जाखडी नृत्य

कोकणात गौरी – गणपती हा आपला महत्त्वाचा सण मानला जातो आणि त्या दिवसांत मनोरंजनासाठी ‘जाखडी ’ हा लोकनृत्याच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केल्या जाते.

गणेशोत्सव म्हटलं की समोर येतो तो बाल्या डान्स. कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं. कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषता: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला मिळतं. गणेशोत्सवात कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाख

डीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात. कोकणच्या जाखडी नृत्याला एक वैशिष्टपूर्ण असा ठेका आहे. जाखडीला साथ देणारे, गण गवळण गाणारे मध्यभागी एकत्र बसतात आणि वैशिष्टपूर्ण रंगीबेरंगी कपडे घालत जाखडी नृत करणारे त्यांच्या भोवती फेर धरून नाचतात.

दोन गायक , ढोलकी/ मृदुंग वादक ,झांजरी वादक , शैली वादक ,कोरस मधोमध बसतात .बाकी आठ /दहा जण त्यांच्या सभोवती गोलाकार फेर धरत ,पायांची विशिष्ट हालचाल करत नाचतात . नृत्य करण्यानाऱ्यांना बाल्या असे म्हंटले जाते . बाल्या पायात घुंगरू घालून नाचतात . ढोलकीवर थाप पडताच नृत्याच्या पहिल्या कलावंताची एंट्री होते. दोन वाट्यांवर पाय ठेवून आणि डोक्यावर पेटता दिवा ठेवत हा कलावंत सलामी देतो. याच जाखडीच्या ठेक्यावर हे जाखडी कलावंत आकर्षक मानवी मनोऱ्याच्या सहाय्यानं विविध पक्षी-प्राण्यांचे आकार घेत आपला कलाविष्कार सादर करतात.

यानंतर सुरू होते ती गण आणि गवळण… पायाच्या आणि हाताच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली आणि एकमेकांमधील ताळमेळ जाखडीला अधिक आकर्षक बनवतात.