महाशिवरात्री म्हणजे “शिवाची महान रात्र”.

प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्‍या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे.

महाशिवरात्री शुभ मुहूर्त –
21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:20 मिनिटे ते 22 फेब्रुवारी 7:30 ते 2 वाजे पर्यंत आहे.

महाशिवरात्री ही भारतीय परंपरेनुसार सर्वांत पवित्र मानली जाणारी आणि अतिशय महत्वाची रात्र आहे. वर्षातील ह्या सर्वात काळोख्या रात्र – शिवाची कृपाशक्ती ग्रहण करण्याची संधी असते. शिवाला आदिगुरु किंवा प्रथम गुरु असे मानले जाते, ज्यांच्यापासून योग परंपरेचा उगम झालेला आहे. ह्या रात्री सूर्य मालेतील ग्रहांची स्थिती एका विशिष्ठ प्रकारची असते, ज्यामुळे मानवी शरीरात ऊर्ध्व दिशेने ऊर्जेचा प्रचंड नैसर्गिक प्रवाह होत असतो. शारीरिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी ह्या रात्री, रात्रभर पाठीचा कणा सरळ ठेऊन, जागे आणि जागरूक असणे अत्यंत फायदेशीर आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर सुरू असणार्‍या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे.

अध्यात्माच्या मार्गावर असणार्‍या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती, तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठीसुद्धा ही अतिशय महत्वाची आहे.शिवरात्रीला शंकराला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक करतात. शिवरात्रीला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवळात जाऊन ॐ नम: शिवाय मंत्राचे जप केले पाहिजे. नंतर शिवलिंगावर मध, पाणी आणि दुधाने अभिषेक केले पाहिजे. बेलाचे पान (बिल्वपत्र), बेलफळ, धोत्रा, फळ आणि फुले शंकराला अर्पित करायला हवे. नंतर आरती करावी.

पंचामृताने अभिषेक करण्याचं महत्त्व-
पंचामृत (पाणी, गूळ, तूप, मध आणि दही) मध्ये समाविष्ट पदार्थांचे महत्त्व जाणून घ्या. पाणी- शुद्धी, गूळ- सुखप्राप्ती, तूप- विजेते, मध- मधुरभाषी आणि दही- समृद्धी प्राप्ती. या साठी पंचामृताने रुद्राभिषेक करावयाचे महत्त्वाचे आहे. पंचामृताने स्नान घातल्याने किंवा अभिषेक केल्याने शंकर प्रसन्न होतात.

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी:

ॐ शिवाय नम:
ॐ महाकालाय नम:
ॐ अंगारेश्वराय नम:

महाशिवरात्रीला गायत्री मंत्र देखील जपावे.महाशिवरात्रीला महामृत्युंजय जाप केल्याने शारीरिक, मानसिक व तांत्रिक समस्येपासून तसेच कोणत्याही प्रकाराच्या कौटुंबिक समस्येपासून मुक्ती मिळते.महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आराधनाचे विशेष महत्त्व आहे. शिव आराधना करताना अभिषेक करण्याचं जितकं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व महामृत्युंजय मंत्राचं देखील आहे.

जाणून घ्या महामृत्युंजय मंत्राचे पुरश्चरण कसे केलं जातं-

पुरश्चरणाचे पाच अंग असतात.

1. जप 2. हवन 3. तरपण 4. मार्जन 5. ब्राह्मण भोज

पुरश्चरणामध्ये जप संख्या निर्धारित मंत्राच्या अक्षरांच्या संख्येवर अवलंबून असते. यात “ॐ” आणि “नम:” मोजत नाहीत. जप संख्या निश्चित झाल्यानंतर जपाचे दशांश हवन, हवनाचे दशांश तरपण, तर्पणाचे दशांश मार्जन आणि

मार्जनाचे दशांश ब्राह्मण भोज केल्याने पुरश्चरण पूर्ण होतं.

-पारायण हेतू निम्न महामृत्युंजय मंत्राचे यथाशक्ति जप करावे-

“ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुव: स्व: ॐ त्र्यंबक यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धानात्मृत्योर्मुक्षीयमामृतात् भूर्भुव: स्व: ॐ स: जूं हौं ॐ।”

– सर्वत्र रक्षा हेतू निम्न महामृत्युंजय मंत्राचे यथाशक्ति जप करावे-

“ॐ जूं स: (अमुकं) पालय पालय स: जूं ॐ”

(यजमान किंवा इतर एखाद्या रक्षा हेतू मंत्र जपत असल्यास “अमुक” या जागी व्यक्तीचे नाव घ्यावे. स्वत:च्या रक्षा हेतू मंत्र जपत असल्यास “अमुक” या जागी “मम्” असे उद्बोधन असावे.)

-आजारापासून मुक्तीसाठी निम्न महामृत्युंजय मंत्राचे यथाशक्ति जप करावे

“ॐ जूं स: (रोग का नाम) नाशय नाशय स: जूं ॐ”

शिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ-

महादेव

परिपूर्ण होण्यासाठी महादेवाची उपासना केली जाते. महादेव म्हणजे परिपूर्ण पावित्र्य आणि ज्ञान. म्हणूनच महादेवाची पूजा- आराधना केल्याने अनेक व्रतांचे फळ प्राप्त होतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले गेले आहे.

कर्पूरगौर

शिवाचा रंग कर्पूरासारखा म्हणजेच कापरासारखा पांढरा आहे. म्हणून त्याला ‘कर्पूरगौर’ असे म्हणतात. मूळ पांढर्‍या रंगातील स्पंदने साधकाला सहन होणार नाहीत म्हणून राखाडी रंगाचे आवरण शिवाच्या शरिरावर असते. हे राखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते. शिवाला रोज नवीन चिताभस्म लागते.

त्रिनेत्र

शिवाचा कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे. हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो. असे मानले जाते कि जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे सर्व काही राख होत असे.

महादेवाचे अनेक मंत्र, श्लोक, स्रोत, चालीसा आणि अष्टक उपलब्ध आहेत परंतू हे महाशिवरात्रीला हे सर्व शक्य नसल्यास केवळ नावे जपल्याने देखील पुण्य लाभेल.

श्रीशिवशंकर नामावली

ॐ सोमनाथाय नमः.
ॐ मल्लिकार्जुनाय नमः.
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ॐ देवकीनन्दनाय नम:
ॐ परमात्मने नम:
ॐ महाकालेश्वराय नमः.
ॐ ओंकारेश्वराय नमः.
ॐ वैद्यनाथाय नमः.
ॐ भीमाशंकराय नमः.
ॐ रामेश्वराय नमः.
ॐ नागेश्वराय नमः.
ॐ विश्वनाथाय नमः.
ॐ त्रयम्बकेश्वराय नमः.
ॐ केदारनाथाय नमः.
ॐ घृष्णेश्वराय नमः.