तारपा नृत्य
महाराष्ट्रातील गोंड, भिल्ल, कातकरी, ठाकूर, कोरकू इ. आदिवासी जमातींत अनेक वैशिष्ट्यपूर्ण नृत्यप्रकार आढळतात. ज्या वाद्यांच्या साथीवर ही नृत्ये केली जातात, त्या वाद्यांच्या नावांनीच ती ओळखली जातात. उदा., ‘ढोलाचा नाच’, ‘तंबोरीचानाच’, ‘तारपीचा नाच’ इत्यादी. ढोलाचानाच या प्रकारात ढोलाच्या साथीवर गोलाकार फेर धरून संथ व जलदलयीत नृत्य केले जाते. त्यातील हालचाली रानटी, ओबडधोबड व आवेशयुक्त असतात. नर्तक‘हो होऽ’ अशा आरोळ्या ठोकून नाचात जोम निर्माण करतात. नृत्याची लय ढोलाच्या ठेक्यावरच अवलंबून असते.
तारपी हे एक सुषिरवाद्य असून ते प्रामुख्याने वारली आणि ठाकूर या जमातींत प्रचलित आहे. वारली आदिवासी जनजातीचे हे पारंपरिक नृत्य आहे. तारपा हे गारुड्याच्या पुंगीसारखे असणारे वाद्य वाजविणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी या नृत्याची लयही बदलते असे या नृत्याचे स्वरूप आहे.दादरा आणि नगरहवेली प्रांतातील वारली आदिवासींमध्ये हे नृत्य विशेष प्रचलित आहे.वा
रली समाज उत्सवप्रिय आहे तसेच या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे.नवीन आलेल पीक, नवीन भाताची लागवड, पुजा, ई.
सामान्य प्रसंग.. त्याचाही उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते. तारपा हे वाद्य नारनदेव या देवतेने वारली जनजातीला दिले अशी या जनजातीत समजूत प्रचलित आहे.वाळवलेल्या भोपळ्यापासून हे वाद्य तयार करतात.
भाद्रपद वद्य द्वादशीच्या आसपास तांदुळाचे नवीन पीक हाती यायला लागल्यावर हे नृत्य सामान्यपणे केले जाते.या नृत्याचा शेतीशी व सुगीच्या आनंदाशी संबंध मानला जातो सामान्यतः रात्रीच्या जेवणानंतर हे नृत्य केले जाते. यामध्ये मध्यभागी तारपा वादक असून त्याच्याभोवती पुरुष वर्तुळात नाचतात. त्या वर्तुळाच्या बाहेर महिला एकमेकींच्या कमरेत हात घालून आ
णखी एक वर्तुळ करून नाचतात.रात्री चंद्र दिसल्यावर नृत्य चालु होते आणि मग मध्यरात्री पर्यंत ते चालू असते.रिंगण, ताल, लय आणि सुरावटीवर होणारे हे नृत्य म्हणजे सामूहिकनृत्याचा उत्कृष्ठ उदाहरण आहे.
‘तारपा’ हे एक प्रकारचे वाद्य (wind instrument) आहे. सुकलेला भोपळा आतून कोरून, पोकळ बनवूनहे वाद्य तयार करतात. नृत्य स्थानाच्या मध्यभागी एकजण तारपा वाजवत असतो. एक स्त्री आणि एक पुरुष असे एकानंतर एक गोलाकार हातात हात गुंफून नृत्य करतात. नृत्याच्या वेळी तारपा वाजवणार्याच्या दिशेने सर्वजण
पाठमोरे असतात. आणि हे पुर्ण नृत्य असेच पाठमोरे पुढे जातच करतात. नृत्य करताना वारली स्त्रिया केसांचा अंबाडा घालतात. तारपा नृत्यात वारली आदिवासी शेतीचं कांम संपली की पावसाळा संपता संपता “कामड्या” नाच होतो.
हा रात्री ढोलकि च्या तालावर गोल फेर धरुन नाचतात
पाऊस पडत नसेल तर काळमेघ (डोंगरात जाउन) येक नाच करतात
मृत्यू समई येक खास सनई सारखे वाद्य वाजवले जाई.. हल्ली ते वाजवणारे दिसत नाहित त्यामूळे ते वाद्य ही लुप्त झालेय.
वारल्यांची बरीच नृत्य आहेत पण तारपा जास्त प्रसिद्ध झालेय.तसच वारली चित्रांबद्दल, हे वारली खास करुन लग्नाचा चौक काढायला करतात आणि लग्नाच्या रात्री भगत “देव” खेळवतो
भिंती सजवायला ही काढतात पण क्वचीत. हातात हात गुंफून गोलाकार नृत्य करीत असल्याने हे नृत्य म्हणजे त्यांच्या सहकार्याचे प्रतिबिंबच .
तारपीच्या नाचाचे अनेक प्रकार असून, त्या प्रत्येक प्रकारासाठी तारपीवर भिन्नभिन्न सूर धरले जातात. ‘उडक्यांचा (उड्यांचा) नाच’, ‘पाय पालट्याचा नाच’, ‘गुंजवायचा नाच’ (जमिनीवरून काहीतरी-फुले वगैरे-वेचून डोक्यात घालण्याची कृती), ‘भात भालण्याचा नाच’ (वाऱ्याच्या झुळकीने भाताचे पीक मागेपुढे डोलते त्याचे अनुकरण), ‘लावरीचा नाच’ (लाहूर म्हणजे लावा पक्ष्याच्या हालचालींचे अनुकरण) हे तारपीच्या नाचाचे प्रकार होत. यांखेरीज भांगटिळ्याचा, गोवायचा, सलामीचा, मावळ्याचा इ. प्रकार आहेत. ‘भुई-फुगडी’ हा फुगडीचा प्रकारही तारपीच्या तालावर खेळला जातो. आदिवासी जमातींमध्ये जन्म, विवाह, मृत्यू आदिप्रसंगीही नृत्ये केली जातात. भिल्लांच्या जमातीत‘वारी घालणे’ हा अंत्यविधीच्यावेळी करावयाचा नृत्य प्रकार आहे. तसेच या जमातीत ‘घेराचा नाच’, ‘रथाचा नाच’ हे प्रकारही रूढ आहेत.