कुर्डूगड – विश्रामगड

पुण्यापासून अवघ्या ९० कि.मी. पश्चिमेस असणारा हा एकाकी लहानखुरा किल्ला. त्याला विशेष प्रकाशात आणले ते कै.दत्तोबा पासलकर यांनी.

सह्याद्रीच्या कुशीत पुणे व रायगड जिल्ह्यांच्या सरहद्दीवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात ह्याचा समावेश होतो, माणगावपासून २० कि.मी. वरील ह्या किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीवर आहे समुद्रसपाटीपासून जरी उंची कमी असली तरी खाडी चढण किवा लांबच लांब उजाड मार्गाने हा किल्ला जवळ करावा लागतो .म्हणून हा सतत उपेक्षितच राहिला आणि राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे, चित्तथरारक प्रसंगही येथे घडल्याचे ज्ञात होत नाही.
किल्यानाजीकच पायथ्याशी चरी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. त्यावरूनच किल्ल्यास किल्ले कुर्डू हे नाव मिळालं. बाजी पासलकरांनी विश्रांतीकालासाठी या किल्ल्याचा उपयोग केल्याने त्यासच विश्रामगड हेही नामाभिमान प्राप्त झाले असे समजते.
 
किल्ल्यावर कसे जायचे ?
 
पुण्याहून सकाळी व दुपारी अशा दिवसात दोनदा एस.टी. बसेस सुटतात व त्या आपणास थेट मोसे खुर्द ह्या गावी नेतात .तेथून गाडीरास्त्याने आद्माल, पडल्घर, भुईनी, मुगाव, कोळशी ह्या रस्त्याने धामणव्हळ गाव उजवीकडे ठेवून वाघजाईच्या ह्गाताने खाली कोकणात उतरता येते. नुकत्याच पूर्ण झालेल्या वरसगावच्या बाजी पासलकर धरणामुळे हा रस्ता आता पाण्याखाली गेला आहे. गर्द वृक्षराजीतील घटने गेले असता सुळक्याप्रमाणे दिसणारा कुर्डू किल्ला नजरेस पडतो. पायथ्यावर असणाऱ्या कुर्डू पेठ ह्या गावातून अवघ्या १५-२० मिनिटांत आपणास किल्यावर पोहचता येते.
 
पाहण्यासारखे बरेच काही
 
किल्याच्या पायथ्याशी कुर्दैचे अलीकडेच जीर्णोद्धार केलेले मंदिर व कुर्डेश्वर महादेवाचे मंदिर आहे. देवीचे देवळाकडून म्हणजेच पश्चिमेकडून थोडीशी चढण चढून गेले म्हणजे पाण्याचे टाके लागते. कुर्डू पेठ ह्या गावास येथूनच पाणीपुरवठा होतो .गावाची वस्ती प्रामुख्याने कोळी व धनगर जमातीची आहे. तेथून थोडेसे अवघड कड्यावरून मुरमाड, घसरड्या वाटेने आपण एका प्रचंड शिलाखांडाशी येतो. येथून उत्तरेकडील हनुमान बुरजावर आपण येतो .या बुरुजावरच १ मीटर उंचीची हनुमानाची मूर्ती नजरेस पडते.
याच बुरजावर उभे राहून दक्षिणेकडे नजर टाकल्यास एक छोटा सुळका एका मोठ्या सुळक्यापासून अलग झालेला दिसतो दिसतो. या दोघांच्या मधील खिंडीत थोड्याश्या कौशल्याने जाता येते. अगदी खिंडीत आपणास एक नैसर्गिक खिडकी आढळते. तेथून कोकणातील दूरवरचा मुलुख सहज नजरेस पडतो.