मध,शहद

मध,शहद हे पृथ्वीवरील सर्वात जुन्या व गोड पदार्थामधील एक आहे. आरोग्यासाठी शहद अत्यंत फायदेशीर आहे. आजच्या काळात सर्वांच्याच स्वयंपाक घरात शहद सापडते. आपण आज शहदाच्या फायाद्याविषयी माहिती जाणू या.
शहदाचे फायदे

१) शहद हृदयासंबंधी आणि कर्क रोगांसंबंधी रोगांमध्ये लाभकारी.

२)शहदामध्ये प्रतिरोधके आणि फ्लोनोविड तत्व शरीरात कर्करोग वाढविणाऱ्या तत्वांचा नाश करतात.सध्याच्याच संशोधनातून हे सिद्ध झाले आहे कि, शहद अल्सर आणि आतड्याच्या रोगांना कारणीभूत असणारया जीवाणूंना नष्ट करते.

३) गळ्यातील त्रास व कफ

अन्न गिळतांना त्रास होणे, गळा सुजणे, गळा बसने, खोकला व कफ वाढणे या सर्वावर शहद लाभदायी मानल्या जाते.अन्नामुळे तयार होणारया कफावर शहद अत्यंत लाभकारी सिद्ध होते.

४) रक्त शर्करा नियंत्रित करतो.

शहदामध्ये नैसर्गिक साखरेचा भांडार असतो. लवकरच टी शरीरात उर्जेत बदलली जाते. त्यामुळे रासायनिक साखरेपेक्षा शहद अत्यंत लाभकारी सिद्ध होते.
शहदाचा उपयोग नैसर्गिक साखर म्हणून आयुर्वेदिक पदार्थ व औषधीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. शहदामध्ये अनेक औषधीय तत्वांचा समावेश आहे. त्यामुळे याचा वापर अनेक औषधीमध्ये केला जातो. यामुळे शरीरात नैसर्गिक साखरेचे प्रमाण नियंत्रित करता येते.

५) प्रोबायोटिक – हानिकारक जैविकीय घटक

अनेक प्रकारच्या शहदामध्ये हानिकारक जीवाणू मोठ्या संख्येने अस्तित्वात असतात. यामध्ये ६ प्रकारचे लोक्टोबेसिली आणि ४ प्रकारचे बिफिडोब्याक्टेरीया यांचा समावेश आहे.

६) शहद रक्तशुद्धीसाठी लाभदायक मानले जाते.

शहद जेवढे अधिक सेवन केले तेवढे ते जास्त परिणामकारक प्रभाव शरीरावर टाकतो. शहद कोमट पाण्यासोबत मिसळून घेतल्यास लाल रक्तपेशीवर याचा चांगला प्रभाव पडतो. त्यांची संख्या वाढते त्यामुळे रक्तात ऑक्सिजन अधिक मात्रेत शरीरात पोहोचतो. त्यामुळे शरीरात हेमोग्लोबिन चे प्रमाण वाढते. अनेमिया सारख्या आजारावर प्रभावशाली औषध म्हणून शहद सेवन केले जाते.

शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे ऑक्सिजन शरीरात योग्य प्रमाणात विधीत भागात पोहोचत नाही. त्यामुळे शहदाचे सेवन केल्याने हि व्याधी नियंत्रण करता येते.

थकवा, डिप्रेशन आणि इतर अनेक रोगांवर शहद प्रभावीपणे उपचार करतो. शहद सेवनामुळे शरीरात ऑक्सिजनची मात्रा वाढून शरीर स्वस्थ होण्यास मदत मिळते. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असणे फार जरुरी आहे. यामुळे आपले शरीर स्वस्थ व तंदुरुस्त ताहते.
शहद उच्च मानसिक दाब व उच्च रक्तदाब या दोन्ही व्याध्यावर अत्यंत लाभदायक मानले जाते.

७) साखरेच्या तुलनेत शहद अधिक योग्य व सुरक्षित

अध्ययनानुसार पांढरी साखर शरीरासाठी अति सेवनामुळे घातक मानली जाते. तर शहदाचा वापर साखरेपेक्षा अधिक योग्य आणि आरोग्यदृष्ट्या अधिक सुरक्षित मानले जाते. शहदामध्ये साखरेच्या तुलनेत कमी घातक तत्व असतात. यामध्ये ३० % ग्लुकोज ४० % फुक्टोज आणि २०% जड साखर तर १०% डेक्साट्रीन आणि स्टार्च फायबर असते हे प्रमाण साखरेपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्यास शहद सहाय्यक ठरते.

