म्हाद्या

साहित्य –

दाण्याचा कुट 2 वाटया
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
आमचूर पावडर 1 चमचा
मीठ, साखर, हळद चवीनुसार
तिखट चवीनुसार
मोहरी 1 चमचा
हिंग पाव चमचा
धने-जीरे पावडर 1 चमचा
हिरवी मिरची 4-5
कांदे अर्धी वाटी

कृती –

कढईत तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात आलं, लसूण आणि कांदे घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर, जीरा पावडर, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ, साखर घालून थोडया वेळ परतावे. शेवटी शेंगदाण्याचे कुट घालावे व वरुन थोडे पाणी घालून वाफेवर शिजवावे. वरुन सजावटीकरीता कोथिंबीर घालावी.

 सोलापुरी शेंगा भाजी

साहित्य:-

भाजून कुटलेले दाणे 2 वाटया
बारीक चिरलेला कांदा 1 वाटी
आलं-लसूण पेस्ट 4 चमचे
कश्मिरी चपटा मिरची 1 वाटी
बेडगी मिरची अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
चक्रीफुल 2
दालचिनी अर्धा इंच
वेलची 4-5
लवंग 4-5
जायपत्री अर्धा चमचा
शहाजिरे अर्धा चमचा
हिंग पाव चमचा
मेथीदाणा 1 चमचा

कृती:-

चपटा मिरची, बेडगी मिरची एकत्र करुन देठ काढून स्वच्छ धुऊन मिक्सरवर बारीक करा. सर्व मसाले त्यात घालून चांगले वाटून घ्या. याला रंजका असे म्हणतात. पातेल्यात तेल घेऊन सर्व प्रथम शहाजिरे, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परता. नंतर दाण्याचे कुट व रंजका घालून तेल सुटेस्तोवर परता. थोडे गरम पाणी सुद्धा घाला. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून कडक भाकरी बरोबर सर्व करा.

बाजार आमटी

साहित्य:-

मसुर आणि तुरीच्या डाळीचे वरण 1 वाटी
बारीक चिरलेल्या पालेभाज्या 4 वाटया
(उपलब्ध असतील त्या)
अख्खा ठेचलेला लसूण 8-10 पाकळया
ठेचलेली हिरवी मिरची चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर 4 चमचे
ठेचलेलं आलं 2 चमचे
हळद पाव चमचा
मीठ चवीनुसार
दुध 1 वाटी
दुधाची साय पाव वाटी

कृती:-

फ्रायपॅनमधे तेल घेवून मोहरी तडतडल्यावर यात लसूण, आलं, हिरवी मिरची घालून चांगले परतावे. यानंतर पालेभाज्या घालून त्याही परताव्यात. त्यातले पाणी सुकल्यावर त्यात शिजलेली डाळ घालावी नंतर त्यात दुध, चवीनुसार मीठ, साखर घालून एक उकळी येवू द्यावी. वरुन दुधाची साय घालून सव्र्ह करा.
टीप:- हा भाजीचा प्रकार पोळी, भात, भाकर याबरोबर चांगला लागतो.

फणसाची भाजी

साहित्य –

फणसाची तुकडे 2 वाटया
बेसन 1 वाटी
आरारोट पाव वाटी
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
लिंबाचा रस 1 चमचा
हळद पाव चमचा
तिखट चवीनुसार
धणे-जीरे पावडर 1 चमचा
मीठ चवीनुसार
खसखस पाव वाटी
खोबरं पाव वाटी
बारीक चिरलेला कांदा 1 नग
लसूण पाकळया 10-12
आल्याचा तुकडा 1 इंच
हिरवी मिरची 4-5
कोथिंबीर 4 चमचे
तमालपत्र 2-3

कृती –

बेसन, आरारोट व मीठ एकत्र चाळून घ्या. फणसाच्या तुकडयांना आलं-लसूण पेस्ट, लिंबू, हळद, तिखट, मीठ चोळून ठेवा. हे तुकडे बेसनाच्या मिश्रणात बुडवून डीप फ्राय करा. एका पॅनमध्ये थोडे घेवून त्यामध्ये खसखस, कांदा, खोबरं, आलं-लसूण थोडे तेल घालून परतून घ्या. नंतर हे मिश्रण मिक्सरवर बारीक करुन घ्या. दुसरे पॅन घेवून त्यात तेल गरम करुन तमालपत्र व वाटलेला मसाला घालून परतून घ्या. चवीनुसार मीठ व पाणी घालून वरुन कोथिंबीर घाला सव्र्ह करतेवेळी दोन-तीन एकत्रीत ठेवून त्यावर ग्रेव्ही घालून सव्र्ह करा.

अनारसा

साहित्य:-

तांदूळ 1 वाटी
पिठी साखर 1 वाटी
खसखस पाव वाटी
तूप तळायला

कृती:-

तांदूळ चांगल्या प्रकारे साफ करुन 3 दिवस पाण्यात भिजवून ठेवावे. पण पाणी दररोज बदलत राहावे. चैथ्या दिवशी तांदूळ चाळणीत टाकून पाणी निथळू 2-3 तास कपडयावर पसरुन वाळवून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घेणे. मिक्सरमध्ये बारीक केलेल्या तांदळाच्या पाठात पिठी साखर व 1 चमचा तूप गरम करुन टाकावे व त्याचे मोठे मोठे गोळे करुन ठेवणे. 2-3 दिवसांनी एक गोळा घेऊन त्याला फोडणे. गोळा जास्ती कडक असल्यास 1 चमचा दूध घालून हाताने मळून घ्यावे. नंतर 1 ताटावर थोडीशी खसखस घेऊन त्यावर वरील तयार केलेल्या पिठीचा अनारसा हातानेच थापून घेणे. (पुÚयांचा आकाराऐवढा). नंतर कढईत तेल गरम करुन त्यात तयार केलेला अनारसा तांबूस होईस्तोवर तळून घेणे. व थंड झाल्यावर खायला देणे.
टीप:- खसखस लागलेला भाग तळतांना वर असायला हवा. ऐवढे मात्र लक्षात ठेवणे.

शेवई खीर

साहित्य –

शेवया 1 वाटी
दूध दीड लिटर
तूप 2 चमचे
ड्रायफ्रुट पाव वाटी
केशर अर्धा चमचा
वेलची पूड 1 चमचा

कृती –

प्रथम दूध गरम करुन त्यास अर्धे आटवून घ्या. नंतर शेवया तूपावर भाजून नंतर पाण्यात शिजवून पाणी काढून टाका शिजलेल्या शेवया आटवलेल्या दूधात घालून त्यात केशर, वेलची पूड, ड्रायफ्रुट घालून उकळवा. घट्टसर झाल्यानंतर सव्र्ह करा.