मदनगड

सह्याद्री मधील कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड. किल्ला तसा बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम सुद्धा. या परिसरातील भटकंती करायाची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

गडमाथा तसा लहानच आहे.गडावर पाण्याची दोन टाकी आहेत मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते.गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा सुद्धा आहे.गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. अलंग,कुलंग ,छोटा कुलंग रतनगड,आजोबा गड,कात्राबाई ,डांग्या सुळका ,हरिहर,त्रिबंकगड हे कि दिसतात. गडफेरीस अर्धातास पुरतो.

गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.आंबेवाडी मार्गेः मदनगडावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा – घोटी – पिंपळनेरमोर या मार्गेआंबेवाडी गाठावी.घोटी ते आंबेवाडी अशी एस टी सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ कि.मी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग,मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदन च्या खिडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून मदन वर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. उजवीकडे वळल्यावर थोडाच वेळात पाय-या लागतात. पाय-या चढून गेल्यावर एक सरळसोट ५०फूट उंचीचा कडा लागतो.

घोटी – भंडारदरा मार्गेघाटघर : किल्ल्यावर येण्यासाठी दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी – भंडारदरा मार्गेघाटघर गाठावे.घाटघरहून चार तासात आपण अलंग आणि मदन यांच्या खिंडीपाशी पोहचतो.

राहण्याची सोय : गडावर एक गुहा आहे यात साधारण ३० जण राहू शकतात.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर फक्त फेब्रुवारी पर्यंत पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात.
सूचना : किल्ल्यावर जाण्याची वाट अतिकठीण असल्यामुळे प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.

Click here to add your own text