मकर संक्रांत
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे.सौर कालगणनेशी संबंधित हा महत्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशांमधे हा सण वेगवेगळ्या नावांनी व पद्धतीने साजरा केला जातो
उतर भारतात
हिमाचल प्रदेश – लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
पंजाब – लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात व शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो. या दिवशी लोहारीच्या देवीची पूजा करतात.[९]
पूर्व भारतात
बिहार – संक्रान्ति
आसाम – भोगाली बिहु, (Bhogali Bihu)
पश्चिम बंगाल – मकर संक्रान्ति
ओरिसा – मकर संक्रान्ति
पश्चिम भारतात
गुजरात व राजस्थान – उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण)
गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात.
गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.
दक्षिण भारतात
कर्नाटक, आंध्र प्रदेश – (संक्रांति)
तमिळनाडू – पोंगल, (Pongal)
दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात. मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
भारताबाहेरील देशात-
नेपाळमध्ये,
थारू (Tharu) लोक – माघी
अन्य भागातमाघ संक्रान्ति (Maghe Sankranti), माघ सक्राति (Maghe Sakrati)
थायलंड – सोंग्क्रान (สงกรานต์ Songkran)
लाओस – पि मा लाओ (Pi Ma Lao)
म्यानमार – थिंगयान (Thingyan)
*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा – तिळगुळ घ्या गोडधोड बोला*
मकरसंक्रांतिफल मराठी भाषांतरासह- संग्रह – दातेशास्त्री व श्री डाॅ. राजंदेकर शास्त्री पंचांग
श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्त्यै नमः ॥ स जयति सिंधुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् । वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम् ॥*
( सुर्य ज्याप्रमाणें सर्व अंधः काराचा नाश करतो, त्या प्रमाणें ज्याच्या चरण कमलांचे स्मरण सर्व विघ्नांचा नाश करिते, तो सिन्धुरवदन गजानन उत्कर्ष पावत आहे . )
*तिलस्नायी तिलोद्वर्ती तिलहोमी तिलोदकी ।तिलभुक् तिलदाताच च षट्तिलाः पापनाशकाः॥*
( तिलमिश्रीत पाण्याने स्नान, तिलाचे उद्वर्तन उटणे अंगाला लावणे, तिलांचा होम तिलमिश्रीत पाणी पिणें, तिल भक्षण कराणे आणि तिलाचे दान करणें अशा सहा प्रकारें तिळाचा उपयोग केला असता सर्व पातक नाहीसें होतें ॥
ह्या पुण्यकालात शंकराचे देवळात तिळाच्या तेला चे दिवे लावावेत तीळ, तांदुळ यांनी शंकराची पूजा करावी शंकराला अभिषेक करावा सुर्यनारायणाला दुधाचा अभिषेक करावा . )
*संक्रांतीचा पुण्यकाल -* १५ जानेवारी २०१९ मंगळवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे . ॥
शके १९४० पौष शुक्ल ॥८॥ सोमवारी सायंकाळी ७।५१ वाजता सुर्य मकर राशीत प्रवेश करतो . ॥
*बव करणोपरि संक्रांते र्विद्यमानत्वात्तदुकंवाहनादिकं कथ्यते -* वाहानं सिंहः । उपवहानं गजः ।वस्त्रं श्वेतं । आयुधं भुशुंडी । तिलकं कस्तुरी । वयसा बाला । अवस्था स्थिता चंपक पुष्पं । भक्षणमन्नं । देवजातिः । प्रवाल भूषणम् । वारनाम व नाक्षत्रंनाम ध्वांक्षी । सामुदाय मुहूर्ताः स्त्रिंशत् । आगमनं दक्षिणतः । गमनं उत्तरस्याम् । अवलोकन मीशान्याम् । अथ संक्रांति फलम् ॥
( बव करणावर संक्रांत होत असल्याने उक्त अस लेले वाहनादी प्रकार याप्रमाणे- वाहन सिंह असुन उपवाहन हत्ती आहे . पांढरे वस्त्र परिधान केले आहे . हातात भुशुंडी शस्त्र घेतले आहे . कस्तुरीचा टिळा लावलेला आहे . वयाने बाल असुन बसलेली वासाकरिता चाफ्याचे फूल घेतले आहे . अन्न भक्षण करीत आहे . भूषणार्थ प्रवाळ रत्न धारण केले आहे वारनांव व नक्षत्र नांव ध्वांक्षी असुन सामुदाय मुहूर्त ३० आहेत . दक्षिणेकडून येते उत्तरेकडे जाते व ईशान्य दिशेस पाहात आहे . )
