जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

गीत : राजा बढे | संगीत : श्रीनिवास खळे | स्वर : शाहीर साबळे

कवीवर्य राजा बढे लिखीत, संगीतकार श्रीनिवास खळे स्वरबद्ध आणि शाहिर साबळे यांच्या खर्ड्या आवाजात गायलेले हे गीत वाचताना, ऐकताना अंगावर रोमांच आले नाहीत असा मराठी माणूस असुच शकत नाही!

गीतकार अवधुत गुप्ते यांनी या गीताचे रिमिक्स करुन तरुणाईस पुन:श्च या शब्दांवर थिरकायला लावले…

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा … ॥१॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥

मुळ गौरव गीत

अवधुत गुप्ते – रिमिक्स