहा तालुक्यातील खंडोबाची यात्रा प्रसिद्ध असून येथील घोड्यांचा बाजारही प्रसिद्ध आहे.

नृसिंहाचे मंदिर

नरसी येथील नृसिंहाचे मंदिर प्रसिद्ध आहे. जवळच बामणी येथील अन्नपूर्णा व सरस्वती देवीची मंदिरे प्रेक्षणीय आहेत. नरसी हेच संत नामदेवांचे जन्मगाव असल्याचे मानले जाते.

तुळजादेवीचे मंदिर

जिल्ह्यातील तुळजादेवीचे (तुळजाभवानी) मंदिर हे १२५ वर्षांपूर्वीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर स्वामी केशवराज यांनी बांधले आहे.

Hingoli district

Hingoli district

Hingoli district
औंढा नागनाथ