*मासफलम् -* पौषमासे ऽर्कसंक्रातिः सर्व सौख्यं जनस्यच । आनंदः सर्व लोकानां मंगलानि गृहे गृहे ॥
( ही संक्रांति पौष मासांत होत असल्यानें सर्व जनतेला सुख होईल व घरोघरी मंगल कार्य घडतील . )
* * यानियानिच वस्तूनी संक्रांतिः स्वीकारोतिच । तत्तन्महर्घं वा नाशः क्रय विक्रय भीतिदा । आगमे च भवत्सौखं गमने दुःखदाय कम् । दर्शनेच भवद्धानिः संक्रांति फलमादिशेत् ॥
( संक्रांत जी जी वस्तु धारण करते ती महाग होते व संक्रांत ज्या दिशे कडुन येते तिकडे सुख व ज्या दिशे कडे जाते व पहाते तिकडे अनिष्ट फल समजावें . )
*अथ स्वरूपम् -* षष्टियोजनविस्तिर्णा लंबोष्ठी दीर्घ नासिका । एकवक्त्रा नवभुजा संक्रांति पुरुषा कृतिः । पृष्टालोका भ्रमत्येव गृहीत्वा खर्परं करे ॥
( संक्रांततीचें स्वरुप साठ योजनें २४० कोस, विस्तार आहे . तिचे ओठ लांब व नाकहि लांब आहे . तिला एक तोंड असून नऊ हात आहेत ती पुरुषाच्या आकृतीची आहे . ती पाठीमागे पाहणारी असून हातात खापर घेऊन फिरत असते . )
*संक्रांतिपर्वकालामध्ये वर्ज्यकर्माणि -* दन्ता न शोध्याः पुरुषं न वाच्यं छेद्यं न किचिंतृणदारुपुष्पम् ।दोह्यो न गोऽजामहिषीसमा जो भोज्यं च वर्ज्यं मदनो न सेव्यः ॥ ( संक्रांतीच्या पर्वकाळांत दांत घासणें, कठोर बोलणें, वृक्ष व गवत तोडणें, फुल खुडूं नये,गायी, म्हशी, शेळ्या ह्यांचे दूध काढू नयें, भोजन करु नये व कामविषय सेवन हीं कामें करुं नयेत . )
*संक्रांतौ आवश्यकानि दानानि -* सौम्यायनेनूतन भाण्डदानं गोग्रासमन्नं तिल पात्रदानम् । गुडं तिलोर्णाज्य सुवर्णंभूमिगोवस्त्रवाजिप्रभृतींश्र्च दद्यात् ॥
( नवे भाडें, गाईला चारा, अन्न, तिळ भरुन भांडे, तिलपात्र, लोंकरिचें वस्त्र, गुळ, तीळ, सोनें, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावी . वस्त्राचें दान द्यावे व तिळा सह वृषभदान करावे . तिळ व गुळ इष्टमित्रास द्यावा म्हणजे स्नेहसंवर्धन होते संक्रांतिच्या पर्वकाळात सौभाग्यवती स्त्रियांनी दाने द्यावयाची असतात . )
*दानफलम्* – संक्रांतौ यानि दत्तानि हव्यकव्यानि दातृभिः। तानि नित्यं ददा त्यर्कःपुनर्जन्मनि जन्मनि ॥ रविसंक्रमणे प्राप्ते न स्नाया द्यस्तु मानवः । सप्त जन्मनि रोगी स्यान्निर्धनश्चैव जायते सूर्यसंक्रांति दिवसे ब्राह्मणं यो न भोजयेत् । स सप्त जन्मपर्यंतं क्षयरोगी भविष्यति । संक्रांतिसमये दानं स्वशक्त्या न करोति यः । स दरिद्रोमहापापी प्रति जन्मनि जायते ॥ इतीदं संक्रमफलंतस्मात्पाक्परतोऽपि वा । शृणुयात्पुत्रपौत्राद्यै र्मोदते सुचिरं भुवि ॥
( संक्रांतीच्या पुण्यकाला मध्यें जी जी दानें दिली किंवा देवकार्य, पितृकार्य केले तें तें सूर्य आपणाला
जन्मोजन्मी नित्य देतो . सूर्यसंक्रांति आली असतां जो मनुष्य यथाविधी स्नान करीत नाहीं, तो सात जन्म पर्यंत निर्धन व महापापी होते . संक्रांतीच्या पुण्य कालामध्ये यथाशक्ति दाने जो करीत नाही तो प्रत्येक जन्मात दरिद्री व महापापी होतो . हें संक्रांति फल संक्रांतीच्या पूर्वी किंवा नंतर जे श्रवण करितात तें पुत्रपौत्रादिकां सह निरंतर पृथ्वी वर आनंदाने राहतात . )
*श्रवणदानफलम् -* ये वात्र्छन्तिसुखं सदैव परमं लक्ष्मींच रोगक्षयम् । लावण्यादिगुर्णैर्युतं वरवपुर्भा र्यां मनोहारिणीम् । स्वानन्दं पशुपुत्रपौत्र सहितं किर्तेश्र्च वृद्विं कुले । तैः श्रोतव्यंमिदं तु सक्रमफलं देयं सृपात्रे धनं॥ ( ज्यांना नेहमीं सुख, संपत्ती, आरोग्य, सौंदर्यादि गुण, सशक्त शरिर, मनोहर स्त्री, पशु , पुत्र, नातु , इत्यादिकांसह आनंद व कीर्ति ह्यांची आपल्या कुला मध्यें वृध्दि व्हावी अशी इच्छा असेल त्यांनीं हे संक्रांतिफल अवश्य ऐकावें व दान करणे तर सत्पात्रीं करावें . ) श्रीगजाननार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्री गजानन गुरु ९४२१६०५८९३