महाशिवरात्रीच्या दिवशी भरणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रा-

  • श्री अगस्ती मंदिर, ता: अकोले, जिल्हा: अहमदनगर
  • गडचिरोलीजिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील मंदिर परिसरातील यात्रा
  • आरमोरी तालुक्याच्या मुख्यालयाजवळच्या पहाडीवरील महादेवगड मंदिर येथे
  • शिवणी-डोंगरगावजवळील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्‍याच्या आवळगाव येथील सुप्रसिद्ध गुरुबाबा देवस्थान परिसरातील यात्रा
  • आष्टीनजीकच्या चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांतधाम परिसरातील यात्रा
  • औंढा नागनाथयेथील यात्रा
  • कोल्हापूरपासून१२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी येथील यात्रा
  • सांगली जिल्हाकवठे महांकाळ येथे
  • देवगडजवळचीकुणकेश्वरची यात्रा
  • साताराजिल्ह्यातील लिंब गोवे येथील कोटेश्‍वर मंदिराच्या परिसरात
  • खडकेश्वर, (औरंगाबाद)
  • ठाणेजिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्टेशनानजीकचे गंगा गोरजेश्वर देवस्थान परिसरातील यात्रा
  • गडचांदूर (चंद्रपूर जिल्हा)
  • गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्‍यातील खोब्रामेंढा येथील मंदिर परिसरातील यात्रा
  • औरंगाबादपासून३५ किलोमीटरवर असलेल्या वेरूळ लेण्यांच्या जवळचे गरुडेश्वर मंदिर येथे.
  • घारापुरीलेण्यांजवळ (मुंबई) येथील यात्रा
  • घृष्णेश्वर, दौलताबाद-मराठवाडा
  • राजापूरशहरानजीक असलेल्या मौजे धोपेश्वर गावातील धूतपापेश्वर देवस्थानाच्या परिसरात
  • परळी वैजनाथबीड जिल्हा
  • पालघरजिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात असलेल्या नागनाथ मंदिर परिसरात. हे गाव वाडा तालुक्यातील खनिवलीपासून दोन कि.मी.अंतरावर आहे.
  • बनेश्वर(पुणे जिल्ह्यातील नसरापूर) येथे.
  • वैरागडचे भंडारेश्‍वर मंदिर परिसरातील यात्रा
  • भीमाशंकरचीयात्रा.
  • चामोर्शी तालुक्‍यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्‍वर मंदिर परिसरातील यात्रा