अन्न हे पुर्ण ब्रह्म

अन्न कसे जेवावे याचे ही एक शास्त्र आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये असे म्हणतात की भूकेपेक्षा दोन घास कमी खावेत. जेवताना मांडी घालून पाटावर बसून जेवणे आवश्यक आहे. पाटावर बसल्यामुळे आपण पुढे वाकून जेवण जेवतो. हे करताना पोटावर थोडासा ताण पडतो व त्यामुळे कदाचित आपण भुकेपेक्षा दोन घास कमी खातो- जे शरीराला आरोग्यदायी आहे. या विरुद्ध डायिनग टेबलवर मागे झुकल्यामुळे नेहमीच दोन घास जास्त जातात.
जेवणाच्या लगेच आधी व नंतर भरपूर पाणी पिऊ नये, कारण त्यामुळे उदराग्नी मंद होतो. दोन घासामध्ये थोडं थोडं घोट घोट पाणी प्यावे. जेवणामधील थोडय़ा पाण्याने अग्नी व्यवस्थित प्रज्वलित राहतो. लागले तर जेवणानंतर थोडय़ा वेळाने पाणी प्यावे.
आजच्या फास्टफूडच्या जमान्यात अन्नावरील अग्निसंस्कार हा शब्ददेखील विसरला गेला आहे

आपण शाळेमध्ये एक प्रार्थना म्हणत असू- ‘सहनौ वक्तू सहनौ भुनक्तौ..’. यातून सांघिक भावनेची घडण आपल्या मनामध्ये रुजवली जायची. तसेच एकत्र खावे हे ही सांगितले जायचे. एक घास वाटून खावा. यातूनच मनाची घडण होते. अनेक धर्मामध्ये व प्रांतामध्ये जेवण्याच्या विविध पद्धती आहेत. काही धर्मामध्ये एका ताटात १२ जण एकत्र जेवतात. आपल्याकडेही नवऱ्याचे उष्टे नवरी खाते. त्यातून त्यांनी तनाने व मनाने एकत्र व्हावे हीच भावना असते. विदर्भात अनेकजण जेवताना काला करतात. सर्व अन्नपदार्थाचा एकत्र काला करून तो हाताने खाताना एकसंघ भावनेचा होणारा संस्कार हा काटा चमच्याने आपल्याला विभाजित करतो.
जेवणापूर्वीच्या प्रार्थनेलाही खूप महत्त्व आहे.

एक संस्कृत श्लोक आहे “संस्कारात गुणांतराधानम्” याचा अर्थ संस्कारांमुळे गुणधर्म बदलतात. अन्न शिजवताना बनवणाऱ्याच्या भावना त्यात गुंफल्या जातात व अन्न संस्कारित होतं. त्या अन्नाचे गुणधर्म त्याप्रमाणे बदलतात. आहारानं आपलं मन, आपले विचार बनत असतात. आपण म्हणतोच की माझ्या आईच्या जेवणाची सर कशालाच नाही, का बरं? कारण त्या जेवणात आईचं प्रेम ओतप्रत भरलेलं असत, तर हा आहे अन्नसंस्कार !

वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे
जीवन करी जिवित्वा, अन्न हे पुर्ण ब्रह्म
उदर भरण नोहे, जाणीजे यज्ञ कर्म
जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥

हा श्लोक आपण म्हणत असू. या श्लोकाद्वारे आपण पोटातल्या अग्नीची पूजा/ त्याला वंदन करतो. अन्नग्रहण हे एक पवित्र यज्ञकर्म आहे म्हणून ते विनम्र व समाधानानं करणं आवश्यक आहे. आपल्या जगण्यासाठी पूर्णब्रह्म असलेलं अन्न प्राप्त करून दिल्याबद्दल या श्लोकात आपण देवाचे आणि निसर्गाचे आभार मानतो. शेवटी ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ म्हणजे- पोट भरण्यासाठी अन्न गिळणे हे जितके असंस्कारित आहे तेवढेच एक यज्ञकर्म म्हणून योग्य अन्न, योग्य प्रमाणात, योग्य मान ठेवून ग्रहण करणे हे संस्कारमय आहे. हेच खरे अन्नसंस्कार!
अन्नदाता सुखी भव:

अन्न हे पूर्णब्रम्ह ह्या सदरातील पाककृती , जगप्रसिध्द बल्लवाचार्य(शेफ) श्री. विष्णू मनोहर ह्यांच्या असून त्या आपल्या सगळ्यांना निश्चितच आवडतील ही खात्री आहे.

विष्णुजी हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय बल्लवाचार्य ,शेफ, आहेत. दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचलन त्यांनी केले आहे. ते ई टीव्ही मराठी व कलर्स मराठी या वाहिन्यांवरील ‘मेजवानी परिपूर्ण ‘(मागील १४ वर्षे व ४००० भाग ) या कार्यक्रमाचे परीक्षक होते. त्यांनी झी २४ तास, सामना, लोकमत सखी मंच आणि रामबंधू मसाले आणि साम टीव्ही, दावत-ई-खाला (उर्दू दूरदर्शन) या प्रसारमाध्यमांसाठी लाईव्ह अर्थात थेट प्रक्षेपणाद्वारे पाककला स्पर्धांचे कार्यक्रम केले .त्यांनी पाककलेवर आधारित ३६ पुस्तके व उपहारगृह चालवण्यामागील तंत्र यावर लेखन केले आहे.
त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असणारी ”विष्णुजी की रसोई” ही उपहारगृहांची (restaurant) शृंखला स्थापन केली आहे. या उपहारगृहात विदेशी मात्र अस्सल अन्न, पंजाबी व महाराष्ट्रीयन (मराठी) खाद्यपदार्थ केले जातात.

http://vishnumanohar.com|/

No posts found.