कोल्हापूरी सुका मसाला

साहित्य:-

धने 1 किलो
जीरे पाव किलो
कलमी 15 ग्रॅम
मोठी विलायची 15 ग्रॅम
जायफळ 2 नग
जायपत्री 15 ग्रॅम
छोटी विलायची 15 ग्रॅम
लवंग 15 ग्रॅम

कृती:-

हा मसाला कोरडा भाजून एकत्र वाटून घेणे.

 कोल्हापूरी चटणी

साहित्य:-

कोल्हापूरी सुका मसाला पाव किलो
मिरची पावडर 1 किलो
(यामध्ये अर्धा किलो मिरची रंगाची व अर्धा किलो मिरची तिखटाची वापरणे.)
कांदे 1 किलो
लसूण 100 ग्रॅम
आलं 50 ग्रॅम
कोथिंबीरची पेंढी 300 ग्रॅम
सुकं खोबर पाव किलो
खसखस 100 ग्रॅम
तीळ पाव किलो

कृती:-

तीळ, खसखस आणि सुकं खोबरं कोरडे भाजून घेणे. कांदा उभा चिरुन त्याला खरपूस भाजून घेणे. त्यानंतर सर्व जिन्नस एकत्र वाटून मसाला डब्यात भरुन ठेवणे.
टीप:- यापासून तयार करायचा कोल्हापूरी तांबडा रस्सा पुढे दिला आहे.

कोल्हापूरी तांबढा रस्सा

साहित्य:

तीळ भिजवलेले अर्धा वाटी
जिरे 1 चमचा
लवंग 3 ते 4
दालचिनी अर्धा चमचा
काळी मिरे 5 ते 6
ओलं खोबरं अर्धा वाटी
सुकं खोबरं अर्धा वाटी
(खरपूस भाजून घेणे)
आलं लसूणची पेस्ट 2 चमचे
कोल्हापूरी चटणी 5 चमचे
कोल्हापूरी सुका मसाला अर्धा चमचा
कोथिंबीर 4 चमचे
तेल पाऊण वाटी
मीठ चवीनुसार

कृती:

पाऊण वाटी तेलात जिरे, कांदे, लसणाची पेस्ट फोडणीला घालून खरपूस भाजून घ्यावी. उरलेले साहित्य एकत्र वाटून यात घालावे. चांगले परतल्यावर यात मटणाचे सूप, चवीनुसार मीठ घालून एकत्र उकळावे.

 कोल्हापूरी पांढरा रस्सा

साहित्य:

मटणाचे पाणी 1 लिटर
(मटण, मीठ व हिंग घालून पाण्यात शिजवून घेणे.)
नारळाचे दूध चार कप
तीळ 1 चमचा
काजू 2 चमचे
खसखस 2 चमचे

कृती –

तीळ, खसखस, काजू एकत्र भिजवून बारीक वाटून घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात लवंग दालचिनी हिरवी मिरची, मिरे, व तमालपत्र याची फोडणी घालून वर आलं-लसणाची पेस्ट घालावी. ती खरपूस भाजून झाल्यावर त्यात तीळ, खसखस व काजूची पेस्ट घालावी व परतावे. नंतर यात थोडा मटणाचा स्टाॅक घालून मिश्रण उकळवावे. सर्वात शेवटी नारळाचे दूध घालावे. चवीनुसार मीठ घालून उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

कोल्हापूरी सुकं मटण

साहित्य:-

शिजवलेलं मटण 1 पाव
कांदे 3 नग
टमाटर 1 नग
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
तेल अर्धा वाटी
शहाजिरे अर्धा चमचा
हळद पाव चमचा
कोल्हापूरी चटणी 4 चमचे
(कोल्हापूरी चटणीची कृती मागील पानात दिलेली आहे.)
कोल्हापूरी सुका मसाला 2 चमचे
(कोल्हापूरी मसाल्याची कृती मागील पानात दिलेली आहे.)

कृती:-

तेलात शहाजिरे घालून लसणाची पेस्ट व कांदा घालून खरपूस भाजून घ्यावे. त्यानंतर त्यात मटण, कोल्हापूरी सुका मसाला, हळद व कोल्हापूरी चटणी घालून चवीनुसार मीठ घालून खमंग भाजावे. यानंतर कोल्हापूरी तांबडा रस्सा व पांढरा रस्साबरोबर सव्र्ह करावे.

टीप:- पांढरा रस्सा किंवा तांबडा रस्सा तयार करतांना आपण मटण शिजवतो. पाणी तर आपण रस्स्यात वापरतो. पण शिजवलेले मटण अश्या सुक्या मटणासाठी वापरावे. वापरतांना यात आपण मीठ घातलेले आहे हे लक्षात घ्यावे.