८)योग करणाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक

योग करणाऱ्या व्यक्तीने शहदाचा वापर केल्यास त्यास याचा फार फायदा होतो. शरीराचे सास्थ अधिक चांगले होण्यासाठी शहद उपयोगी सिद्ध होते. सकाळी कोमट पाण्यासोबत याचे सेवन केल्यास हे फार लाभदायी ठरते.

९) शहद उत्तम एन्टी ब्याक्टेरीयल आणि एन्टीसेप्टिक

शहद शरीरात प्रतिरोधके वाढवतो. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील एन्टी बोडीज उत्तेजित करतो त्यामुळे शरीर रोगांशी चांगल्याप्रकारे लढते. जख्मावर शहद लावल्यास जखमा बऱ्या होतात. पोटातील अल्सरवर शहद अत्यंत लाभकारक मानले जाते.ज्या रोग्यांना अस्थमा आहे त्यांनी दररोज शहद सेवन करायला पाहिजे.

१०) शहद एक उर्जेचे स्रोत

फुक्टोज आणि ग्लुकोज मिळून सुक्रोस हि पचनक्रिया सुलभ बनविणारी शर्करा तयार करतात त्यामुळे शरीरास पाहिजे तेवढी उर्जा अन्नातून मिळते.शहदाचे सेवन केल्यावर लगेच उर्जा मिळते यातील सिम्पल शुगर रक्तात लवकरच मिसळून त्याचे उर्जेत रुपांतर होवून शरीरात ती खर्च करण्यास तयार असते. त्यामुळे शहद हे उर्जेचे एक उत्तम स्रोत आहे.यात जीवनसत्वे व खनिजे चे प्रमाण कमी असते यात रेबोफ्लोबीन, प्यान्थोथेनिक एसिड, क्याल्शियम, आयरन, म्यान्ग्नीज व फोस्फोरस पोट्याशियम व झिंकचे प्रमाण असते जे आरोग्यास लाभदायक असतात.

११). शहद पचनक्रियेस मदत करतो

शहद अपचन, वायू कफ आणि मुळव्याध इत्यादी रोगांवर चांगले प्रभावी ठरते. यात भरपूर मात्रेत प्रतिजैविक असतात. जे पचनक्रियेत सुकर करण्यास मदत करतात. शरीरातील आंतरिक कार्यान्वन ठीक करतो. एलर्जी वाढण्यास रोखतो. शहद कधीच खराब होत नाही त्याचा हा गुण त्यास एक उत्तम प्रतिजैविक बनविते. त्यामुळे शरीरास विविध हानिकारक जैविक घटकांशी लढण्यास मदत मिळते.शहद १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना देवू नये. कारण शहदामधील काही प्रतिजैविक घटक बालकांना वाढीसाठी मदत करणारया लाभकारी जीवाणूंना नष्ट करू शकते त्यामुळे त्यांनी करी मात्रेत शहद घ्यावे.

शहद हे एक संपूर्ण नैसर्गिक साखर मानले जाते. त्यामुळे ते लवकर उर्जेत रुपांतरीत होते याचा वापर शरीरासाठी लागणाऱ्या विविध टॉनिक्स व रक्त वाढविणाऱ्या औषधींमध्ये होतो. ज्यापैकी बऱ्याच औषधी आयुर्वेदीक आहेत. जेव्हा ह्या औषधी शरीरात प्रवेश करतात तेव्हा शहद यांना त्वरित उर्जेत व त्याच्या प्रभावात रुपांतरीत करतो.

सिद्ध शुद्धीकरणात शहदाचे विशेष महत्व मानले जाते. शरीराची उष्णता वाढणे, उलट्या होणे तसेच इतर अनेक आजारावर शहद लाभकारी मानले जाते. आयुर्वेदात ७ प्रकारचे शहद मानले जाते. त्यापैकी डोंगराळ प्रदेशात सापडणारे शहद सर्वोत्तम मानले जाते.